महत्वाच्या बातम्या
-
मोदींना मराठा आरक्षणाबद्दल हात जोडून विनंती केली आहे, ते पुढील निर्णय घेतील - संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासह विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी राऊत म्हणाले की, आधीच्या आघाड्यांमध्ये मुख्यमंत्रीपदाची वाटणी व्हायची. पण आता पाच वर्षे शिवसेनेकडेच मुख्यमंत्रीपद राहणार आहे. यामध्ये कोणतीही वाटाघाटी होणार नाही. शरद पवारांनी सुद्धा राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या भाषणात हेच म्हटले आहे. आमच्या कुणाच्या मनात अशी शंका नाही. फक्त प्रसारमाध्यमांमध्ये याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून वक्तव्य केले. महाविकास आघाडीमध्ये कोणतीही नाराजी नाही काँग्रेसमध्ये नाराजी नाही,असे राऊत म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
भाजपच्या नाराजांची संख्या वाढू नये म्हणून आपलं सरकार येणार असं सांगून फडणवीस व चंद्रकांतदादा आमदारांना थोपवत आहेत
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ही कोपरखळी लगावली आहे. देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ आहेत. सत्तेत आलं पाहिजे म्हणून त्यांनी अजित पवारांसोबत सत्ता स्थापन केली. आजही सरकार स्थापन करण्याची त्यांची तळमळ दिसत आहे, असा चिमटा खडसे यांनी काढला.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ | सरकार स्थापन करायला तळमळत आहेत - खडसेंची टीका
राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस अस्वस्थ आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी ते आजही तळमळत आहेत, अशी कोपरखळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना लगावली आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ही कोपरखळी लगावली आहे. देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Crime Patrol | भाजप नगरसेवकाची महिला तलाठ्याला शिवीगाळ करत मारहाण
नंदुरबारमधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक गौरव चौधरी यांनी तहसीलदार नियुक्त वाळू तपासणी पथकातील महिला तलाठींना मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या पथकातील महिला तलाठी निशा पावरा यांना नगरसेवक गौरव चौधरी यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे
4 वर्षांपूर्वी -
काल फडणवीस नाथाभाऊंच्या घरी गेले होते, आज नाथाभाऊ शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले
एकनाथ खडसेही शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी जळगाव दौऱ्यात खडसेंच्या घरी भेट दिली होती. त्यानंतर लगेचच खडसे पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्याने नव्याने चर्चेला सुरुवात झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस पहिल्यांदाच घरी आले असं नाही, याआधीही ते अनेकदा आमच्या घरी येऊन गेले - रक्षा खडसे
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस गेले अनेक दिली दौऱ्यावर आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी काही दिवस ते दौरे करत आहेत. अशात त्यांनी थेट जळगाव दौऱ्यात एकनाथ खडसे यांच्या घरी सदिच्छा भेट दिल्याने लोकांच्या भुवय्या उंचावल्या. भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंच्या घरी फडणवीस गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. खडसेंनी भाजप सोडतानाही फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते.
4 वर्षांपूर्वी -
मुक्ताईनगनरमध्ये भाजपाला कार्यालयही शिल्लक नाही? | फडणवीसांवर नाथाभाऊंच्या घरीच बैठकीची वेळ
राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सध्या दौऱ्यावर आहेत. वादळाने ज्या भागाला तडाखा बसला त्या भागाची पाहणी देवेंद्र फडणवीस करत आहेत. दरम्यान, काल (३१ मे) देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज थेट ते राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथे गेले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
भाजपमुक्त मुक्ताईनगर | नाथाभाऊंच्या दणक्यामुळे फडणवीसांवर पक्ष बांधणीची वेळ
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज जळगाव मुक्ताईनगराच्या दौऱ्यावर आहेत. फडणवीसांनी येथे पाहणी दौरा असल्याचं सांगण्यात आलं असलं तरी मुख्य कारण हे एकनाथ खडसे यांनी भाजपमुक्त केलेल्या मुक्ताईनगरची चिंता भाजपाला सतावत असल्याचं म्हटलं जातंय.
