23 February 2025 3:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

हे गुजरात मॉडेल! मोदी सरकार संकटाच्या प्रसंगालाही धार्मिक रंग देतंय: आ. जिग्नेश मेवानी

Corona Crisis, Covid 19, MLA Jigesh Mewani, Tablighis Nizamuddin Markaz

नवी दिल्ली, ०१ एप्रिल : करोना प्रादुर्भावाचा धोका वाढला असतानाचा ‘मरकज तबलीघी जमात’त घडलेला धक्कादायक प्रकार समोर आला. करोनाचा धोका किती भयंकर आहे हे दिल्ली पोलिसांनी आणि सुरक्षा एजन्सीनं समजावून सांगितल्यानंतरही ‘मरकज’साठी जमलेले लोक मशिद रिकामी करण्यास राजी नव्हते.

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशात सध्या २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू आहे. या काळात सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. लोकांना घरातून बाहेर पडण्यावरही बंदी आहे. देशातील ९९ टक्के लोक ज्यामध्ये अल्पसंख्याक समाजातील नागरिकही आहेत. हे सर्व लॉकडाऊनचे समर्थन करीत आहेत. अशा स्थितीत मरकजमध्ये झालेला धार्मिक कार्यक्रम म्हणजे तालिबानी पद्धतीचा गुन्हाच आहे, अशी टीका केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली आहे.

दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मर्कझमध्ये धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला तब्बल ८ हजार लोक या कार्यक्रमास उपस्थित होते. यात भारताच्या विविध भागातून त्याचबरोबर इतर देशातूनही लोक आले होते. यामध्ये २५ जणांना करोनाची लागण झाल्याच समोर आल्यानंतर टीका होऊ लागली आहे. केंद्र सरकारनंही यावर टीका केली असून, गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांनी त्याला उत्तर दिलं आहे.

गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांनी तबलिगी मर्कझ’वरून होत असलेल्या टीकेला ट्विट करून उत्तर दिलं आहे. “गुजरात मॉडेल कामाला लागलं आहे. जे सरकार कोट्यवधी हिंदू देशवासियांना आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभुत सविधा देऊ शकले नाही. ज्यांच्याकडे कोट्यवधी हिंदूची तपासणी करण्यासाठी किट नाही. ते सरकार तबलिगी मर्कझ’वर खापर फोडून संकटाच्या प्रसंगालाही धर्माचा रंग देण्याचा प्रयत्न करीत आहे. लाज वाटली पाहिजे,” अशा शब्दात मेवानी यांनी टीका केली आहे.

 

News English Summary: Gujarat MLA Jignesh Mawani has responded by tweeting a comment from Tablighi Markaz. “The Gujarat model has started to work. The government which could not provide the basic facilities needed for the health of billions of Hindu countrymen. Who do not have the kit to check billions of Hindus. The government is trying to paint religion on the occasion of the crisis by slapping Tablighi Markaz. Shame on you, “has criticized Mevani.

 

News English Title: Story Tablighis Nizamuddin Markaz MLA Jigesh Mewani criticized Modi govt Corona Crisis News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x