13 January 2025 7:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

बाहेर तर आलो आता खायचं काय? बघतो तर खात्यात १५ लाख जमा: भुजबळ

पुणे :  काल पुण्यात राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचा समारोप झाला. त्याला माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी हजेरी लावली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी आज पहिल्यांदाच हल्लाबोल यात्रेत कार्यकर्त्यांना संबोधीत केलं. मोदी सरकारच्या फसव्या घोषनांची भुजबळांनी चांगलीच खिल्ली उडविली.

छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आल्यावर त्यांच्या कुटुंबाच्या संपत्तीवर टाच आणण्यात आली होती. त्याचाच धागा पकडत छगन भुजबळांनी मोदींच्या एका घोषणेची चांगलीच खिल्ली उडविली आणि उपस्थितांना हसू आवरेना झालं.

जप्त केलेल्या संपत्तीच उदाहरण पुढे करत भुजबळ म्हणाले की, ‘तुरुंगातून बाहेर आलो, आता खायचं प्यायचं काय असा प्रश्न मनात आला. पण बघतो तर काय, माझ्या सर्व कुटुंबियांच्या खात्यात १५ – १५ लाख रुपये जमा झाले होते, मग काय प्रश्नच मिटला’ असं छगन भुजबळ उपहासात्मक म्हणाले आणि उपस्थितांना हसू आवरेना झालं. परंतु मोदींच्या सर्वच घोषणांची भुजबळांनी चांगलीच फिरकी घेतली असं एकूणच चित्र होत.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x