5 November 2024 1:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News
x

मराठी कुटुंबाला त्यांचं घर मिळवून दिलं, आनंद दिघेंचा आदर्श तुलसी जोशी आजही जपत आहेत

MNS, Tulsi Joshi, Raj Thackeray, Maharashtranama, Digital news paper, marathi news paper

विरार : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघरचे कार्यकर्ते आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक तुलसी जोशी हे शक्य असलेल्या मदतीसाठी सामान्य मराठी माणसाला कधीच नाही बोलत नाहीत, याची अनेक उदाहरणं प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी पाहिली आहेत. त्यापैकीच अजून एक मदतीचं प्रकरण विरार येथून समोर आलं आहे. मोठ्या कष्टाने कमावलेला पैसा सदर मराठी कुटुंबाने विरार येथे घर घेण्यासाठी खर्ची घातला होता.

परंतु, पैसे भरून देखील घराचा ताबा अनेक वर्षांपासून बांधकाम व्यावसायिकाकडून मिळत नव्हता. त्यात पैशांचा परतावा देखील होत नव्हता आणि तक्रारी करून देखील काहीच फायदा झाला नाही. परंतु, समाज माध्यमांवर तुलसी जोशी यांच्या मदत कार्याचे अनेक व्हिडिओ त्यांच्या नजरेस पडले आणि त्यांनी तुलसी जोशींचा नंबर प्राप्त केला. त्यानंतर संपूर्ण विषय समजून घेतल्यावर बांधकाम व्यावसायिकाशी थेट संपर्क करून, एकतर सदर कुटुंबाला पैसे परत द्या किंवा त्यांचं हक्काचं घर तरी द्या अशी विनंतीपूर्वक तंबी दिली. त्याला प्रतिसाद देत प्रथम धनादेश देण्यात आला होता. परंतु, बांधकाम व्यवसायिकाला धनादेश वटला पाहिजे अशी समज देण्यात आली होती. मात्र पैशा अभावी पुन्हा धनादेश न वटण्याच्या भीतीने बांधकाम व्यावसायिकाने सदर कुटुंबाला कागदोपत्री विरार येथील घरच हस्तांतरित केले आणि संबंधित कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

मनसेची स्थापना होण्यापूर्वी शिवसेनेत असताना धर्मवीर आनंद दिघे यांच्या लेटरहेड’वर तुलसी जोशी यांच्या नावाचा उल्लेख असलेलं २००० सालच एक पत्र आमच्या हाती लागलं आहे. त्यात स्वतःशी संबंधित एक समस्या आनंद दिघे यांच्याकडे २००० साली मांडली होती आणि त्यानंतर पालघर येथील तत्कालीन आमदार मनीषा निमकर यांना स्वतः लक्ष घालण्याची विनंती आनंद दिघे यांनी त्यावेळी केली होती. परंतु, आज योगायोग असा की मनसेची स्थापना झाल्यानंतर ते राज ठाकरे यांच्यासोबत मनसेत आले आणि पालघर’मध्ये मनसेची पहिली शाखा ही तुलसी जोशी यांनी उघडली होती. आज ते सामान्य महाराष्ट्र सैनिक या पदावर असले तरी त्यांची पालघर, वसई-विरार भागातील समाज कार्य ही पक्षातील उच्च पदावर असलेल्या नेतेमंडळींना देखील लाजवणारी आहेत.

काय आहे नेमकं ते दिवंगत आनंद दिघे यांचं २००० सालच पत्र;

 

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x