23 February 2025 2:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

उदयनराजे भोसले यांच्या विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण लढण्याची शक्यता

Former MP Udayanraje Bhonsale, Sharad Pawar, Pruthviraj Chavan, Satara By Poll Loksabha Election

मुंबई: उदयनराजे भोसले यांनी साताऱ्याच्या खासदारकीचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता साताऱ्याची पोटनिवडणूक महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दिवशी होणार आहे. उदयनराजे भाजपच्या तिकीटावर ही निवडणूक लढणार आहेत. तर उदयनराजेंविरोधात आघाडीकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साताऱ्याची पोटनिवडणूक लढतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

साताऱ्याची जागा आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, मात्र काँग्रेससाठी राष्ट्रवादी ही जागा सोडण्यास तयार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांडने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ही पोटनिवडणूकक लढण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मिळाली आहे.

सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विघानसभेसोबतच होणार असल्याचं राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी या जागेसाठी फिल्डींग लावायला सुरुवात केली आहे. एकीकडे उदयनराजे भोसलेंचं गेल्या कित्येक वर्षांपासून साताऱ्यात प्रस्थ असल्यामुळे त्यांच्यासाठी हे होमपिच असताना काँग्रेस त्यांच्याविरोधात पृथ्वीराज चव्हाणांना निवडणूक लढवण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न करत आहे.

भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन एनसीपीच्या मतदारांना फसवल्याच्या भावनेतून सध्या साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसलेंविरोधात वातावरण तयार होऊ लागले आहे. याच वातावरणाचा फायदा घेऊन साताऱ्यात काँग्रेसचं बस्तान पुन्हा बसवण्याची योजना काँग्रेस आखत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x