महत्वाच्या बातम्या
-
छगन भुजबळांना जीवे मारण्याचं धमकी पत्र
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी आल्याचे वृत्त आहे. जर तुम्ही मनुस्मृतीला विरोध केला तर आम्ही तुमचा सुद्धा दाभोलकर, पानसरे करु असे धमकी पत्र भुजबळांना आल्याची बातमी आहे. भुजबळांच्या नाशिकमधील ‘भुजबळ फार्म’ हाऊसवर एका निनावी पत्राद्वारे ही धमकी देण्यात आल्याचं समजतं. दरम्यान, एनसीपीच्या नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनी नाशिक पोलिस आयुक्तांची भेट घेऊन, यासंदर्भात रीतसर तक्रार नोंदवणार असल्याची माहिती दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
नाशिकमध्ये भरधाव वाहनाने सात लहान मुलांना उडवलं, एकाचा जागीच मृत्यू
वडाळागावात राहणारी ७ लहान मुलं आज सकाळी ३ वाजण्याच्या सुमारास कालिका देवीच्या दर्शनाला घरातून निघाली होती. दरम्यान, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ येताच एका भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिल्याने सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील एकाचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रातील शिक्षकांना 'वंदे गुजरात' या गुजराती वाहिनीवरून प्रशिक्षणाचा 'विनोदी' घाट
काही दिवसांपूर्वी इयत्ता ८ वीच्या पुस्तकात गुजराती भाषेत मजकूर छापून आल्याचे गंभीर प्रकरण अजून ताजे असताना त्यात अजून एका शैक्षणिक ‘विनोदी’ निर्णय घेण्यात आला आहे. आता महाराष्ट्रातील शिक्षकांना थेट ‘वंदे गुजरात’ या गुजराती वाहिनीवरून प्रशिक्षण देण्याचा “अति विनोदी” घाट महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने घातला आहे.
6 वर्षांपूर्वी -
गुलाबराव पाटलांकडून मुख्यमंत्र्यांची खिल्ली, ब्राह्मण असल्याने पंचाग पाहून मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त काढतील
प्रसार माध्यमांनी लवकरच होऊ घातलेल्या राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील सहभागाविषयी सहज प्रश्न विचारला असता त्यांनी असं उत्तर दिल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवताना आमदार गुलाबराव पाटील यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
धुळे महापालिका: गिरीश महाजणांविरोधात आमदार अनिल गोटे आणि सामान्य कार्यकर्ते दंड थोपटणार?
भाजपने सध्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना उत्तर महाराष्ट्राचे सर्वेसेवा करण्याचा चंग बांधलेला दिसत आहे. परंतु जे जळगाव महानगर पालिका निवडणुकीत झालं ते ते संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात होईल अशी भोळी अशा सध्या भाजप वरिष्ठांच्या मनात निर्माण झाली असावी. त्यामुळे आगामी धुळे महानगर पालिकेची जवाबदारी सुद्धा स्थानिक आमदार अनिल गोटे यांच्याकडून वर्ग करून ती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचे माजी खासदार दिवंगत राजाभाऊ गोडसेंच्या कुटुंबीयांच राज ठाकरें'कडून सांत्वन
शिवसेनेचे नाशिकमधील पहिले खासदार राजाभाऊ तथा राजाराम परशराम गोडसे यांचे मुत्रपिंड विकाराने १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी पंचवटीतील खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले होते . त्यांचं वय ५९ वर्षांचे होते. कट्टर शिवसैनिक म्ह्णून ओळख असलेले राजाराम परशराम गोडसे हे काही काळ मनसेमध्ये सुद्धा होते.
6 वर्षांपूर्वी -
नाशिकमध्ये आम्ही केलेला विकास भाजप स्मार्ट सिटीच्या नावाखाली दाखवत आहे : राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्त शहरातील राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी संबोधीत करताना शहरातील अनेक गंभीर विषयांना हात घातला.
6 वर्षांपूर्वी -
नाशिककरांच्या तीव्र संतापापुढे भाजप नरमली, मुंढेंविरोधातील अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नगरसेवकांना दिले आहेत. त्यामुळे नाशिककरांच्या तीव्र संतापापुढे भाजप नरमली असल्याची चर्चा नाशिक शहरात रंगली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून बीड, औरंगाबाद, धुळे आणि जुन्नरच्या दौऱ्यावर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून ६ दिवसांच्या बीड, औरंगाबाद, धुळे आणि जुन्नरच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची सुरुवात औरंगाबाद पासून होणार असून तिथे निरनिराळ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांचा मनसेत प्रवेश, तसेच कार्यकर्त्यांशी परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाजवळ खड्ड्यांमुळे आदित्य ठाकरेंच्या आलिशान गाडीचे टायर फुटले
सध्या युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांच्या आलिशान गाडीला मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाजवळ खड्ड्यांमुळे फटका बसला असून त्यांच्या रेंजरोव्हर गाडीचे टायर फुटले. गुरुवारी मध्य रात्री ही घटना घडल्याचे समजत.
6 वर्षांपूर्वी -
मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा सरकारचा डाव: शरद पवार
मराठा समाजच्या आंदोलकांनी हिंसा तसेच जाळपोळीचे प्रकार थांबवून शांततेने आंदोलन करण्याला प्राधान्य द्यावे आणि मराठा व बहुजन समाजात फूट पाडण्याचा सरकारचा डाव हाणून पडावा असं आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
मराठा समाजाची ‘महाराष्ट्र बंद’ची हाक, पंढरपुरात इंटरनेट बंद
मराठा आरक्षणासाठी तसेच विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. मात्र या बंद मधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई या शहरांना वगळण्यात आलं आहे. परंतु राज्यात इतर ठिकाणी कडकडीत बंद पाळला जाणार आहे. सुरक्षेचं कारण पुढे करत पंढपुरातील इंटरनेट बंद करण्यात आल्याचं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
खडसे'साहेब ज्येष्ठ आहेत, त्यांना पंतप्रधानही व्हायला आवडेल
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल विधान केलं होत की, पक्षातील ज्येष्ठत्वाचा विचार केला तर मीच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. परंतु, पक्षाच्या आदेशाने चालावे लागत आहे. एकनाथ खडसेंच्या त्या प्रतिक्रियेला गिरीश महाजन यांनी उत्तर दिल आहे.
6 वर्षांपूर्वी -
संख्याबळ असलेले विरोधक नव्हे, तर संख्याबळ नसलेले राज ठाकरेच आगामी निवडणुकीत भाजपला उजवे ठरतील: सविस्तर
मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध पोटनिवडणुका, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल आणि भाजपाची घोडदौड पाहता, त्यांच्या समोर आमदार, खासदार असं मोठं संख्याबळ असणारे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारखे पक्ष सुद्धा फिके पडताना दिसत आहेत. तर पदवीधर निवडणुकांचे निकाल हे जवळजवळ निश्चित असतात आणि त्या निवडणुकीचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीशी संबंध जोडणे अवघड आहे. परंतु पदवीधर निवडणुकीत सुद्धा भाजपने कोकणात चमत्कार केला तर नाशिकमध्ये ते गाफील राहिल्याने जागा गमवावी लागली होती.
6 वर्षांपूर्वी -
मनसे'मुळे आमची मत फुटतात हे सेनेचं रडगाणं पालघर, जळगाव व सांगली निवडणुकीत निकाली?
मागील निवडणुकीत म्हणजे २०१४ मध्ये शिवसेनेने मराठी मतदाराला मनसे पासून प्रवृत्त करण्यासाठी, मनसेच्या उमेद्वारांमुळे शिवसेनेची मतं फुटतात असा दावा केला होता. परंतु पालघर लोकसभा पोटनिवडणूक, सांगली-मिरज महापालिका आणि जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या निकालामुळे शिवसेनेचा हा दावा पुसला गेल्यात जमा आहे. त्यामुळे या मुद्याचा शिवसेनेला २०१९ मध्ये काहीच उपयोग होणार नाही अशी शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
जळगावमध्ये शिवसेनेला जोरदार धक्का; तर इतर पक्षातील उमेदवार 'आयात'नीती भाजपच्या पथ्यावर
शिवसेनेचे माजी मंत्री तसेच जळगांव मधील दिग्गज नेते सुरेश जैन यांना जळगांव महानगर पालिका निवडणुकीत जोरदार धक्का बसला आहे. भाजपने स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. निवडणुकीपूर्वी इतर पक्षातील नगरसेवक फोडून स्वतःकडे आणल्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत झाला आहे. परंतु शिवसेनेचा मात्र धुव्वा उडाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पंकजा मुंडे बालिश असून त्यांना ती काय चिक्कीची फाईल वाटली का? : आंबेडकर
जर मराठा आरक्षणाची फाईल माझ्या टेबलवर आली असती तर क्षणाचा सुद्धा विलंब न लावता मी मराठा आरक्षणाच्या फाईलवर सही केली असती या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंच्या विधानाचा सर्वच थरातून समाचार घेतला आहे. त्यात आता प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा निशाणा साधला आहे.
6 वर्षांपूर्वी -
आज चौथ्या दिवशीही दूधकोंडी कायम, जनावरांसह चक्काजाम आंदोलन
राज्यातील दूधकोंडी चौथ्या दिवशीही सुरूच आहे. ग्रामीण भागात आंदोलन अजून तीव्र करण्यात आलं आहे. तिकडे सोलापुरात ‘दुधाच्या दरात वाढ करण्यात यावी’ या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून राज्यभर दूध बंद आंदोलन सुरुच आहे.
6 वर्षांपूर्वी -
तीच झलक! अमित ठाकरेंचा सक्रिय राजकारणातील प्रवेश ठरू शकतो तरुणांसाठी आकर्षणाचा विषय
राज ठाकरेंचे चिरंजीव सक्रिय राजकारणात कधी येणार हा सर्वांसाठी चर्चेचा विषय होते आहे. अर्थात प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे आणि राज ठाकरे अस संपूर्ण कुटुंबच एक विचारधारा असलेलं विद्यापीठ म्हणून महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला परिचित आहे. त्यामुळे असा वारसा लाभलेल्या कुटुंबातील तिसरी पिढी जेव्हा सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या कानावर पडू लागतात, तेव्हा त्याबद्दल कुतूहल निर्माण होणारच.
6 वर्षांपूर्वी -
जळगावात खडसे विरोधात प्रचार करतील या भीतीने खाविआ व भाजप युती तुटली
जळगाव महानगर पालिका निवडणुकीसाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि खान्देश विकास आघाडीचे सर्वेसेवा सुरेशदादा जैन यांचे भाजप-शिवसेना युतीचे सर्व प्रयत्नं एकनाथ खडसेंच्या एका अप्रत्यक्ष धमकीने हाणून पाडले आहेत. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी युती झाल्यास विरोधात प्रचार करण्याचे संकेत देताच युतीचा निर्णय बासनात गुंडाळण्यात आला.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल