महत्वाच्या बातम्या
-
BREAKING | योगींच्या मर्जीतील आणि युपीच्या माजी मुख्य सचिवांची निवडणूक आयुक्त पदी वर्णी | केंद्राचा निर्णय
केंद्र सरकारने मंगळवारी उत्तर प्रदेशच्या 1984 बॅचचे निवृत्त आयएएस अधिकारी अनुप चंद्र पांडे यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली. याबाबत अधिकृत लेखी घोषणा देखील करण्यात आली आहे. विशेष म्हणेज अनुप चंद्र पांडे हे उत्तर प्रदेशचे माजी मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या मर्जीतले अधिकारी म्हणून सर्वश्रुत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ | युपी भाजपच्या सोशल मीडिया पेजवरून मोदींचा फोटो हटवला
पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होत आहे. ही निवडणूक जिंकून सत्ता कायम राखण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीची तयारी आतापासूनच करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशासह ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांसाठीची तयारी भाजपनं सुरू केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंदेखील लक्ष घातलं आहे. विशेष म्हणजे आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ च्या पाश्वभूमीवर उत्तर प्रदेश भाजपच्या ट्विटर पेजवरून मोदींचा फोटो हटवला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भाजपच्या इतर राज्यांच्या सोशल मीडिया पेजवर मोदींचा फोटो असल्याचं स्पष्ट झालं आहे.
3 वर्षांपूर्वी -
मोठा निर्णय | भाजपाला पराभवाची शंका? | आगामी यूपीच्या निवडणुकीत मोदी यांच्या ऐवजी योगींचा चेहरा
आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला आणि आरएसएसला पराभवाची शंका सतावते आहे. परिणामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आरएसएसने भारतीय जनता पक्षासाठी योजना तयारी केली आहे. त्यानुसार 2022 मध्ये होणारी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतील बैठकीत घेण्यात आला आहे. त्यासोबतच महत्वाचा निर्णय म्हणजे आता पंतप्रधान मोदी विधानसभा निवडणुकीत प्रमुख चेहरा म्हणून दिसणार नाहीत.
3 वर्षांपूर्वी -
ममतादीदी इन ऍक्शन! पाडणार म्हणजे पाडणार | यूपीत निवडणुकीपूर्वी पिके आणि अखिलेश यांच्यात उच्चस्तरीय बैठक
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत मोदी-शहा यांच्यासहित देशभरातील भाजपाला धूळ चारणाऱ्या ममता बॅनर्जी आता देशभरात मोदी-शहांच्या हात धुवून मागे लागल्याचं पाहायला मिळतंय. भाजप आगामी म्हणजे २०२२ मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेशातील निवडणुकीत पराभूत झाल्यास २०२४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर देशात सत्तापालट होऊन मोदी पायउतार होतील हे जवळपास निश्चित होणार आहे. तसेच मेहनती आणि आक्रमक स्वभावाच्या तसेच राजकारणाचा दांडगा अनुभव असलेल्या ममतादीदी पंतप्रधान पदाच्या उमेदवार होण्याची शक्यता आता बळावली आहे. परिणामी त्या आक्रमक झाल्या असून संपूर्ण यंत्रणा कामाला लावत असल्याचं दिसतंय.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आणि शेतकरी आंदोलनामुळे संघ भाजपासाठी चिंतेत | मोहन भागवतांसह RSS'च्या मोठ्या नेत्यांची बैठक
कोरोना महामारी, शेतकरी आंदोलन, महागाई यासारख्या अनेक मुद्यांवरुन मोदी सरकार सध्या बॅकफूटवर येताना दिसत आहे. त्यामुळे मोदी सरकारची विश्वासार्हतादेखील कमी होत आहे. त्यासोबतच विरोधी पक्षांकडूनही सतत टीकेचा सामना करावा लागत आहे. पार्श्वभूमीवर भाजपची मदर विंग असलेल्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने यासाठी पुढाकार घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेश विधानसभा २०२२ | भाजपमध्ये भूकंपाचे संकेत | १२६ विद्यमान आमदार पक्षांतराच्या तयारीत
उत्तर प्रदेशाच्या राजकारणातून भूकंपाचे संकेत मिळू लागले आहेत. कोरोना आपत्तीत देश आणि जगभरात योगी सरकार आणि मोदी सरकारच्या कामांची पोलखोल झाली आहे आणि परिणामी जनता भाजपवर प्रचंड नाराज असल्याचे संकेत भाजपच्या आमदारांना मिळाले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील २०२२ मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी हे आमदार समाजवादी आणि बसपाच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. परिणामी भाजपमध्ये देखील धावपळ सुरु झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेश विधानसभा २०२२ | सत्ता जाण्याच्या भीतीने सरसंघचालक आत्तापासूनच स्वतः राजकीय बैठकांच्या मैदानात
कोरोना आपत्तीत योगी सरकारवर जनतेचा संताप वाढला असून हिंदुत्वाच्या राजकारणालाही फटका बसला आहे. तसेच मोदींसहित सर्वांनाच याचा फटका बसणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे योगीच्या भरोसे निवडणूक लढविण्यात काहीच अर्थ नाही हे आरएसएसला देखील समजल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश हातून गेला तर देश देखील जाणार हे भाजपाच्या पक्षश्रेष्ठींना देखील माहिती आहे. परिणामी संघ तसेच मोदी-शहा तिसरी लाट सोडून भाजप विरोधी लाट थोपविण्याच्या कामाला लागले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीत जगभरातून टीका झालेल्या उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांना आत्तापासूनच निवडणुकांचे वेध
संपूर्ण देशात कोरोना काळात सर्वात भयावह स्थिती पाहायला मिळाली ती उत्तर प्रदेश राज्यात. जगभरात ते चित्र उमटले. परंतु, आता उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना निवडणुकांचे वेध लागले आहेत. “आम्ही कोरोनाला हरवलं, आता विधानसभा निवडणुकीतही विजय मिळवू”, असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अंधभक्तांचा भाव ४० पैसे वरून २ रुपये? | योगींचं टूलकिट ऑडिओ क्लिप व्हायरल | सपोर्ट करणाऱ्याला २ रुपये
काँग्रेस-भारतीय जनता पक्षातील टूलकिट वाद अजून शमलेला नसताना नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे. कारण आता आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक कथित ऑडिओ व्हायरल झाला आहे. त्यात योगी आदित्यनाथ सपोर्ट करणाऱ्यांना २ रुपये देणार असल्याचं सांगत आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या समाज माध्यमांच्या टीमचा हा ऑडिओ असल्याचा दावा केला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीत यूपीत न फिरकलेले भाजप नेते आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यरत | बैठकांचे सत्र
यूपीतील कोरोना हाताळणीवरून योगी सरकारची देशभर निंदा झाली आहे. त्यामुळे योगी सरकारसहित मोदी सरकारच देखील अडचणीत आलं आहे. अगदी वाराणसी या मोदींच्या मतदारसंघात २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोदी खतरे मे असे वारे वाहू लागल्याने भाजपच्या चिंतेत भर पडली आहे. त्यात गंगा नदी आणि गंगा घाट कोरोना मृतांनी भरल्याचे देशाने पहिले तरी मोदी त्यांच्या मतदारसंघात फिरकले देखील नाहीत हे विशेष म्हणावे लागेल.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | उत्तर प्रदेशातील रायबरेलीत अधिक पैसे घेऊन भिंतीतून दारू विक्री होतेय
देशात गेल्या एका दिवसात आणखी दोन लाख ११ हजार २९८ जणांना करोनाची लागण झाल्याने बाधितांची एकूण संख्या दोन कोटी ७३ लाख ६९ हजार ०९३ वर पोहोचली आहे. तर करोनातून बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवरून गेले असल्याचे गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेश | गोरखपूरमध्ये एका बेडसाठी 100 वेटिंगवर, रुग्ण मृत्यूच्या प्रतीक्षेत | भीषण परिस्थिती
देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. शनिवारी देशभरात 2 लाख 40 हजार 766 नवीन संक्रमितांची नोंद झाली आहे. देशात 35 दिवसानंतर संक्रमितांचा आकडा 2.5 लाखांच्या खाली आला. यापूर्वी, 16 एप्रिलला 2 लाख 34 हजार 2 रुग्ण सापडले होते. दरम्यान, या महामारीमुळे मृत्यू होण्याचा आकडा चिंताजनक आहे. शनिवारी कोरोनामुळे 3,736 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीत उत्तर प्रदेशातील संपूर्ण आरोग्य व्यवस्थाच राम भरोसे - अलाहाबाद हायकोर्ट
मागील 24 तासात देशामध्ये 2 लाख 63 हजार 21 जण कोरोना संक्रमित आढळून आले. हा सलग दुसरा दिवस होता, जेव्हा एकाच दिवसात 3 लाखांपेक्षा कमी संक्रमित आढळून आले. यापूर्वी रविवारी 2.82 लाख लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. सोमवारी देशात कोरोनाचे 3 रेकॉर्ड झाले. गेल्या 24 तासांत 4 लाख 22 हजार 391 लोकांनी कोरोनावर मात केली.
4 वर्षांपूर्वी -
योगी सरकारच्या कृपेने युपीतील कोरोना रुग्ण आत्मनिर्भर | इस्पितळात घरूनच खाटा आणण्याची वेळ
देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा सलग दुसऱ्या दिवशी चार लाखांपेक्षा कमी आढळला आहे. मंगळवारी देशभरात 3 लाख 48 हजार 417 नवीन संक्रमित सापडेल असून, 4198 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारनंतर सलग दुसऱ्या दिवशी ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा नवीन संक्रमितांपेक्षा जास्त आहे. मागील 24 तासात 3 लाख 55 हजार 282 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO उत्तर प्रदेश | मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेत जमले 20 हजार लोकं | प्रचंड गर्दीसमोर पोलिसही हतबदल
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात सोमवारी 3 लाख 29 हजार 379 नवीन संक्रमित आढळले, पण 3.55 लाख संक्रमित ठीकही झाले. 62 दिवसानंतर ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा नवीन रुग्णांपेक्षा जास्त आहे. यापूर्वी, 9 मार्चला 17,873 कोरोना रुग्ण आढळले होते, तर 20,643 रुग्ण ठीक झाले होते. दुसरी दिलासादायक बाब म्हणजे, सोमवारी मागील पंधरा दिवसातील सर्वात कमी रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी, 26 एप्रिलला 3.19 लाख रुग्ण आढळले होते. दरम्यान, सोमवारी 3,877 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
लोकं डोळ्यादेखत मरताहेत, आम्ही हतबल ठरतोय; भाजप आमदाराचं मुख्यमंत्री योगींना पत्र
देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा विस्फोट होताना पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे चार लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 3 हजार 915 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सलग दुसऱ्या दिवशी 24 तासातील कोरोना रुग्णसंख्येने चार लाखांचा टप्पा ओलांडला. गेल्या 24 तासात भारतात 4 लाख 14 हजार 188 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदींच्या वाराणसीत आरोग्य सुविधांचे तीनतेरा | गरजेच्यावेळी आमचे खासदार नरेंद्र मोदी कुठे आहेत? जनतेचा सवाल
कोरोनाची दुसऱ्या लाटेने हाहाःकार माजवला आहे. यातच बुधवारी देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला. मागील 24 तासात देशभरात 4 लाख 12 हजार 373 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर 3,979 रुग्णांचा मृत्यूही झाला. दिलासादायक बाब म्हणजे, 3.24 लाख रुग्ण ठीकही झाले.
4 वर्षांपूर्वी -
ऑक्सिजनअभावी होणारे मृत्यू हे गुन्हेगारी कृत्य असून ते नरसंहारापेक्षा कमी नाही - अलाहाबाद हायकोर्ट
ऑक्सिजन पुरवठ्यासाठी जबाबदारी असणाऱ्यांना अलाहाबाद हायकोर्टाने चांगलंच फटकारलं आहे. रुग्णालयात ऑक्सिजनअभावी करोना रुग्णांचा मृत्यू होणं गुन्हेगारी कृत्य असून नरसंहारापेक्षा कमी नाही अशा शब्दांत हायकोर्टाने सुनावलं आहे. न्यायमूर्ती सिद्धार्थ वर्मा आणि अजित कुमार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु होती. लखनऊ आणि मेरठमध्ये ऑक्सिजनअभावी होणाऱ्या करोना रुग्णांच्या मृत्यूसंबंधी समाज माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या पोस्टची दखल घेताना खंडपीठाने हा निष्कर्ष नोंदवला.
4 वर्षांपूर्वी -
युपी जिल्हा पंचायत निवडणूक | राम नगरी अयोध्येत भाजपचा पराभव | मोदींच्या काशी आणि श्रीकृष्णांच्या मथुरेतही पराभव
पश्चिम बंगालनंतर आता उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुकांनी भारतीय जनता पक्षाची झोप उडण्याची शक्यता आहे . कारण या निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मोठा झटका बसला आहे. अयोध्येपासून मथुरेपर्यंत आणि काशीसह राज्यभरात सपाने भारतीय जनता पक्षाला चितपट केले आहे. महत्वाचे म्हणजे हे तिन्ही जिल्हे योगी आदित्यनाथ सरकारच्या अजेंड्यामध्ये नेहमी असतात. या तीन्ही जिल्ह्यांमध्ये गेल्या चार वर्षांपासून योगी सरकारने खूप मेहरबानीदेखील केली आहे. यामुळे या तिन्ही जिल्ह्यांत झालेली पडझड भाजपाला येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मोठे संकेत देत आहे.
4 वर्षांपूर्वी -
५० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार आणि क्रूर हत्या | मंदिरातील पुजाऱ्यावरही गुन्हा
उत्तर प्रदेशच्या बदायूमध्ये एका ५० वर्षीय आंगनवाडी कर्मचारी असलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कारानंतर तिची क्रूर हत्या करण्यात आलीय. सामूहिक बलात्कारानंतर महिलेला मारहाण करण्यात आली. धक्कादायक म्हणजे, पीडित महिलेच्या शरीरात खासगी अंगांत लोखंडी रॉड घुसवल्याचंही समोर आलंय.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- Canara Robeco Mutual Fund | पैशाने पैसा वाढवा, सरकारी बँकेची म्युच्युअल फंड योजना पैसा दुप्पट करते - Marathi News