महत्वाच्या बातम्या
-
नाशिकमध्ये वसंत गीते समर्थकांमध्ये फूट, भाजप'ला रामराम करून राष्ट्रवादीत प्रवेश: भुज'बळ' पावर
नाशिक भाजपमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. भाजपचे महत्वाचे पदाधिकारी व वसंत गीते समर्थक भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश निश्चित झाल्याचे वृत्त आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ जामिनावर बाहेर आल्यानंतर या घडामोडींना जोर आला आहे. भाजप’मधील पक्ष फुटी नाशिकमधून सुरु होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
7 वर्षांपूर्वी -
सत्ताकाळात राज ठाकरेंनी नवीन आराखड्यानुसार आखलेलं कालिदास कलामंदिर नाट्यगृह अंतिम टप्प्यात
नाशिक महानगर पालिकेत आज मनसेची सत्ता नसली तरी त्यांच्या सत्ताकाळात झालेली विकास कामं आजही विद्यमान सत्ताधाऱ्यांना जमत नसल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकमधील विद्यमान भाजप पक्ष स्मार्ट सिटीच्या नावाने मनसेच्या सत्ताकाळातील पूर्णत्वाला गेलेले प्रकल्प केंद्राला स्वतःचे म्ह्णून दाखवत असल्याचे अनेक वर्तमान पत्रातील बातम्यांमधून उघड झालं होत.
7 वर्षांपूर्वी -
काँग्रेस व एनसीपी'ची आघाडी होणार, आठवड्याभरात जागावाटप ठरणार: शरद पवार
आघाडी संदर्भात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सोबत आपल्या ३ बैठका पूर्ण झाल्या असल्याचा खुलासा राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी ‘द हिंदू’ ला दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. त्यामुळे शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जोमाने कामाला लागले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
7 वर्षांपूर्वी -
सत्तेच्या मलईपुढे स्वबळाची घोषणा फसवी? जळगाव महापालिका निवडणुकीसाठी सेना-भाजपची दोस्ती
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वबळाची घोषणा करताना,’यापुढे भाजप सोबत कोणत्याही निवडणुकीत युती नाही म्हणजे नाही आणि आम्ही यापुढे केवळ स्वबळावर लढणार अशी घोषणा केली होती. परंतु ही घोषणा फुसकी असल्याचे समोर येत आहे. कारण आगामी जळगाव महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजप सोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे.
7 वर्षांपूर्वी -
उधारीवर विडी-सिगारेट देण्यास नकार देताच शिवसैनिकाने पानटपरी पेटवली
नाशिक मोहाडी येथे ही घटना घडली असून रामभाऊ लोंढे या पानटपरी मालकाने सरपंच सुरेश गावित यांच्याकडे विडी, सिगारेटच्या आधीच्या शिल्लक उधारीचे पैसे मागितल्याचा रागाने सुरेश गावित यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह पुन्हा टपरीवर जाऊन मुद्दाम कुरापती काढल्या आणि त्यानंतर सुरेश गावित यांनी रागाने पानटपरीला टपरीला आग लावली, अशी तक्रार रामभाऊ लोंढे यांनी केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीत भाजप, मनसे व शिवसेना असे सर्वच गट भरडले जाणार
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. त्यात जळगाव महानगरपालिकेवर सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व आहे. सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीने महापालिकेतील सर्वच म्हणजे ७५ जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात भाजपमध्ये सर्व सूत्र गिरीश महाजन यांनी घेतल्यामुळे त्यांच्यात सुद्धा एकनाथ खडसे यांच्या गटामुळे दुही माजण्याची चिन्ह आहेत.
7 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रनामा'च्या बातमीला यश, पार-तापी-नर्मदा पाणीवाटपावरून भुजबळांच मुख्यमंत्र्यांना पत्र
गुजरात राज्याने पार-तापी नर्मदा नद्याजोड प्रकल्पातील महाराष्ट्राच्या हक्काचे तापी खोऱ्यातील ४३४ दशलक्ष घनमीटर इतके पाणी देण्यास स्पष्ट नकार दिला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी पत्र पाठवून गुजरातने महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी द्यावे अशी विनंती केली होती. परंतु गुजरात सरकारने स्पष्ट नकार देत महाराष्ट्र सरकारची विनंती धुडकावून लावत मुख्यमंत्र्यांच्या विनंती पत्राला केराची टोपली दाखविली आहे.
7 वर्षांपूर्वी -
ओबीसीं'चा मुद्दा तापल्यास भाजप-सेनेची डोकेदुखी वाढणार? सविस्तर
ओबीसी समाजाला भुजबळांच्या नेतृत्वाखाली सत्ताधाऱ्यांविरोधात एकत्र आणण्याचा प्रयत्नं यशस्वी झाल्यास भाजप बरोबर शिवसेनेची सुद्धा डोकेदुखी वाढू शकते. कारण राज्यात ४० टक्क्यांच्या घरात लोकसंख्या असलेला ओबीसी समाज जर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकवटला तर आगामी निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
7 वर्षांपूर्वी -
दत्तक नाशिकमध्ये भाजपसाठी भविष्यात धोक्याची घंटा ?
सत्ताधारी भाजपचा सध्या जरी नाशिकमध्ये २ खासदार, ४ आमदार, महापालिकेत सत्ता, जिल्हा परिषद, नगरपालिकांत बहुसंख्य भाजपचे सदस्य अशी ताकद आहे. परंतु नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ती ताकद केवळ कागदावरच असल्याचं सिद्ध झालं आहे. भाजपची नाशिकमधील लॉबी खुद्द मुख्यमंत्र्यांचे आदेश धुडकावून आपल्याच उमेदवाराला धूळ चारत असल्याचे चित्र समोर आलं होत.
7 वर्षांपूर्वी -
भिडेंचं अजब विज्ञान ! माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना मुलं होतात
शिवकालीन इतिहासाची दाखले देऊन सध्याच्या राजकीय परिस्थीवर भाष्य करणाऱ्या संभाजी भिडेंनी एक अजब दावा केला आहे. शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी हे विधान नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका सभेत केलं आहे ज्यामुळे त्यांच्यावर खूप टीका होताना दिसत आहे.
7 वर्षांपूर्वी -
रावतेंवर प्रवाशी आणि एसटी कर्मचारी दोघेही नाराज
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एकबाजूनेच विचार करून जाहीर केलेली पगारवाढ एसटी संघटनांना मान्य नाही. तसेच एसटीच्या वर्धापन दिनाचा मुहूर्त साधत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ घोषित केली. परंतु ज्या कर्मचाऱ्यांना ही वेतनवाढ मान्य नसेल त्यांनी एसटी महामंडळाकडे ९ जूनपर्यंत लेखी स्वरूपात अर्ज करावा आणि कहर म्हणजे हे अर्ज स्वीकारताना संबंधित कर्मचाऱ्यांचे चित्रीकरण करण्यात येणार असल्याने सर्व एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये परिवहनमंत्री दिवाकर रावते याच्या विरोधात एक खदखद आहे.
7 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी, या सरकारची नियत दिसत नाही
राज्यातलं सरकार शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं अजिबात पाळत नाही. एकूणच ह्यांची कार्यपद्धतीची पाहता सरकारची नियत दिसत नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी असं रोखठोक आवाहन माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांचा १ जूनला पुन्हा एल्गार, आंदोलनाची हाक
शेतकऱ्यांचा ज्वलंत मागण्यांसाठी राज्याभर पुन्हां एल्गार, येत्या १ जूनपासून राज्यात पुन्हा शेतकरी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपाला १ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ज्वलंत शेतकरी प्रश्नांसाठी पुन्हा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
नाशिकमध्ये भुजबळांची मदत एनसीपीला की सेनेला ?
आज विधानपरिषदेचे निकाल जाहीर झाले असून, त्यात नाशिक मतदारसंघात राष्ट्रवादीने सर्व शक्ती पणाला लावली असताना आणि भाजपने राष्ट्रवादीला उघड पाठिंबा दिला असताना सुद्धा शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे हे तब्बल २०० मतांनी विजयी ठरले आहेत. परंतु आता स्वतः नरेंद्र दराडे यांनी विजयामागे एनसीपीचे जेष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची मदत लाभली असा दावा केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
विधानपरिषद निकाल: भाजप २, शिवसेना २, एनसीपी १
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या ६ पैकी ५ जागांचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात भाजप २, शिवसेना २, एनसीपी १ असा निकाल लागला असून अमरावतीत काँग्रेसला जबर धक्का मिळाला आहे.
7 वर्षांपूर्वी -
नाशिक विधानपरिषद निवडणूक, राष्ट्रवादीला मनसेचा पाठिंबा
अत्यंत अटीतटीची होणारी नाशिक विधानपरिषदेची निवडणूक ही राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवारांमध्ये रंगणार असल्याने प्रत्येक मत हे महत्वाची भूमिका बजावणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
पंकज भुजबळ काल राज ठाकरे व उद्धव ठाकरेंना भेटले
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यापूर्वी पंकज भुजबळ यांनी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली होती. तत्पूर्वी मंगळवारी रात्री पंकज भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही वर्षा निवासस्थानी भेट घेऊन छगन भुजबळांना सुरक्षा पुरविण्याची विनंती केली होती.
7 वर्षांपूर्वी -
पुण्यात भुजबळांची तोफ धडाडणार ?
राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ बाहेर येताच काय करणार याची सर्वानाच उत्सुकता आहे. परंतु सध्या राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा सुरु असून त्याचा समारोप पुण्यात १० जून रोजी होणार असून भुजबळ तेथे थेट भाषण करणार असल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
'सामना'मधून भुजबळांचे कौतुक, ओबीसी लीडर सेनेला पक्षात हवेत का ?
आजच्या सामना अग्रलेखातून छगन भुजबळ यांच कौतुक करण्यात आलं असून त्यामागे ओबीसी लीडर चेहरा हे मुख्य कारण असल्याचं राजकीय विश्लेषक बोलत आहेत. त्याबरोबरच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे सुद्धा यामागे कारण असल्याची राजकीय कुजबुज सुरु आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिक्षण विभागाची 'डिजिटल'माघार, बारावीचे प्रवेश यंदा ऑफलाइनच
शालेय शिक्षण विभागाने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही माघार घेत बारावीच्या ऑनलाइन प्रवेशाची तयारी नसल्याने, बारावीचे प्रवेश प्रक्रिया पुन्हा ऑफलाइन करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारच्या शालेय शिक्षण विभागाची ‘डिजिटल’ म्हणजे ऑनलाइन प्रवेश घेण्याची तयारी नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50