लोकसभा: ९ वर्षाच्या मेहनतीवर शास्त्रज्ञांना मोदींनी व्यक्तच होऊ दिलं नाही?
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित केले. भारतीय शास्त्रज्ञांनी क्षेपणास्त्राच्या मदतीने अंतराळातील उपग्रह पाडण्यात यश मिळवले असून, ऑपरेशन शक्ती अंतर्गत करण्यात आलेल्या या यशस्वी प्रयोगामुळे भारत हा अंतराळात मारा करू शकणारा अमेरिका, रशिया, चीननंतरचा भारत हा चौथा देश बनला आहे. वास्तविक भारतीय शास्त्रज्ञ स्वतः यावर जवळपास मागील ९ वर्षांपासून मेहनत करत होते आणि सदर मिशन हे काँग्रेस राजवटीला असल्याने मोदींनी शास्त्रज्ञांना देखील त्यांचा आनंद व्यक्त करण्यास किंवा पत्रकार परिषद आयोजित करण्यास दिली नसल्याची चर्चा रंगली आहे. मोदींच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले पण, त्यासाठी देशाला संबोधित करण्यामागील हेतू वेगळाच असल्याचं प्रथम दर्शनी निदर्शनास येत आहे.
दरम्यान, काही वेळातच ठराविक वृत्त वाहिन्यांवर ‘अवकाशात सर्जिकल स्ट्राईक’च्या बातम्या झळकाल्याने सर्वकाही पूर्वनियोजित असल्याचं वातावरण झालं आहे. तसेच ‘इस्रो असो किंवा डीआरडीओ’ त्यांचे अध्यक्ष किंवा अधिकृत प्रतिनिधी नेहमीच अधिकृत ट्विट किंवा पत्रकार परिषद घेऊन स्वतःचा आनंद व्यक्त करतात ज्यासाठी त्यांनी अनेक महिने मेहनत घेतलेली असते. परंतु, मोहीम फत्ते झाल्यानंतर देखील इस्रो किंवा डीआरडीओ’कडून अधिकृतपणे दिसले नाही. त्यात मोदींनी स्वतः देशाला संबोधीत करण्यासंबंधित ट्विट करून वेळ निश्चित केली आणि अतिउत्साही प्रसार माध्यमांमध्ये हवा निर्माण केली. त्यानंतर त्यांचे भाषण सुरु होताच प्रथम मोदींच्या ट्विटरवरून एकावर एक १०-१५ मिनिटात ट्विट सुरु झाले. त्यांनी केलेल्या भाषांणातून अप्रत्यक्ष एक संदेश जाणवत होता आणि तो म्हणजे आम्ही सत्तेत आलो आणि देश सर्वोच्च स्थानी पोहोचत असून, सर्वच देशांना आम्ही पिछाडीवर टाकत आहोत. ‘ये नया भारत है’ असा न बोलता दिला गेलेला संदेश असंच काही म्हणावं लागेल. परंतु लोकसभा निवडणुकीच्या लगबगीत ते संबंधित मिशन हे ९ वर्ष जून म्हणजे तत्कालीन नव्या भारताचं आणि वैज्ञानिकांचच होतं हे देशाला ‘चुकून’ सांगायला विसरले, असंच म्हणावं लागेल.
दरम्यान, त्याचा संपूर्ण इतिहास आम्ही तुम्हाला देत आहोत आणि त्या मिशन संबंधित जुनी अधिकृत वृत्त देखील खात्रीसाठी प्रसिद्ध करत आहोत.
जानेवारी २००७ मध्ये चिनी एसेट मिसाइलने न वापरलेले हवामान उपग्रह नष्ट केले केले होते. २०१२ मध्ये इंडिया टुडेला डीआरडीओचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. वि के सारस्वत यांनी मुलाखत दिली होती आणि त्याबद्दल सविस्तर माहिती देखील दिली होती. त्यावेळी त्यांना संबंधित मिशनवरून २ महत्वाचे प्रश्न विचारण्यात आले होते.
१. डीआरडीओ’मध्ये आजच्या घडीला एखादं सॅटेलाईट अंतराळातच नष्ट करण्याची क्षमता आहे का?
उत्तर: भारताकडे आज अँटी सॅटेलाईट विरोधी यंत्रणा उभी करण्याची साधन सामग्री आणि यंत्रणा उपलब्ध आहे. आम्हाला स्पेस शस्त्रास्त्रांची गरज नाही, परंतु बिल्डिंग ब्लॉक्स्ची जागा असावी. कारण जेव्हा आपल्याला त्याची नितांत आवश्यकता असेल तेव्हा आपल्याकडे ते उपलब्ध असणं गरजेचं आहे. परंतु मी असं ठाम पाने सांगू शकतो की, सर्व इमारत ब्लॉक (एएसएटी शस्त्रांसाठी) उपलब्ध आहेत. असं असलं तरी इतर उपग्रहांना हानी होण्याची शक्यता असल्याने सुरुवातीला आम्ही त्याची प्रत्यक्ष चाचणी (उपग्रहांचा प्रत्यक्ष नाश) करणार नाही.
२. डीआरडीओ उत्तम क्षमता असलेलं ए-सॅट कसं बनवणार?
उत्तर: उपग्रहांमध्ये अडथळे आणणारे काही आवश्यक घटक आहेत. त्यानुसार आपल्याकडे स्पेसमध्ये विशिष्ट कक्षा नियंत्रित करण्यासाठी ट्रॅक करणे, त्याच्या दिशेने मिसाइल अचूकपणे लॉन्च करणे आणि शेवटी सॅटेलाईटचा प्रत्यक्षरित्या नाश करणे. आमच्याकडे लांबी रेंज ट्रॅकिंग रडार (एलआरटीआर) बलिस्टिक मिसाइल संरक्षण कार्यक्रमात वापरली गेली आहे, ज्याचा पल्ला ६०० किमी पेक्षा अधिक आहे. सदर कक्षेत उपग्रहांचा मागोवा घेण्यास आम्ही त्याची क्षमता १,४०० किलो मीटरपर्यंत वाढवत आहोत. तसेच उपग्रहांना व्यत्यय आणण्यापेक्षा बॅलिस्टिक मिसाइलमध्ये अडथळा आणणे अधिक अवघड आहे. उपग्रह एक पूर्वनियोजित मार्गाने भ्रमण करतात. एकदा का आपण एक उपग्रह ट्रॅक केला की आपल्याला त्याचे प्रत्यक्ष मार्ग माहित पडतात. बीएमडी प्रकल्पानुसार, आम्ही १००० किमीपेक्षा ०.१ किमी दूर असलेल्या ०.१ स्क्वेअर मीटरचा मागोवा घेतो आणि त्यात व्यत्यय आणतो. दरम्यान, आमच्याकडे बीएमडी प्रकल्पासाठी पुन्हा विकसित होणारी संप्रेषण व्यवस्था आहे. अग्नि-व्ही’साठी विकसित केलेल्या प्रथम-स्तरीय बूस्टरमध्ये ६०० किमी अंतरावर एक वायर हेड टाकता येईल. आमच्याकडे इंफ्रा-रेड आणि रडार प्रणाली ‘किल वेहिकल’वर उपलब्ध आहे, जे त्या प्रणालीला अचूक मार्गदर्शन करतात. दरम्यान, कक्षेत असणाऱ्या उपग्रहांना लक्ष्य करून ते नष्ट करण्याचे सामर्थ्य भारताकडे आहे.
दरम्यान, संबंधित मिशनला अनुसरून सारस्वत यांनी एप्रिल २०१२ मध्ये इंडिया टुडेला दिलेली संपूर्ण मुलाखत येथे वाचू शकता (येथे क्लीक करा) तसेच संबंधित मिशन आणि मागील २०-२५ वर्षांपासून डीआरडीओ’ने केलेली मेहनत, यावर त्यांनी नॅसकॉम’ला दिलेल्या मुलाखतीत सविस्तर भाष्य केलं होत. ती मुलाखत देखील तुम्ही बघू शकता (व्हिडिओ)
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON