21 November 2024 10:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Vastu Tips for Money | वास्तुशास्त्रानुसार घराबाहेर या 6 गोष्टी नसणं हे आर्थिक भल्याचे मानले जाते, अन्यथा घरात दारिद्र्य येते

Vastu Tips for Money

Vastu Tips for Money ​​| वास्तुशास्त्रानुसार घरात वास्तुदोष नसताना सकारात्मक ऊर्जा राहते. पण वास्तुमध्ये काही गडबड झाली तर घरात क्लेश येतो, प्रगतीत अडथळे आणि समस्या कायम असतात. वास्तुनुसार, प्रत्येक दिशेला कोणत्या ना कोणत्या देवतेची वस्ती आहे असे मानले जाते. यामुळे घराबाहेरील गोष्टींचाही परिणाम होतो. जाणून घ्या घराबाहेर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी.

कचरा :
वास्तुनुसार ज्या घरांमध्ये स्वच्छतेची दिशा आणि वस्तू योग्य ठेवल्या जातात, तिथे लक्ष्मी मातेचे वास्तव्य असते. अनेक जण आपल्या घरासमोर कचरा गोळा करतात. घराच्या मुख्य दारासमोर कचरा गोळा केल्यास दारिद्र्य येते. अशा घरांमध्ये संकट, आजार आणि धनहानी होण्याची शक्यता असते.

काटेरी वनस्पती :
वास्तुनुसार घराच्या मुख्य दारासमोर काटेरी झाडे कधीही लावू नयेत. असे केल्याने घरात सुख-समृद्धी नांदत नाही, असं वास्तुशास्त्र सांगतं.

दगड:
वास्तुनुसार, अनेक वेळा लोक त्यांच्या घरासमोर मोठ्या विटा आणि दगड गोळा करतात. घरासमोरील मोठमोठ्या विटा-दगडांमुळे जीवनात अडचणी निर्माण होतात, असे मानले जाते.

विद्युत खांब :
वास्तुनुसार, घराच्या अगदी समोर विजेचा खांब नसावा. घरासमोरील विजेच्या खांबामुळे घरातील सदस्यांमध्ये विसंवादाचा विश्वास निर्माण होती असं वास्तुशास्त्र सांगतं.

दुर्गंधी किंवा घाण पाणी:
वास्तुशास्त्रानुसार, ज्या घरांमध्ये समोर घाण पाणी साठवले जाते तिथे लक्ष्मी मातेचे वास्तव्य टिकत नाही. घरासमोर घाण पाणी साचल्याने प्रगतीत अडथळ्यांना सामोरे जावे लागते.

उंचवटयाचा रस्ता असणे :
वास्तुनुसार, घराचा मुख्य दरवाजा समोरील रस्त्यापेक्षा उंच असावा. ज्यांचे घर भौगोलिक कारणांमुळे समोरील रस्त्यापेक्षा खाली आहे, तिथे नकारात्मक ऊर्जा राहते. अशा घरातील सदस्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Vastu Tips for Money wealth in home check details 05 May 2023.

हॅशटॅग्स

#Vastu Tips For Money(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x