23 February 2025 7:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

उत्तर प्रदेशचे सरकार भ्रष्टाचारी आणि प्रशासन गुंडांच्या हातात होते | योगी आदित्यनाथांनी ते सोडविले - नरेंद्र मोदी

Uttar Pradesh Assembly Election 2022

अलिगड, १४ सप्टेंबर | उत्तर प्रदेश सरकार भ्रष्टाचारी आणि प्रशासन गुंडांच्या हातात होते, ते योगी आदित्यनाथ यांनी सोडविले. आता केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार हातात हात घालून विकासाची दमदार पावले टाकत आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशच्या विधानसभेने विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा बिगुल वाजवला. अलिगडमध्ये राजा महेंद्र प्रताप राज्य विद्यापीठाची कोनशिला मोदी यांच्या हस्ते बसविण्यात आली तसेच त्यांनी उत्तर प्रदेश डिफेन्स कॉरिडॉरच्या प्रदर्शनालाही त्यांनी भेट दिली. त्या वेळी झालेल्या कार्यक्रमात मोदी यांनी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या विकासकामांची प्रशंसा केली.

उत्तर प्रदेशचे सरकार भ्रष्टाचारी आणि प्रशासन गुंडांच्या हातात होते, योगी आदित्यनाथांनी ते सोडविले – The government of Uttar Pradesh was corrupt and the administration was in the hands of goons it was solved by Yogi Adityanath said PM Modi :

पंतप्रधान मोदी म्हणाले, की एक काळ असा होता, उत्तर प्रदेशात सरकार भ्रष्टाचारी लोकांच्या हातात होते आणि प्रशासन व्यवस्था गुंडांच्या हातात होती. योगी आदित्यनाथ यांनी सरकार आणि प्रशासन व्यवस्था दोन्ही भ्रष्टाचारी लोक आणि गुंड यांच्या हातातून सोडविली आहे. केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार हातात हात घालून उत्तर प्रदेशाच्या विकासासाठी दमदार पावले टाकत आहे.

मोठ्या आणि मध्यम गुंतवणूकदारांसाठी उत्तर प्रदेश आज आकर्षणाचे राज्य बनले आहे. संरक्षण उत्पादनापासून ते वस्त्रोद्योगापर्यंत तसेच करमणूक उद्योगापर्यंत विविध स्तरांवर उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. याचा फायदा राज्यातल्या स्थानिक युवकांना रोजगारासाठी आणि नवीन रोजगार निर्मितीसाठी होतो आहे, याकडे पंतप्रधान मोदींनी आवर्जून लक्ष वेधले. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने आठ कोटी जनतेचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण केल्याची घोषणा देखील यांनी केली.

या दौऱ्याच्या निमित्ताने मोदी यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल वाजविला. राजा महेंद्र प्रताप विद्यापीठ 2023 मध्ये बांधून पूर्ण होणे अपेक्षित आहे. 79 एकरमध्ये वसलेले हे विद्यापीठ राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शिक्षणाचे सर्वात महत्त्वाचे केंद्र बनेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी या काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहरा असतील, अशी घोषणा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी केली. एआयएमआयम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. मायावती आणि अखिलेश यादव ब्राह्मणांसह अनेक समाजाचे मेळावे घेत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी राजा महेंद्र प्रताप विद्यापीठाचा कोनशिला समारंभ आणि उत्तर प्रदेश डिफेन्स कॉरिडॉरच्या प्रदर्शनाला भेट याचे निमित्त साधून राज्यात भाजपच्या प्रचाराचा ही बिगुल वाजविला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: The government of Uttar Pradesh was corrupt and the administration was in the hands of goons it was solved by Yogi Adityanath said PM Modi.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x