महत्वाच्या बातम्या
-
शिक्षण व्यवस्थेची पुनर्रचना, क्रीडा विद्यापीठ, स्पर्धा परीक्षांची ऑनलाइन यंत्रणा; अमित यांचा ठराव
राज ठाकरे यांच्या मनसेचं पहिलंच महाअधिवेशन २३ जानेवारीला म्हणजे आज बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी होत आहे. मागील अनेक दिवसांपासून या महाअधिवेशनाची तयारी सुरु होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक मुंबईत येत आहेत. मुंबईतील गोरेगाव इथल्या एग्जिबिशन सेंटर इथे सकाळी ९ वाजता या अधिवेशनाला सुरुवात झाली.
5 वर्षांपूर्वी -
सारथी: खासदार संभाजीराजेंचं उपोषण अखेर मागे; सरकारकडून शिंदेंची मध्यस्ती
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सारथी संस्था वाचवण्यासाठी सुरु केलेलं लाक्षणिक उपोषण मागे घेतलं आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी संभाजीराजेंची भेट घेऊन, सारथी संस्थेची स्वायत्तता अबाधित राहील असं आश्वासन दिलं. त्यानंतर संभाजीराजेंनी हे उपोषण मागे घेतलं. “आमच्या सर्व मागन्या मान्य झाल्यामुळे आम्ही हे आंदोलन मागे घेत आहोत”, असे संभाजीराजे म्हणाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
विधानसभा: विरोधकांचं राजकीय भविष्य सांगणाऱ्या विनोद तावडेंचा पत्ता कट होण्याची शक्यता
राज्याचे उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. तावडेंच्या जागी बोरिवली विधानसभा मतदारसंघातून उत्तर मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष विनोद शेलार किंवा बोरिवलीचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक प्रवीण शाह यांची नावे चर्चेत आहेत असं खात्रीलायक वृत्त आहे. भारतीय जनता पक्षाने पश्चिम उपनगरातील मालाड पश्चिम व बोरिवली विधानसभेचे उमेदवार जाहीर केलेले नाहीत. मालाड पश्चिमेतून प्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक डॉ. श्याम अगरवाल व बोरिवलीतून विनोद शेलार यांना उमेदवारी मिळू शकते अशीदेखील चर्चा आहे. भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या यादीत तसेच काल रात्री जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीतही यांचे नाव नव्हते. त्यामुळे तावडे यांचे काय होणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात व मुंबईत सुरू आहे.
5 वर्षांपूर्वी -
उदयनराजे भोसले यांच्या विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण लढण्याची शक्यता
उदयनराजे भोसले यांनी साताऱ्याच्या खासदारकीचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता साताऱ्याची पोटनिवडणूक महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दिवशी होणार आहे. उदयनराजे भाजपच्या तिकीटावर ही निवडणूक लढणार आहेत. तर उदयनराजेंविरोधात आघाडीकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साताऱ्याची पोटनिवडणूक लढतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
प्रसार माध्यमं व नेटकऱ्यांनी झोडपताच गडकिल्ले लग्न समारंभासाठी भाड्याने देणार नसल्याचं स्पष्टीकरण
राज्यातील गढ किल्यांवर खासगी विकसकांना हॉटेल्स आणि रिसॉर्ट उभारण्यास परवानगी देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून २५ किल्ल्यांची यादी तयार करण्यात आली आहे. राज्य मंत्रीमंडळाडून ३ सप्टेंबर रोजी नव्या धोरणाला संमती दिली होती. त्यामुळे आता एमटीडीसी राज्य सरकारच्या मालकीचे किल्ले करारावर देऊ शकते. यावर अनेक नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
कल्याण शहर घोषणेचे ६५०० कोटी ५ वर्ष वेटिंगवर; आता पूरग्रस्तांसाठी ६,८०० कोटींची घोषणा
पूरग्रस्त भागांसाठी केंद्र सरकारने ६ हजार कोटींची मदत द्यावी अशी मागणी राज्य सरकारने केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांनी दिली आहे. मुंबईतल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. कोल्हापूर, सांगली आणि सातारा अशा एका भागाला एक भाग असेल. तर दुसरा भाग कोकण, नाशिक आणि उर्वरित महाराष्ट्राचा दुसरा भाग असेल. कोल्हापूर, सांगली, सातारा यासाठी ४७०० कोटी तर उर्वरित भागांसाठी २१०० कोटींची मदत मागितली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेस-राष्ट्रवादीला पक्ष टिकवायचा असल्याने आरोप: गिरीश महाजन
मागील काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील लोकांचे भारतीय जनता पक्षातील आणि शिवसेनेतील प्रवेश हा सत्तेचा गैरवापर करत, प्राप्तिकर विभाग आणि ईडीच्या मार्फत दबाव टाकून करून घेतले जात आहेत असे आरोप धक्कादायक आरोप विरोधकांनी केले आहेत. काही दिवसांपूर्वीच कागलच्या राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरी आयकर विभागाने अचानक धाडी घातल्या होत्या.