4 वर्षांपूर्वी -
उत्तर महाराष्ट्र भाजपमुक्तीकडे? | जळगाव भाजपच्या ३ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
जळगाव महापालिकेतील भारतीय जनता पक्षाला गळती सुरुच असल्याचं दिसत आहे. भारतीय जनता पक्षाच्या आणखी ३ नगरसेवकांनी शिवबंधन हाती बांधले. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जळगाव भारतीय जनता पक्षाच्या 3 नगरसेवकांचा मुंबईत पक्षप्रवेश केला. मुक्ताईनगर नगरपंचायतीमधील दहा आजी माजी नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश ताजा असतानाच आठवड्याभरातच भारतीय जनता पक्षाला आणखी एक धक्का मिळाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुक्ताईनगर भाजप मुक्त होण्याच्या दिशेने | भाजपच्या आजी-माजी 10 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
भारतीय जनता पक्षाला शिवसेनेने आणखी एक मोठा झटका दिला आहे. जळगावातील मुक्ताई नगरपालिकेचे 10 नगरसेवक हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. हे सर्वच्या सर्व 10 नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत. जळगाव महानगरपालिकेनंतर आता मुक्ताई नगरपालिकेतील नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने भाजपला हा एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यपालांच्या डोक्यात काय आहे तेच माहीत होत नाही – गुलाबराव पाटील
मागील अनेक महिन्यांपासून विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न प्रलंबित आहे. राज्य सरकारने एकूण 12 नियोजित आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवून कित्येक महिने झाले आहेत. मात्र, अद्याप कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या यादीला मान्यता दिलेली नाही. दरम्यान यावरून महाविकास आघाडीने सातत्याने राज्यपाल व भाजपला यामुळे घेरण्याचा प्रयत्न केला असल्याचे आपल्याला अनेकदा पाहायला मिळाले आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | भाजपच्या योगी सरकारचा कळस | गंगेत वाहणारे मृतदेह पोलिसांनी पेट्रोल-टायर टाकून जाळले
उत्तर प्रदेशातील कोरोना बळींची संख्या काही थांबताना दिसत नाही. कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू होत असल्याने मृतदेह जाळायला स्मशानभूमीही कमी पडू लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी गंगेच्या काठावरच मृतदेह दफन करायला सुरुवात केली आहे. सरकारने मनाई केल्यानंतरही लोक गंगेच्या काठावर मृतदेह पुरत आहेत. त्यामुळे पाहावं तिकडे मृतदेहच मृतदेह दिसत असून त्यांची मोजदाद करणंही कठीण झालं आहे
4 वर्षांपूर्वी -
खतांच्या किमतीवरून खासदार रक्षा खडसेंचं केंद्राला पत्र | भाजपमधूनही दरवाढीला तीव्र विरोध
केंद्र सरकारने खताच्या किमतीत वाढ केली आहे. त्याची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. पवारांनी थेट केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून खतांच्या किमतीतील दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने शेतकरी होरपळून निघालेला असताना ही दरवाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, अशी टीकाही शरद पवारांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
गिरीशभाऊंनी आवश्यक तेवढी लस महाराष्ट्रासाठी मिळवून दिला, तर मी भर चौकात त्यांचा सत्कार करीन - गुलाबराव पाटील
नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार गिरीश महाजन यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली होती. तसेच, त्यांच्या एका व्हायरल ऑडिओ क्लिपवरून दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळाली होती. आता पुन्हा एकदा गिरीश महाजन यांच्यावर महाविकासआघाडीतल्या एका नेत्यानं निशाणा साधला आहे. शिवसेना नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यातल्या लसीकरणावरून गिरीश महाजन यांना सुनावलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
रेमडेसिविर लोकांची गरज होती, मदतीसाठी केंद्राकडे न जाता फडणवीस पोलीस ठाण्यात गेले, ही शरमेची बाब
रेमडेसिविर इंजेक्शन्सचा वाद अजून पेटत आहे. यावर राज्याचे अन्न व औषध मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे प्रसार माध्यमांना माहिती देताना म्हणाले की, “भाजप नेते माझ्याकडे रेमडेसिविर उत्पादक ब्रुक कंपनीच्या मालकास १५ एप्रिल रोजी घेऊन आले. त्या वेळी कंपनीने निर्यात साठा विक्रीची राज्यात परवानगी देण्याची मागणी केली. रेमडेसिविर औषध राज्याला मिळेल या उदात्त भूमिकेतून माझ्या विभागाने १६ एप्रिल रोजी काही कंपन्यांना रेमडेसिविरचा निर्यात साठा राज्यात विक्री करण्यास संमती दिली होती. माझ्या विभागाने जेव्हा रेमडेसिविरची या कंपन्यांकडे मागणी नोंदवली, तेव्हा या कंपन्यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.
4 वर्षांपूर्वी -
मी सुद्धा विरोधी पक्षनेता होतो, पण फडणवीसांसारखा कुत्र्या-मांजराचा खेळ खेळलो नाही - खडसे
राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या सर्वात जास्त सक्रीय रुग्ण आढळून येत आहे. नवीन सक्रीय रुग्ण येण्याच्या बाबतीत राज्य सध्या देशात पहिल्या नंबरवर आहे. महाराष्ट्र राज्यात जानेवारी ते मार्च महिन्यातील 361 सक्रीय रुग्णांचे सॅम्पल घेण्यात आले. दरम्यान, त्यामध्ये जीनोम सीक्वेंसिंग केले असता 220 नमुन्यात डबल म्यूटेशन व्हायरस आढळले होते. हे व्हायरस आता राज्यातील अमरावती, अकोला, पुणे, नागपूर, वर्धा, ठाणे, औरंगाबाद आदी जिल्हात आढळून आले आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासन शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
खडसेंकडून महाजनांच जळगावातील साम्राज्य खालसा करण्याची तयारी | जिल्हा परिषदही धोक्यात?
काही दिवसांपूर्वीच शिवसेना आणि राष्ट्रवादीने जळगाव महानगरपालिकेत भाजपाला धूळ चारत स्वतःचा महापौर बसवला. त्यानंतर गिरीश महाजन यांना जोरदार धक्का दिल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. एकनाथ खडसे यांनी भाजपाला राम राम ठोकून राष्ट्र्वादीत प्रवेश केल्यानंतर उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी वेगाने हातपाय पसरत आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपची सत्ता असलेल्या नाशिक पालिकेत ऑक्सिजन बेड मिळेना | कोरोना रुग्णांवर ठिय्या आंदोलनाची वेळ
भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेत परिस्थिती गंभीर झाली आहे. मात्र महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे कोरोना रुग्णांना जीव देखील गमवावा लागू शकतो असे प्रकार घडत आहेत. तसाच एक भीषण प्रकार नाशिकमध्ये घडल्याचं पाहायला मिळतंय.
4 वर्षांपूर्वी -
मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ देखील यावेळी उपस्थित होते.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस सरकारमधील मंत्र्यांनी आयुक्तांमार्फत पैसे गोळा केलेले | मी त्यांना पुराव्यांसहित माहिती दिलेली
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अत्यंत अहंकारी, लबाड आणि दगलबाज आहेत. हातातील सत्ता गेल्यापासून फडणवीस यांचे मानसिक संतुलन ढळत चालले. देवेंद्र फडणवीसांकडे आतापर्यंत केलेल्या एका तरी भ्रष्टाचाराच्या तक्रारीच्या प्रकरणाची चौकशी झाली का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी केला आहे. अनिल गोटे यांनी याबाबतचे पत्रक देवेंद्र फडणवीसांवर विविध आरोप केले आहेत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL