आम्हाला डीवचण्यासाठी 'गरबा' कराल तर आम्हालाही आमचा 'झिंगाट' दाखवावा लागेल | मनसेची संतप्त प्रतिक्रिया
मुंबई, २० जुलै | गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहाने मुंबई विमानतळाचा कारभार हातात घेतला आहे. गौतम अदानी यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. मुंबई विमानतळाची शान आणखी वाढवणे हे आमचे आश्वासन आहे आणि ते आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करु, असे अदानी यांनी ट्विटमध्ये म्हटले. या माध्यमातून देशभरात मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असा दावाही गौतम अदानी यांनी केला आहे. त्यामुळे भविष्यात का बदल होतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडच्या मंगळवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. मुंबई विमानतळ व्यवस्थापनामध्ये अदानी समूहाचा ७४ टक्के हिस्सा असेल. जीव्हीके समूहाकडे असलेला ५०.०५ टक्के हिस्सा या समूहाने यापूर्वीच संपूर्णपणे मिळविला असून, आणखी २३.५ टक्के हिस्सा हा एअरपोर्ट कंपनी साऊथ आफ्रिका (एसीएसए) आणि बिडवेस्ट समूह या अन्य अल्पसंख्य भागीदारांकडून खरेदी केला जाईल, असे या संबंधीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
मात्र दोनच दिवसात धक्कादायक गोष्टी मुंबई विमानतळावर घडू लागल्या आहेत. यावर RPG समूहाचे मालक हर्ष गोएंका यांनी मुंबई तळावरील एक व्हिडिओ ट्विट करत खळबळजनक वक्तव्य केल्याने मोठा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे त्यांच्या ट्विटवर गुजराती नेटिझन्स मुंबई आणि महाराष्ट्रावर थेट दावा ठोकताना तुम्ही काय केलंय महाराष्ट्रासाठी अशा गुर्मी दाखवणारे वक्तव्य करून स्वतःच्या मनातील सुप्त इच्छा व्यक्त करत आहेत. हर्ष गोएंका यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये मुंबई एअरपोर्टवर एक इव्हेन्ट साजरा होतं असून त्यात गुजराती गाण्यांवर नृत्य सुरु आहेत. त्यालाच अनुसरून हर्ष गोएंका यांनी म्हटलंय की, “मुंबई विमानतळ गुजरातने टेकओव्हर केल्याने एरपोर्टवर आनंदोत्सव”.
Mumbai airport celebrating the takeover by Gujarat! pic.twitter.com/w38xHXm8UF
— Harsh Goenka (@hvgoenka) July 17, 2021
याच विषयाला अनुसरून मनसेची प्रतिक्रिया आली आहे. मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी यासंदर्भात सज्जड दम भरताना म्हटलं आहे की, “मुंबई विमानतळावरून GVK चे रेड्डी गेले आणि अदानी आले. व्यवस्थापन कोणाचे ही असो पण छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘आवाज’ हा मराठी माणसाचाच असेल हे लक्षात असू द्या. फक्त व्यवस्थापन अदानींकडे गेलय …विमानतळ मुंबईमध्येच आहे …. आम्हाला डीवचण्यासाठी ‘गरबा’ कराल तर आम्हालाही आमचा ‘झिंगाट’ दाखवावा लागेल.
मुंबई विमानतळावरून GVK चे रेड्डी गेले आणि अदानी आले.
व्यवस्थापन कोणाचे ही असो पण छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘आवाज’ हा मराठी माणसाचाच असेल हे लक्षात असू द्या.— Nitin Sardesai (@1nitinsardesai) July 15, 2021
फक्त व्यवस्थापन अदानींकडे गेलय …
विमानतळ मुंबईमध्येच आहे ….
आम्हाला डीवचण्यासाठी ‘गरबा’ कराल तर आम्हालाही आमचा ‘झिंगाट’ दाखवावा लागेल…— Nitin Sardesai (@1nitinsardesai) July 20, 2021
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: MNS leader Nitin Sardesai tweet on Mumbai International Airport Garba Dance after Adani Group too management charge news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा