मुस्लिम भगिनींना मानतात मग उद्धव यांच्या अयोध्या दौऱ्याविरोधामागे नेमकं कोण?
अयोध्या: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला जात आहे. अयोध्यातील तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात राम भक्तांना धोका दिल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, ‘शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या हव्यासापोटी काँग्रेससोबत हातमिळवणी करीत राम भक्तांना धोका दिला आहे. त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही शिवाय त्यांना रामाचं दर्शनही घेऊ देणार नाही. मी स्वत: उद्धव ठाकरेंचा रस्ता रोखणार’.
तपस्वी छावनीचे महंत परमहंस दास नाराज असून त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मक्का येथे जाण्याचा सल्ला दिला आहे. उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत महंत म्हणाले, ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा राजकीय आहे. त्यामुळे त्यांनी अयोध्याऐवजी मक्का येथे जायला हवं. ते पुढे असंही म्हणाले, हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुस्तानाला हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी शिवसेनेचं गठण केलं होतं. कारण जगात हिंदूचा स्वत:चा कोणताही देश नाही. बाळासाहेबांचं स्वप्न भारताला हिंदूराष्ट्र बनवायचं होतं’.
तत्पूर्वी मागील वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी अयोध्येतील एका मुस्लिम युवतीने महंताच्या मनगटावर बचावाचा धागा म्हणजे राखी बांधली होती आणि हिंदू मुस्लीम सौहार्दाचे उदाहरण समोर ठेवलं होतं. गुलनाज बानो नावाच्या तरुणीने तपस्वी आश्रमातील महंत परमहंस दास यांच्याकडे आली आणि त्यांच्या मनगटाला राखी बांधण्याची विनंती केली होती.
जेव्हा गुलनाज यांना यामागचे कारण विचारले गेले, तेव्हा तिने महंत परमहंस दास यांना सांगितले की, ‘राम मंदिरासाठी आमरण उपोषण आणि हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी केलेल्या प्रयत्नांनी प्रभावित होऊन मी तुम्हाला राखी बांधण्यासाठी आलो आहे’ असं म्हटलं होतं आणि ते यामुळे प्रभावित देखील झाले होते.
‘बाबरच्या नावावर कोठेही मशीद बांधू नये’
गुलनाज या तरुणीने महंत यांना असेही सांगितले होते की, ‘माझी इच्छा आहे की अयोध्येत भव्य राम मंदिर लवकरच तयार व्हावे, परंतु बाबरच्या नावाने कोठेही मशीद बांधली जाऊ नये’. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृढ इच्छाशक्तीच्या पार्श्वभूमीवर भव्य राम मंदिर बांधले जाण्याची खात्री महंत परमहंस दास यांनी गुलनाज बानो यांना दिली होती. राखी बांधल्यानंतर परमहंसांनी गुलनाज यांना भेटही दिली होते आणि त्यासंदर्भात बातम्या देखील झळकल्या होत्या. मात्र सध्या त्यांचा उद्धव ठाकरे आणि शिवसेना विरोध पाहता यामागे भाजपाची हात असल्याचं म्हटलं जातं आहे. कारण त्यांचे भाजपातील सर्व मोठ्या नेत्यांसोबत अत्यंत जवळचे संबंध आहेत आणि तेच या विरोधच कारण असल्याची चर्चा आहे.
News English Summery: The Mahant Paramahansa Das of the ascetic camp is angry and has advised Shiv Sena chief Uddhav Thackeray to go to Mecca. While targeting Uddhav Thackeray, Mahant said, ‘Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray’s visit to Ayodhya is political. So they should go to Mecca instead of Ayodhya. He further said that Shiv Sena had formed a Hindu Rashtra emperor Balasaheb Thackeray to make Hindustan a Hindu nation. Because there is no Hindu country of its own in the world. Balasaheb’s dream was to make India a Hindu state ‘. Earlier last year, on the day of Raksha Bandhan, a Muslim girl from Ayodhya had tied a rakhi rakhi on Mahant’s wrist and set the example of Hindu-Muslim harmony. Gulnaz Banu, a young woman, came to the ascetic ashram Paramahansa Das and requested to tie her wrist with a rakhi. When Gulnaz was asked why, he told Mahant Paramahansa Das that he was said to have come to build you a rakhi after being impressed with the fasting death for Ram temple and Hindu-Muslim unity and he was also impressed by it.
Web News Title: Story Muslim women was tied Rakhi to Mahant Paramhans Das of Ayodhya on Rakshabandhan.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO