22 November 2024 7:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

पावसाळ्यात जनावरांमधील लसीकरण महत्वाचे | जाणून घ्या काय घ्यावी काळजी

Vaccination of farmers animals

मुंबई, २५ जून | पावसाळ्यात जनावरांना संसर्गजन्य रोग, आजार होण्याची शक्यता असते. काही आजारामुळे जनावरे दगावण्याची शक्यता असते. यामुळे अशा रोगांना आपण प्रतिबंधक लसीकरण करून होणारे आर्थिक नुकसान टाळू शकतो. संसर्गजन्य किंवा साथीच्या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी अशा रोगांची रोगप्रतिकारक शक्ती आपल्या जनावरात आधीच निर्माण करण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक असते. दरम्यान लसीकरण करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. ते आपण जाणून घेऊ.

लसीकरण करताना घ्यावयाची काळजी:
* लसीकरण करण्यापूर्वी बाह्य परजीवी यांचे निर्मूलन करावे
* लसीकरण करण्यापूर्वी एक आठवडा अगोदर जंत किंवा कृमिनाशक औषध द्यावे
* योग्य प्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी आपल्या जनावरांना योग्य पोषक आहार क्षार व खनिजे यांचे मिश्रण द्यावे
* लसीकरण हे नेहमी निरोगी व तंदुरुस्त जनावरांमध्ये करावे
* चांगल्या कंपनीची नामांकित लसच द्यावी
* लस ही योग्य तापमानाला व योग्य अवस्थेत साठवावी तसेच लसीची वाहतूक करताना योग्य प्रकारे
करावी
* गाभण जनावरांना लस टोचू नये
* लस देताना लसीची मात्रा व देण्याची पद्धत तंतोतंत पाळावी
* सर्व जनावरांना एकाच वेळी लस द्यावी
* लसीकरण हे नेहमी दिवसाच्या थंड वेळेतच करावे सकाळी किंवा संध्याकाळी
* दोन वेगळ्या लस्सी एकत्र करून कधीही देऊ नये
* लसीकरणाच्या सुया व सिरींज एस घ्या गरम पाण्याने उकळून घ्याव्यात रसायने वापरू नये
* लस टोचलेल्या जागी स्पिरिट किंवा टिंचर आयोडीन चा किंवा कोणत्याही जंतु नाशकाचा वापर करू नये.
* पूर्णपणे बर्फा तच ठेवावी जेणेकरून तिची कार्यक्षमता कमी होणार नाही.
* शिल्लक राहिलेली लस वापरू नये
* लसीचा तपशील म्हणजे स्त्रोत प्रकार बॅच नंबर इत्यादींची योग्य प्रकारे नोंद ठेवावी
* लसीकरणानंतर जनावरांना अतिशय कष्टाची कामे करू देऊ नयेत किंवा त्यांना थकवा येईल अशी कामे लावू नयेत
* लसीकरण हे पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच करावे

लसीकरणानंतर गंभीर लक्षणे आल्यास कशी ओळखावी:
१. लसीकरणानंतर लगेच विचित्र क्रिया येऊ शकते अशावेळी त्वरित पशुवैद्यकाची संपर्क साधावा.
२. लस पोचल्याच्या जागी सूज येणे गरम लागणे दुखणे इत्यादी घटसर्प किंवा पर्याची लस टोचल्यावर दिसू शकतात.
३. काही वेळेस ताप येणे भूक मंदावणे थकवा येणे आणि दुभत्या जनावरांचे दूध उत्पादन घटने इत्यादी लक्षणे दिसू शकतात.

लसीकरणानंतर घ्यावयाची काळजी:
१. लसीकरणानंतर सुया व सिरींज एक तास उकळत्या पाण्यात ठेवाव्यात
२. काळपुळी व ब्रुसेला सांसर्गिक गर्भपात या रोगांच्या लसी फार काळजीपूर्वक हाताळावे लागतात कारण त्यांच्या पासून संसर्ग होण्याचा धोका असू शकतो.

गायी म्हशींना लसीकरण करण्याची वेळ:

* घटसर्प (गळसुजी):
दरवर्षी मे जून महिन्यात पावसाळ्यापूर्वी

* एक टांग्या/ फऱ्या:
दरवर्षी मे जून महिन्यात पावसाळ्यापूर्वी

* तोंडखुरी:
दरवर्षी मार्च एप्रिल व नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात

* पी पी आर:
मे जून किंवा नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात

* आंत्रविषार:
मे जून महिन्यात

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Vaccination of farmers animals in the rainy season is too important know what to take care news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x