6 वर्षांपूर्वी -
फेसबुकला टक्कर देण्यासाठी गुगल लाँच करणार 'Shoelace'?
सध्या वर्चुअल सोशल कनेक्टच्या बाबतीत जवळपास सर्वच जग फेसबुक आणि गुगलशी संबंधित आहे. मात्र या दोन जागतिक स्तरावरील दिग्गज ब्रँडमध्ये स्पर्धा देखील तेवढीच तीव्र असल्याचं नेहमीच निदर्शनास आलं आहे. काही महिन्यांपूर्वीच गुगलने त्यांचं गुगल-प्लस हा सोशल कनेक्ट प्लॅटफॉर्म बंद करण्याचा निर्णर घेतला होता. कारण फेसबुकच्या तुलनेत त्याला अत्यंत अप्ल प्रतिसाद मिळत असल्याचं निदर्शनास आलं होतं.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: मोदी कोणाचेच नाहीत हा राज यांचा दावा या पुराव्यामुळे सत्यात उतरतो?
राज ठाकरे राज्यभर दौरे करून ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना तोंडघशी पाडत आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने नरेंद्र मोदी कसे शहिदांच्या नावाने मतं मागत आहेत आणि एवढंच नाही जन्मदात्या आईच्या नावाने देखील ते स्वतःच मार्केटिंग करतात असा थेट आरोप मोदींवर करताना, जर मोदी सैनिकांचे झाले नाहीत तर ते जनतेचे कसे होतील, असा थेट सवाल ते सभेत मतदाराला करत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
चिन्हामुळे लॉटरी! ५०,००० रेडिमेड कार्यकर्ते व मतदानाच्या दिवशी सुद्धा चिन्ह डोळ्यासमोर असेल
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर पालघर लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेना आणि भाजप युतीच्या मंत्र्यांनी रडीचा डाव खेळत बहुजन विकास आघाडीच्या चिन्हावरच निवडणूक आयोगामार्फत अडथळे आणले आणि ते यशस्वी झाले. त्यानंतर निवडणूक आयोगाने बहुजन विकास आघाडीचे पूर्वीचे ‘शिट्टी’ हे चिन्हं गोठवून त्यांना ‘ऑटो-रिक्षा’ हे नवीन निवडणूक चिन्ह बहाल केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
कल्पनारम्य धाडस दाखवून देश कधीही प्रगतीपथावर जाऊ शकत नाही: प्रणव मुखर्जी
भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे कार्पोरेट क्षेत्रातील एका पुरस्कार सोहळ्यातच मुखर्जी यांनी नाव न घेता मोदींना लक्ष्य केलं. देशातील लोकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करेल आणि सोडवू शकेल, अशाच नेत्याची देशाला गरज आहे. केवळ कल्पनारम्य धाडस दाखवून देश कधीही प्रगतीपथावर जाऊ शकत नाही, असे म्हणत नोटाबंदीच्या निर्णयावरुन मुखर्जींनी मोदींवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभा: ९ वर्षाच्या मेहनतीवर शास्त्रज्ञांना मोदींनी व्यक्तच होऊ दिलं नाही?
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित केले. भारतीय शास्त्रज्ञांनी क्षेपणास्त्राच्या मदतीने अंतराळातील उपग्रह पाडण्यात यश मिळवले असून, ऑपरेशन शक्ती अंतर्गत करण्यात आलेल्या या यशस्वी प्रयोगामुळे भारत हा अंतराळात मारा करू शकणारा अमेरिका, रशिया, चीननंतरचा भारत हा चौथा देश बनला आहे. वास्तविक भारतीय शास्त्रज्ञ स्वतः यावर जवळपास मागील ९ वर्षांपासून मेहनत करत होते आणि सदर मिशन हे काँग्रेस राजवटीला असल्याने मोदींनी शास्त्रज्ञांना देखील त्यांचा आनंद व्यक्त करण्यास किंवा पत्रकार परिषद आयोजित करण्यास दिली नसल्याची चर्चा रंगली आहे. मोदींच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले पण, त्यासाठी देशाला संबोधित करण्यामागील हेतू वेगळाच असल्याचं प्रथम दर्शनी निदर्शनास येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
मराठी कुटुंबाला त्यांचं घर मिळवून दिलं, आनंद दिघेंचा आदर्श तुलसी जोशी आजही जपत आहेत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघरचे कार्यकर्ते आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक तुलसी जोशी हे शक्य असलेल्या मदतीसाठी सामान्य मराठी माणसाला कधीच नाही बोलत नाहीत, याची अनेक उदाहरणं प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी पाहिली आहेत. त्यापैकीच अजून एक मदतीचं प्रकरण विरार येथून समोर आलं आहे. मोठ्या कष्टाने कमावलेला पैसा सदर मराठी कुटुंबाने विरार येथे घर घेण्यासाठी खर्ची घातला होता.
6 वर्षांपूर्वी -
MTNL डबघाईला? कर्मचार्यांचे पगारासाठी सोमवारी निदर्शने आंदोलन
एमटीएनएलच्या कर्मचार्यांचा जानेवारी महिन्याचा पगार अद्यापही न झाल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक अडचण झाली आहे. एकेकाळी भारत सरकारला हजारो कोटींचा वार्षिक फायदा मिळवून देणारी एमटीएनएल सध्या भारत सरकारच्या दिशाहीन व अदूरदर्शी धोरणांमुळे आर्थिक गर्तेत अडकण्याला शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्त्वाखालील कामगार संघटना देखील कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात येतो आहे.
6 वर्षांपूर्वी -
अंधेरीत उत्तर-भारतीय महासंमेलन; राम मंदिर निर्माणाच्या नावाने सेनेत प्रवेशाचा स्टंट, खरं कारण हे आहे?
येत्या २५ किंवा २६ तारखेला अंधेरी पूर्व येथे उत्तर-भारतीय महासंमेलनच्या तयारीने जोर धरला आहे. कारण इथले माजी काँग्रेस नगरसेवक कलमलेश राय हे उत्तर-भारतीय महासंमेलनच्या नावाने शक्तिप्रदर्शन करत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत असं समजतं. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या संमेलनाला संबोधित करणार असल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
अयोध्येत येऊन तीच लोकं पुन्हा वातावरण बिघडवू पाहात आहेत
२५ नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अयोध्येत सभा आणि दुसरीकडे त्याच दिवशी आरएसएस’ने सुद्धा सभा आयोजित करण्याच्या घोषणा केल्या आहेत. ६ डिसेंबर १९९२च्या त्या घटनेतील हिंदू आणि मुस्लिम समाजातील पीडितांच्या जखमा आजही ताज्या असताना केवळ आगामी निवडणुकीच्या तोंडावर धार्मिक फायदा करून घेण्यासाठी सत्ताधारी पुढे सरसावले आहेत. दरम्यान, २५ नोव्हेंबरच्या पूर्व नियोजित कार्यक्रमांमुळे स्थानिकांनी पुन्हा भीती व्यक्त केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण; फडणवीसांच्या आजच्या बैठकीवर मान्यवरांची पाठ?
आज मराठा आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस मुंबईत बैठकआयोजित केली आहे. परंतु श्रीमंत शाहू महाराज यांच्यासह अनेक नेतेमंडळी तसेच मराठा समाजातील विचारवंतांनी अक्षरशः पाठ फिरविली आहे असं वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
मनसे व महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विधानसभेत एकत्र आल्यास गणित बदलणार: सविस्तर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे स्वबळावर निवडणूक लढविणार असं जाहीर केलं असलं तरी राजकारणात सर्व काही शक्य असत. केवळ विषय येतो तो पक्षाची मिळती जुळती विचारधारा आणि दोघांचे मूळ मतदार कोण याचाच. त्याचा विचार करता भविष्यात जर ही युती झाल्यास ते अनेकांची गणित बिघडू शकतात. इतकंच नाही तर उद्या ह्या युतीने थेट कर्नाटक सारखा चमत्कार केल्यास आश्चर्य वाटायला नको.
7 वर्षांपूर्वी -
बाहेर तर आलो आता खायचं काय? बघतो तर खात्यात १५ लाख जमा: भुजबळ
काल पुण्यात राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचा समारोप झाला. त्याला माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी हजेरी लावली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी आज पहिल्यांदाच हल्लाबोल यात्रेत कार्यकर्त्यांना संबोधीत केलं. मोदी सरकारच्या फसव्या घोषनांची भुजबळांनी चांगलीच खिल्ली उडविली.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल