महत्वाच्या बातम्या
-
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंसह त्यांच्या जावयाची मालमत्ता ईडी'कडून जप्त
राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना मोठा धक्का बसलाय. ईडीने गुरुवारी खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांनी तर शुक्रवारी खडसेंची मालमत्ता जप्त केली आहे. पुणे भोसरी एमआयडीसी गैर व्यवहार प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. एएनआयने आणि काही वृत्तवाहिन्यांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.
3 वर्षांपूर्वी -
‘हॅपी बर्थडे’च्या नावाखाली मनसे शहराध्यक्षाला भाजपचा मफलर घालत पक्षप्रवेश घडवला? | काय सत्य?
‘हॅपी बर्थडे’च्या नावाखाली आपल्या पक्षाचा मफलर मनसे पदाधिकाऱ्यांच्या गळ्यात टाकून जळगावमध्ये एक भलताच प्रकार घडला आहे. कारण या हॅपी बर्थडेमध्ये दडलेला होता एक पक्ष प्रवेश. एक हास्यास्पद घटना वाटत असली तरी जळगाव शहरात नेमके असेच घडले आहे. चूक कुणाची किंवा पलटी कोण मारतोय ते निश्चित नसले तरी मनसे आणि भाजपवाल्यांची आणि मनसेची नाचक्की मात्र झाली आहे. शनिवारी हा प्रकार घडला आहे.
3 वर्षांपूर्वी -
आधी शिवसेनेत अस्वस्थ, मग काँग्रेसमध्ये अस्वस्थ, मग भाजपने सूक्ष्म खाते दिल्याने डोकेही सूक्ष्म झाले - गुलाबराव पाटील
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सूक्ष्म उद्योग खाते मिळाले आहे, त्यामुळे त्यांचे डोकेही सूक्ष्म झाले आहे. त्यामुळे ते एकनाथ शिंदे शिवसेनेवर नाराज असल्याचे म्हणत आहेत, अशी खरमरीत टीका शिवसेना नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे शिवसेनेत अस्वस्थ असून ते लवकरच भारतीय जनता पक्षात येतील असे मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले होते.
3 वर्षांपूर्वी -
जळगाव | आगामी जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवणुकीची सेना-राष्ट्रवादीत खलबतं?
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मागील काही महिन्यांपासून पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चिमणराव पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यात राज्यातील दिग्गज नेते एकनाथराव खडसे यांच्याशी देखील गुलाबराव पाटलांचे फारसे जमत नाही. दरम्यान, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची मुंबईत पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चिमणराव पाटील यांनी एकत्र भेट घेतली. रुग्णालयातून घरी परतल्यावर खडसेंची ही सदिच्छा भेट असली तरी अनेकांच्या या भेटीने भुवया उंचावल्या आहे.
3 वर्षांपूर्वी -
बीएचआर घोटाळा | फरार भाजप आमदार चंदूलाल पटेल यांना अटकपूर्व जामीन मंजूर
ज्यातील बहुचर्चित बीएचआर अपहार प्रकरणी जळगाव विधान परिषदेचे आ.चंदूलाल पटेल यांचा अटकपूर्व जामीन पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या न्यायालयाने मंजूर केला आहे. भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील अपहार प्रकरणी अनेक दिग्गज गोत्यात अडकले आहेत. याच प्रकरणात आमदार चंदूलाल पटेल यांच्यावर देखील ठेवी मॅनेज केल्याचा आरोप आहे.
3 वर्षांपूर्वी -
BHR Scam | सुनील झंवर'सोबत माझा कोणताही संबंध नाही | माझ्या कंपन्यांचा उद्योग २०० कोटींचा - भाजप आमदार
भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था अर्थात बीएचआर पतसंस्थेतील अवसायकाच्या काळात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी गेल्या नऊ महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या मुख्य संशयित सुनील झंवरला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक येथे अटक केली. सुनील झंवर हा गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय मानला जात असल्याने तसेच त्यांच्या कार्यालयातील झडतीमध्ये महाजन यांच्या शस्त्र परवान्याच्या झेरॉक्स मिळाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.
3 वर्षांपूर्वी -
BHR घोटाळा | अडचणीत वाढताच गिरीश महाजन म्हणाले, सुनील झंवर सर्वच नेत्यांचे निकटवर्तीय
बीएचआर पतसंस्था घोटाळ्याप्रकरणी मुख्य संशयीत सुनील झंवर यांना अटक झाली आहे. सुनील झंवर यांना अटक झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहे. सुनील झंवर हे जिल्ह्यातील सर्वच नेत्यांचे निकटवर्तीय असल्याचा पुनरोच्चार माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
भाजप-महाविकास आघाडीच्या राजकारणामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही | आता आरपारची लढाई
राज्यातील मागील भाजपा व विद्यमान महविकास आघाडी सरकारने मराठा समाजाचा केवळ मतांसाठी वापर केला आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार व केंद्र सरकार एकमेकांकडे बोट दाखवत आहे. दोघांच्या राजकारणामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. यापुढे आरपार की लढाई असेल. मराठा समाज मूक मोर्चा काढणार नाही तर, हातात दंडूके घेवून ठोक मोर्चा काढेल, असा इशारा अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
रोहिणी खडसेंनी घेतली प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट | नेमकं काय कारण?...
माजी महसूलमंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांची कन्या व जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी आज राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांची मुंबई येथे भेट घेतली.
3 वर्षांपूर्वी -
युवासेनेच्या ‘त्या’ निष्ठावान जिल्हाध्यक्षाच्या नाराजीवर सरदेसाईंनी दाखवलं नैतृत्व कौशल्य | नेमकं काय घडलं?
जवळपास सर्वच पक्षांमध्ये निष्ठावंत कार्यकर्ते असतात पण प्रत्येकाला न्याय मिळतोच असे नाही. अनेकदा नवख्या आणि पब्लिसिटी तसेच समाज माध्यमांवर स्टन्ट करणारे पदाधिकारी पक्षातील वरिष्ठ नेत्यांमार्फत वशिल्याने पद मिळवून जुन्या पदाधिकाऱ्यांवर अन्याय करतात. पक्ष बांधणी करणारे पदाधिकारी अनेकदा चमकोगिरी पदाधिकाऱ्यांमुळे पक्षश्रेष्ठींच्या समोर येतं नाहीत. मात्र शिवसेनेची युवा शाखा असलेल्या युवासेनेचे राष्ट्रीय सचिव वरुण सरदेसाई मात्र निष्ठावंत कार्यकर्त्याला विसरले नाहीत.
3 वर्षांपूर्वी -
‘त्या’ २७ नगरसेवकांना कोणते गाजर दिले ते लवकरच कळेल - गिरीश महाजन
सरकारच्या तिजोरीत खडखडाट असून गेल्या वर्षभरात कोणत्याही योजनेसाठी पैसे देण्यात आलेले नाही. सरकार स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवसेनेने भाजपाला जोरदार धक्का देताना तब्बल २७ नगरसेवकांचा प्रवेश घडवून आणला होता. त्यावर गिरीश महाजन यांनी भाष्य केलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आठवडाभरापासून बॉम्बे रुग्णालयात दाखल | प्रकृती स्थिर
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या रुग्णालयात असल्याची माहिती आहे. गेल्या आठवडाभरापासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना बॉम्बे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे. मूत्रमार्गाचा संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते आणि त्यानंतर त्यांच्यावर आठवडाभर उपचार सुरू आहेत. दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
जळगाव | भाजप आ. सुरेश भोळेंच्या दौऱ्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांचे बॅनर फाडले
जळगाव शहरातील SBI कॉलनीत आ.सुरेश भोळे यांनी पाहणी दौरा केल्यानंतर काही वेळातच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने शिवसेना नगरसेवकांनी रस्त्यांच्या कामासंबंधी लावलेले विकासाचे बॅनर फाडून फेकल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. बॅनर फाडणारा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असल्याने या कार्यकर्त्या विरोधात आपण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार असल्याची माहिती शिवसेनेचे नगरसेवक नितीन बरडे यांनी दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिवसेना गुंडांचा पक्ष हे संजय राऊत यांनी मान्य केले आहे - गिरीश महाजन
शिवसेना गुंडांचे समर्थन करणारा पक्ष असून शिवसेनेत गुंड असल्याचे खा.संजय राऊत यांनी मान्य केले आहे. सत्ताधारी पक्षाने गुंडांच्या समर्थनाची भाषा करणे हे राज्याचे मोठे दुर्दैव असल्याची बोचरी टीका माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली.
3 वर्षांपूर्वी -
प्रसाद लाडांसारख्या व्यापाऱ्याच्या मुखातून असे शब्द शोभत नाहीत | तरी त्यांनी तारीख कळवावी - गुलाबराव पाटील
वेळ पडल्यास शिवसेना भवन देखील फोडू’ या विधानावरुन भाजप आमदार प्रसाद लाड यांनी सारवासारव करायला सुरुवात केली आहे. हे विधान केल्यानंतर त्यावर राज्यभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. त्यानंतर लाड यांनी रात्री उशीरा आपल्या विधानावरुन स्पष्टीकरण दिले आहे.
3 वर्षांपूर्वी -
शेतकरी हिताची ठिबक सिंचन अनुदान योजना 2021-22 | कसा लाभ घ्याल - वाचा माहिती
सन २०१५-१६ पासून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत – प्रति थेंब अधिक पीक घटकाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. सदर घटकामध्ये सुक्ष्म सिंचन व पाणी व्यवस्थापनाच्या पुरक बाबी अशा दोन उप घटकांचा समावेश आहे. यामध्ये केंद्र व राज्य हिश्श्याच्या निधीचे प्रमाण ६०:४० असे आहे.
3 वर्षांपूर्वी -
राज्य सरकार विरोधात बोलण्यासाठीच राणेंना केंद्राचा लाडू मिळाला - गुलाबराव पाटील
राज्य संकटात असताना राजकारण करणाऱ्यांनी थाेडा तरी विचार करायला हवा, असा सल्ला देत नारायण राणे हे मंत्री झाल्यापासून काेकणावर संकट आले. त्यामुळे तेच पांढऱ्या पायाचे असल्याचा टाेला राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी लगावला.
3 वर्षांपूर्वी -
जळगावमध्ये भाजपाला अजून एक दणका मिळणार? | माजी उपमहापौर राष्ट्रवादीच्या वाटेवर
जळगाव शहर मनपातील भारतीय जनता पक्षाचे एक बंडखोर नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर असून येत्या काही दिवसात ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या या बंडखोर नगरसेवकाचा राष्ट्रवादी प्रवेश हा विधानसभा निवडणुकीची तयारी समजला जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात
जळगाव नशिराबाद येथील आठवडे बाजारामधील विकास सोसायटी कॉम्प्लेक्स मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जळगाव ग्रामीण मध्यवर्ती कार्यलयाचे उद्धघाटन शनिवारी झाले झाले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आ जयप्रकाश बाविस्कर, जिल्हा सचिव जमील देशपांडे, मनवीसे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, तालुकाध्यक्ष मुकुंदा रोटे, आशिष सपकाळे, रज्जक सय्यद, किरण तळेले आदींच्या उपस्थितीत उद्धघाटन झाले.
4 वर्षांपूर्वी -
जळगाव | शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांचे संपर्क कार्यालय | आमदारकीसाठी मोर्चेबांधणी?
शहरातील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांचे संपर्क कार्यालय जळगाव शहरातील मध्यवर्ती भागात तयार करण्यात आले असून आषाढी एकादशीचे औचित्य साधत कार्यालयाचे भव्य उद्घाटन केले जाणार आहे. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे कट्टर समर्थक असलेल्या मणियार बंधुनी लढ्ढा यांचे संपर्क कार्यालय सुरू केल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL