कोरोना आपत्तीत यूपीत न फिरकलेले भाजप नेते आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यरत | बैठकांचे सत्र
लखनऊ, ०१ जून | यूपीतील कोरोना हाताळणीवरून योगी सरकारची देशभर निंदा झाली आहे. त्यामुळे योगी सरकारसहित मोदी सरकारच देखील अडचणीत आलं आहे. अगदी वाराणसी या मोदींच्या मतदारसंघात २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोदी खतरे मे असे वारे वाहू लागल्याने भाजपच्या चिंतेत भर पडली आहे. त्यात गंगा नदी आणि गंगा घाट कोरोना मृतांनी भरल्याचे देशाने पहिले तरी मोदी त्यांच्या मतदारसंघात फिरकले देखील नाहीत हे विशेष म्हणावे लागेल. मात्र निवडणुकीत फटका बसण्याच्या शंकेने मात्र त्यांनी भाजपाची यंत्रणा कार्यरत केली आहे.
विशेष म्हणजे सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्याबद्दल राज्यातील नेतृत्व बेजबाबदारपणे वागत असल्याचं भारतीय जनता पक्षाचे मंत्री आणि आमदाराचं सार्वजनिकपण बोलत आहेत. तर दुसरीकडे विधानसभेच्या अनुषंगाने महत्त्वाच्या असलेल्या पंचायत निवडणुकांमधील प्रदर्शनही पक्षाच्या जिव्हारी लागलेलं आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे महासचिव बी.एल. संतोष हे युपीच्या दौऱ्यावर आहेत. संतोष यांनी सोमवारी लखनऊमध्ये ‘फेस टू फेस आणि वन टू वन’ स्वरूपात योगींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांशी आणि पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री जय प्रताप सिंग, वैद्यकीय शिक्षण आणि अर्थमंत्री सुरेश खन्ना आणि कायदा मंत्री ब्रिजेश पाठक यांच्यासह सात मंत्र्यांशी त्यांनी वैयक्तिक भेटी घेऊन चर्चा केली.
यात करोना काळातील कामं आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासंदर्भातील रणनीतीबद्दल सूचना करण्यास सांगितलं. भाजपा आणि सरकारमध्ये समन्वय नसल्याचं तसंच पक्षाचे नेते प्रशासनाकडून कामं करून घेण्यास असमर्थ ठरले असल्याची माहिती देण्यात आली असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मंगळवारी संतोष हे उत्तर प्रदेशचे दोन्ही उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा आणि केशव प्रसाद मौर्या यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं वृत्त आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झालेली असतानाच संतोष हे लखनऊमध्ये दाखल झाले. त्यामुळे मंत्रिमंडळात मोठे फेरबद्दल होणार असल्याचं बोललं जात आहे.
News English Summary: Bharatiya Janata Party General Secretary B.L. Santosh is on a tour of UP. Santosh held discussions with ministers and party leaders in Yogi’s cabinet in the form of ‘Face to Face and One to One’ in Lucknow on Monday. He also had discussions with Chief Minister Yogi Adityanath.
News English Title: Uttar Pradesh Assembly Election 2022 BJP senior leaders meetings are began news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम