महत्वाच्या बातम्या
-
VIDEO | भाजप खासदाराच्या कुटुंबाकडून सुनेचा छळ आणि मारहाण | मदतीची याचना
वर्ध्याचे भारतीय जनता पक्षाचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेने गंभीर आरोप केला आहे. रामदास तडस यांच्या सुनेने आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर त्यांना मारहाण होत असल्याचा दावा आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी रडत रडत व्हिडीओ शूट करुन राष्ट्रवादीकडे मदत मागितली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडे त्यांनी मदतीची याचना केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
खऱ्या बापाची औलाद असेल तर हे आरोप सिद्ध करुन दाखवा | वडेट्टीवारांचे गोपीचंद पडळकरांना आव्हान
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा दावा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांकडून करण्यात आला होता. आता पडळकरांच्या या आरोपावर वडेट्टीवारांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तु जर बेछूट आरोप करत असशील, तु खऱ्या बापाची औलाद असशील तर वाटेल तसे आरोप करण्यापेक्षा हे आरोप सिद्ध करुन दाखव.
4 वर्षांपूर्वी -
MP Bhavana Gawali | तपासासाठी ED ची टीम वाशिममध्ये दाखल
शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या शंभर कोटीच्या घोटाळा प्रकरणी संस्थेच्या चौकशीसाठी ईडीची टीम वाशिम येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल झाली आहे. तीन तासापासून ईडीची टीम कार्यालयात चौकशी करत आहे. रिसोडनंतर दुसऱ्यांदा ईडीची टीम वाशिम जिल्ह्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
यापुढे शिवसेनेने आमच्याशी पंगा घेतला तर आम्ही जशास तसे उत्तर देणार - चंद्रशेखर बावनकुळे
देवेंद्र फडणवीस सरकारने 31 जुलै 2019 ला वटहुकूम काडून ओबीसींचे 27 टक्के आरक्षण वाचवले. त्यानंतर राज्यात जिल्हा परिषद निवडणुकाही त्या वटहुकूमामुळेच ओबीसींना मिळालेल्या आरक्षणानुसारच झाल्यात. दुर्दैवाने आमचे सरकार जाऊन नवीन सरकार आले आणि तो वटहुकूम रद्द झाला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार न्यायालयात इच्छाशक्ती अभावी ओबीसी आरक्षण वाचवू शकले नाही. मुळातच त्यांना ओबीसी आरक्षण टिकवायचे नसून या आरक्षणाविनाच त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवायच्या आहेत, असा आरोप भाजपचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
चंद्रपूर | जादूटोण्याच्या संशयावरून सात जणांना भर चौकात हातपाय बांधून जबर मारहाण
जादूटोण्याच्या संशयावरून सात जणांना भर चौकात हातपाय बांधून जबर मारहाण करण्यात आली. यात वयोवृद्ध गटातील महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. ही संतापजनक घटना दुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील वणी बुद्रुक येथे शनिवारी घडली. यात पाच जण जबर जखमी झाले असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
यशोमती ठाकूर यांच्या बोलण्याचा विपर्यास केला जातोय | अजित पवारांवरील आरोपांवर सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दरम्यान, अजित पवार यांच्याकडून आम्हाला साथ दिली जात नसल्याचा ठपका यशोमती ठाकूर यांनी यावेळी ठेवला होता. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहेत. अजित पवार सहकार्य करत नाही असे जरी बालविकास मत्र्यांनी म्हटले असले तरी त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नये असे आवाहन सुळे यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
वाशीम | किरीट सोमय्या यांच्या ताफ्यावर दगडफेक | शिवसैनिकांनी दगडफेक केल्याचा आरोप
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली आहे. शिवसैनिकांनी ही दगडफेक केल्याचं सांगण्यात येत आहे. सोमय्यांच्या ताफ्यावर दगडफेक आणि शाईफेक करण्यात आली. शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप सोमय्यांनी केले होते, याची पाहणी करण्यासाठी ते निघाले होते.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | कोर्टाने आमदार देवेंद्र भुयार यांना ३ महिन्यांच्या कारावास ठोठावला
वरुड येथील तत्कालीन तहसीलदाराला अर्वाच्च शिवीगाळ करून मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आमदार देवेंद्र भुयार यांना सोमवारी जिल्हा न्यायालयाने तीन महिन्याच्या कारावासासह 45 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षेचा समावेशही करण्यात आला आहे. देवेंद्र भुयार सध्या मोर्शी-वरूड मतदारसंघाचे आमदार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेनेची आडकाठी नाही, पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न | खासदार भावना गवळींनी सांगितलं वास्तव
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या लेटर बॉम्बवर वाशिम-यवतमाळ मतदारसंघाच्या शिवसेनेचे खासदार भावना गवळी यांनी रविवारी प्रतिक्रिया दिली. जिल्ह्यातील नॅशनल हायवेची जवळपास 90 टक्के कामे ही पूर्ण झाली आहेत. ज्या ठिकाणी ही कामे राहिलेली आहेत. ती फॉरेस्ट किंवा काही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही, तर काही ठिकाणी शेतकरी न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे तेथील काम थांबवलेले आहे. शिवसेनेने कुठल्याही कामात आडकाठी केली नाही, किंवा कोणतेही काम थांबवलेले नाही. गडकरी साहेबांकडे काहीतरी चुकीची माहिती गेली असावी, मी स्वतः गडकरी साहेबाना भेटून या सम्पूर्ण विषयावर चर्चा करणार असल्याचे स्पष्टीकरण खासदार गवळी यांनी दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
संजय राठोड प्रकरणात चौकशीअंती वस्तुस्थिती समोर येईल, अनेकदा बिनबुडाचे आरोप होत असतात - अजित पवार
पुण्यात एका तरुणीने आत्महत्या केल्यानंतर मंत्रिपद गमावलेल्या संजय राठोड यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. माजी मंत्री संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार यवतमाळ पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे. इतकच नाही, तर अजूनही तीच मागणी करून छळत असल्याचा आरोपही त्या पीडित ३० वर्षीय महिलेने केला होता.
4 वर्षांपूर्वी -
संजय राठोड अडचणीत | घाटंजीत एसआयटीचे पथक दाखल | तक्रारदार महिलेचा जबाब नोंदवणार
पुण्यात एका तरुणीने आत्महत्या केल्यानंतर मंत्रिपद गमावलेल्या संजय राठोड यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. माजी मंत्री संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार यवतमाळ पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे. इतकच नाही, तर अजूनही तीच मागणी करून छळत असल्याचा आरोपही त्या पीडित ३० वर्षीय महिलेने केला होता.
4 वर्षांपूर्वी -
खोट्या जातप्रमाणपत्राच्या आधारे मागासवर्गीयांचा अधिकार मारणाऱ्यांचं आदिवासींसाठी आता प्रेम उफाळून आलाय - यशोमती ठाकूर
राज्याच्या महिला व बालकल्याण विभागात जवळपास 800 कोटींचा महाघोटाळा झाल्याचा सनसनाटी आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला होता. यासंदर्भात केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे तक्रारही केली होती. तर याला प्रत्यूत्तर देताना खोट्या जातप्रमाणपत्राच्या आधारे ज्यांनी मागासवर्गीयांचा अधिकार मारला, असा ज्यांच्यावर आरोप आहे, आदिवासींच्या जमीनी लाटल्याचा ज्यांच्यावर आरोप आहे, त्यांना आदिवासींबाबत आताच का प्रेम उफाळून आले आहे, असा सवाल महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी विचारला होता.
4 वर्षांपूर्वी -
राठोड यांची महिलेच्या आरोपांवर पत्रकार परिषद | यापूर्वी राष्ट्रवादीच्या विटेकरांवर आरोप करणाऱ्या महिलेवर ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल होता
शिवसेना नेते संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका महिलेने केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाल्याने राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. संस्थेत नोकरी मिळावी म्हणून माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात आले आहेत. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही. सध्या या संस्थेशीही माझा संबंध नाही. केवळ वैफल्यातून हे आरोप करण्यात आले आहेत. माझं राजकीय करिअर संपवण्याचा हा प्रयत्न आहे, असा दावा संजय राठोड यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
ओबीसी राजकीय आरक्षण | आम्ही आघाडी सरकारला डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देतोय अन्यथा...काय म्हणाले बावनकुळे?
भारतीय जनता पक्ष अपेक्षेप्रमाणे आता जातीय मुद्यांवर लक्ष केंद्रित करू लागल्याचं समोर येतंय. मराठा आरक्षणावरून १०२’वी घटना दुरुस्ती करून ५० टक्के आरक्षणाची मर्यादा कायम ठेवून गुंता वाढवला आहे. तर दुसरीकडे राजकीय ओबीसींच्या आरक्षणावरून केवळ ‘ओबीसी आरक्षण’ हा शद्बप्रयोग करून संभ्रम वाढवत असल्याचं पाहायला मिळतंय.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | महागाईमुळे मोदी समर्थक खासदार नवनीत कौर यांचा चुलीवर स्वयंपाक | समाज माध्यमांवर खिल्ली
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. चुलीवर भाकरी करताना खासदार कौर या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्यामुळे, केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी तर त्यांनी हा व्हिडिओ बनवला नाही ना, असा प्रश्न नेटीझन्स विचारत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पुजा चव्हाण आत्महत्या | त्या संवादातील राठोड नावाची व्यक्ती कोण? | रिकॉर्डिंग फॉरेन्सिक लॅबकडे पाठवलं
पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी तपास करणाऱ्या पुणे पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा लागला आहे. आत्महत्येच्या पाच दिवस आधी पूजा चव्हाण आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यात अनेकदा फोनवरुन संभाषण झालं होतं. या सर्व संभाषणांचं रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोल के दाम कम हुये की नही हुये? | वर्ध्यात पंतप्रधानांची ऑडिओ क्लिप वाजवत काँग्रेसची सायकल यात्रा
‘पेट्रोल के दाम कम हुये की नही हुये’ या पंतप्रधानाच्या जुन्या भाषणाच्या क्लिपने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला आहे. हीच क्लिप कारंजा तालुक्यात युवक काँग्रेसच्यावतीने इंधन आणि महागाईच्या विरोधात सायकल यात्रा काढली होती. माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात कारंजा ते आर्वी अशी 45 किलोमीटरची ही सायकल यात्रा शुक्रवारी काढण्यात आली.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी हिताची ठिबक सिंचन अनुदान योजना 2021-22 | कसा लाभ घ्याल - वाचा माहिती
सन २०१५-१६ पासून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत – प्रति थेंब अधिक पीक घटकाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. सदर घटकामध्ये सुक्ष्म सिंचन व पाणी व्यवस्थापनाच्या पुरक बाबी अशा दोन उप घटकांचा समावेश आहे. यामध्ये केंद्र व राज्य हिश्श्याच्या निधीचे प्रमाण ६०:४० असे आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | झारखंड आमदार खरेदी प्रकरण | दिल्लीतील फुटेजनुसार बावनकुळे आणि इतर भाजप नेत्यांशी बैठक
झारखंडमधील झामुमो-काँग्रेस आघाडी सरकार पाडण्यासाठी कट उघडकीस आल्यानंतर झारखंड पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आहे. या कटात सहभागी भाजप प्रदेश सरचिटणीस तथा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष चरणसिंग ठाकूर, व्यावसायिक जयकुमार बेलखेडेंसह ६ जणांची पोलिस चाैकशी करणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
झारखंड सोरेन सरकारमधील आमदार खरेदी कटात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंचे नाव | आरोपीचा कबुलीजबाब
झारखंडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. झारखंड पोलिसांच्या विशेष शाखेनं एक कारवाई करत तीन जणांना अटक केली. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचं सरकार पाडण्याचा कट तिघांनी रचला होता, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रांचीतील एका हॉटेलमध्ये धाड टाकत तिघांना अटक केली. हे तिघे सरकारमधील बाराहून अधिक आमदारांच्या संपर्कात होते अशी माहितीही समोर आली आहे. तिघांच्या अटकेनंतर काँग्रेसच्या आमदाराने मोठा गौप्यस्फोट केला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला, ही आहे पुढची टारगेट प्राइस - NSE: ADANIPORTS