22 November 2024 5:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Sindhudurg Chipi Airport | सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवरायांनी बांधलाय मान्य करायला हवं, काही लोक म्हणतील मीच बांधला

Sindhudurg Chipi Airport

मुंबई, 0९ ऑक्टोबर | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे दोघे एकाच मंचावर आज उपस्थित होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी नारायण राणे यांना चांगलेच खडे बोल सुनावले. सिंधुदुर्गचा विकास मीच केला आहे हे जनतेला माहित आहे असं नारायण राणे म्हणाले होते त्याला उद्धव ठाकरेंनी खुमासदार शैलीत उत्तर दिलं आहे. सिंधुदुर्गाचा किल्ला छत्रपती शिवरायांनी बांधलाय हे (Sindhudurg Chipi Airport) मान्य करू.. कुणीतरी म्हणेल मीच बांधला असं म्हणत त्यांनी नारायण राणेंना टोला लगावला आहे.

Sindhudurg Chipi Airport. Narayan Rane had said that people know that I have developed Sindhudurg, to which Uddhav Thackeray has replied in a Thackeray style. Let’s admit that the fort of Sindhudurg was built by Chhatrapati Shivaji :

एक काळ होता की मी एरियल फोटोग्राफी करत असे. त्यावेळी मी गड किल्ल्यांचे फोटो काढले होते. आता मला कुणीतरी ही माहिती द्या… सिंधुदुर्गचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे हे मान्य करू, कुणीतरी म्हणेल की मीच बांधला. असं म्हणत त्यांनी नारायण राणेंना जोरदा टोला लगावला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या भाषणात कोकणाच्या विकासाचे शिल्पकार आपणच असल्याचा दावा केला होता. साहेबांच्या आशीर्वादानं मी मुख्यमंत्री झालो. त्यावेळी गोपीनाथ मुंडे माझे सहकारी होते. जिल्ह्यातील पुलांच्या कामासाठी 120 कोटी, पाण्यासाठी 118 कोटी दिले. आज जे इन्फ्रास्ट्रक्चर दिसतंय त्याचा उभारणीला राणेंचं योगदान आहे. दुसरा कुणी इथे येऊच शकत नाही, असे नारायण राणेंनी म्हटले होते.

या टीकेला उद्धव ठाकरे यांनीही खोचक शैलीत प्रत्युत्तर दिले. मी एरियल फोटोग्राफी करत होतो. महाराजांचे किल्ले. निदान सिंधुदुर्गाचा किल्ला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. नाहीतर कोणतरी म्हणेल की तो किल्लाही मीच बांधला.

तुमच्या कॉलेजसाठी फोन केलात तेव्हा दुसऱ्या क्षणाला फाईलवर सही केली’
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी मी विकासाच्या कामात पक्षभेद आणत नसल्याचे ठासून सांगितले. नारायण राणे यांना आठवत नसेल, पण तुमच्या महाविद्यालयाच्या वेळी तुम्ही मातोश्रीवर फोन केला होतात तेव्हा दुसऱ्या क्षणाला मी फाईलवर सही केली होती. कारण, हे महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या, जनतेच्या भल्यासाठी होते, असे उद्धव यांनी सांगितले.

नारायण राणे यांनी आपल्या भाषणात, ‘बाळासाहेबांना खोटं बोलणं कधी आवडलं नाही. खोट्याला त्यांनी थारा दिला नाही’, असे वक्तव्य केले होते. त्यावरुनही उद्धव ठाकरे यांनी राणेंची चांगलीच हजेरी घेतली. नारायणराव, बाळासाहेबांना खोटं बोलणारी लोकं आवडत नाहीत, हे खरंच आहे. त्यामुळे बाळासाहेबांनी तेव्हाच अशा लोकांना शिवसेनेतून बाहेर काढले होते, हा सुद्धा इतिहास आहे. कटू असलं तरी चालेल पण खरं बोलं. खोटं बोललेलं मला चालणार नाही. खोटं बोलशील तर गेट आऊट. हे त्यांनी दाखवलंय. असे प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले.

लघू का असेना सुक्ष्म का असेना पण तुम्हाला मोठं खातं दिलंय’
आपण केंद्रात मंत्री आहात. लघू का असेना सुक्ष्म का असेना पण मोठं खातं आहे. त्याचा उपयोग महाराष्ट्राला नक्की करुन द्याल ही तुमच्याकडून मला अपेक्षा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Sindhudurg Chipi Airport inauguration CM Uddhav Thackeray reply to Narayan Rane.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x