23 February 2025 2:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती
x

युपी हादरलं | मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळील रेल्वे कॉलनीत मायलेकांची गोळ्या घालून हत्या

Double Murder, In Lucknow, Near Chief Minister Residence, Shoot Dead Case

लखनौ, २९ ऑगस्ट: उत्तर प्रदेशात मागील काही दिवसांपासून सुरू असलेलं हत्यांचं सत्र सुरूच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत दुहेरी हत्याकांडांच्या घटनेला २४ तास लोटत नाही, तोच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या रेल्वे कॉलनीत मायलेकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी घडली आहे. मृत रेल्वे अधिकाऱ्याची पत्नी आणि मुलगा असून, या घटनेनं लखनौ हादरलं आहे.

रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी (आयआरटीएस) आरडी बाजपेयी (RD Bajpai) यांच्या निवासस्थानी गुन्हेगारांनी घुसून त्यांची पत्नी आणि मुलाची गोळ्या झाडून हत्या केली आहे. तर त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. यामुळे लखनऊमध्ये खळबळ उडाली असून बंगल्याच्या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. लखनऊचे डीजीपी हितेश चंद्र अवस्थीदेखील घटनास्थळी पाहणी करत आहेत.

तत्पूर्वी पोलीस आयुक्त सुजीत पांडे हे घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी त्यांनी रेल्वेच्या गौतमपल्ली कॉलनीमध्ये वरिष्ठ अधिकारी आरडी बाजपेयी यांच्या पत्नीचा व मुलाचा मृतदेह सापडला आहे. दोघांनाही गोळी मारण्यात आली आहे. पाहणीवेळी ही दरोड्याची घटना दिसत नाहीय. पोलीस तपास करत आहेत.

पोलीस आयुक्त सुजित पांडे घटनेविषयी बोलताना म्हणाले, “रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरात ही घटना घडली आहे. अधिकाऱ्याच्या पत्नीसह मुलाचा मृतदेह बेडवर मिळाले आहेत. कुणीतरी गोळ्या घालून त्यांची हत्या केली असून, अधिकाऱ्याची मुलगी ट्रामामध्ये दाखल आहे. सध्या संपूर्ण घटनेची चौकशी केली जात आहे,” असं पांडे यांनी सांगितलं.

 

News English Summary: The wife and son of a senior railway officer were shot dead inside the government bungalow of the officer in Lucknow on Saturday. The police have launched an investigation into the matter.

News English Title: Double Murder In Lucknow Near Chief Minister Residence Shoot Dead Case News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x