महत्वाच्या बातम्या
-
अनिल देशमुख यांची सीबीआयच्या FIR विरोधातली याचिका हायकोर्टाने फेटाळली
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह राज्य सरकारला मुंबई हायकोर्टाने दणका दिला आहे. त्यांची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. सीबीआयने अनिल देशमुखप्रकरणी दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणात महाराष्ट्र सरकारला दिलासा मिळालेला नाही. एफआयआरमधील आक्षेपार्ह भाग वगळण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. न्या. संभाजी शिंदे व न्या. निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला असून अद्याप सुनावणी सुरु आहे.
3 वर्षांपूर्वी -
मोठी कारवाई | अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. 100 कोटी वसुलीप्रकरणामध्ये ईडीने ही पहिलीच मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे अनिल देशमुखांच्या अडचणी या वाढल्या आहेत. ईडीने अनिल देशमुखांच्या नागपुरातील संपत्तीवर जप्ती आणली असल्याचे वृत्त आहे.
3 वर्षांपूर्वी -
पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी नोंदवलेल्या जबाबामुळे संजय राठोड यांना मोठा दिलासा | जबाबात काय?
राज्य सरकारला मोठ्या टीकेचा सामना करावा लागलेलं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सध्या मिटण्याची शक्यता आहे. त्याला कारण आहे पूजाच्या आई वडिलांनी पोलिसांकडे नोंदवलेला जबाब. कारण, आमची कोणा विरोधात काही तक्रार नसल्याचा जबाब पूजा चव्हाणच्या आई वडिलांनी पोलिसांकडे नोंदविला आहे. अशी माहिती झोन पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली. तर, यामुळे शिवसेना नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांना मोठा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.
3 वर्षांपूर्वी -
तत्कालीन फडणवीस सरकारचे अनेक चिठ्ठे बाहेर आले तर फडणवीस आणि माजी मंत्री अडचणीत येतील - नाना पटोले
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी झोटिंग समितीच्या अहवालावर प्रतिक्रिया करताना मोठं विधान केलं आहे. विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीसांनी बहुजन नेत्यांचं खच्चीकरण केलं आहे. हे सर्वांना माहीत आहे. एकनाथ खडसेंचंही राजकीय नुकसान करण्याचा प्रयत्न झाला, असं सांगतानाच तत्कालीन फडणवीस सरकारमधील अनेक चिठ्ठे बाहेर आले तर फडणवीस आणि तत्कालीन अनेक मंत्री अडचणीत येतील, असा गौप्यस्फोट नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
क्लीन चिट देऊनही फडणवीसांनी झोटिंग अहवाल विधानसभेत सादर का केला नव्हता? | अनेक प्रश्न उपस्थित
सरकार आणि प्रशासकीय पातळीवरील धक्कादायक प्रकार समोर येतं आहेत. मात्र सदर प्रकार फडणवीसांच्या कार्यकाळातील असल्याने मध्य शंका उपस्थित होतं आहेत. त्यामुळे समोर येतं असलेल्या प्रकारामागे अदृश्य हात कोणाचे असे प्रश्न उपस्थित होउ लागले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
फडणवीसांच्या काळातील खडसेंना क्लीन चीट देणारा झोटिंग समितीचा अहवाल गायब? | ते अदृश्य हात कोणाचे?
सरकार आणि प्रशासकीय पातळीवरील धक्कादायक प्रकार समोर येतं आहेत. मात्र सदर प्रकार फडणवीसांच्या कार्यकाळातील असल्याने मध्य शंका उपस्थित होतं आहेत. त्यामुळे समोर येतं असलेल्या प्रकारामागे अदृश्य हात कोणाचे असे प्रश्न उपस्थित होउ लागले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
माझ्यावरील आरोपांमुळे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला तडा जाऊ नये म्हणून राजीनामा दिला - संजय राठोड
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेला तडा जाऊ नये, म्हणून मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, असे माजी वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. पूजा चव्हाण नावाच्या एका तरुणीच्या मृत्यूप्रकरणी संजय राठोड यांनी आपली प्रतिक्रिया दिली. तसेच भविष्यात मी दोषी आढळून आले तर कायमचा बाजूला होईल, असेही ते म्हणाले. भाजप सतत माझ्यावर आरोप करत आहे. मात्र, ते सतत माझ्यावर आरोप का करत आहेत याचे मी आत्मचिंतन करत आहे, अशी खोचक प्रतिक्रिया संजय राठोड यांनी दिली. औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
3 वर्षांपूर्वी -
माजी वनमंत्री संजय राठोड आणि बंजारा समाजातील लोकांच्या भेटीगाठी | चर्चा सुरु
माजी वनमंत्री संजय राठोड सध्या बंजारा समाजातील लोकांनी भेट घेण्याचा प्लान संजय राठोड य़ांनी आखला आहे. लवकरच यासंदर्भात राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. संजय राठोड यांना देखील पक्षावर विश्वास असून त्यांनी यापुढे काय होणार, याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतली, असं स्पष्ट केलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
Job Alert | यवतमाळ जिल्हा म.सहकारी बँकेत 42 जागा | विदर्भातील तरुणांना संधी - त्वरा करा
यवतमाळ वाय.डी.सी.सी. बँक भरती २०२१. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ४२ लिपिक व सहाय्यक कर्मचारी पदांसाठी भरती अधिसूचना दाखल केली आहे. पात्र व इच्छुक अर्जदार यवतमाळ सहकारी बँक भरती 2021 साठी 06 ते 18 जुलै 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात.
3 वर्षांपूर्वी -
चंद्रकांतदादांनी अमित शहांना लिहिलेल्या पत्रात गडकरींच्या कारखाण्याचीही तक्रार | भाजपमध्ये अंतर्गत कलह?
राज्यातील पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून आमदारांसह नेतेमंडळी सभागृहात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी नितीन गडकरी यांच्या कारखान्यावरील कारवाईच्या मागणीवरुन भारतीय जनता पक्षाला टोला लागवला आहे. भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचं ते म्हणाले. तसेच भारतीय जनता पक्षामधील एका गटाकडून गडकरींना लक्ष्य केलं जातंय, असा आरोपही त्यांनी केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
महा बुलेट ट्रेन | नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण सुरू | शेतात जाऊन पाहणी | समृद्धी महामार्गालगतचा मार्ग
बहुचर्चित मुंबई- नाशिक- औरंगाबाद- नागपूर या प्रस्तावित बुलेट ट्रेनसाठी प्राथमिक सर्वेक्षण सुरू झाले आहे. सर्वेक्षणाचे काम देण्यात आलेल्या ‘तुला’ या एजन्सीचे प्रतिनिधी संभाव्य भूसंपादन हाेणाऱ्या शेतावर जाऊन तिथे सध्या नेमके काय आहे याची पाहणी करत आहेत. याआधी या मार्गासाठी विमानातून लिडार सर्वेक्षण झालेले आहे. समृद्धी महामार्गालगतच बुलेट ट्रेन प्रस्तावित आहे.
3 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | महापारेषण मध्ये 27 पदांची भरती | शिक्षण १०वी पास
महाट्रान्सको भरती २०२१. महाराष्ट्र राज्य विद्युत ट्रांसमिशन कंपनी लिमिटेडने भरती अधिसूचना जारी केली असून २७ इलेक्ट्रीशियन पदांसाठी अर्ज मागविला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 12 जुलै 2021 रोजी किंवा त्यापूर्वी महात्रोन्सको भरतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदवू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्नगाठ बांधणार नाही | तुमको ना भुल पायेंगे - आ. अमोल मिटकरी
विदर्भ स्वंतत्र राज्य होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, अशी प्रतिज्ञा २००४ साली देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री नसताना केली होती. आता त्यांचे लग्न होऊन कित्येक वर्षे उलटली, ते पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मात्र स्वतंत्र विदर्भाबाबत त्यांनी चक्कार शब्दसुद्धा काढला नाही.
3 वर्षांपूर्वी -
पत्नीच्या खासदारकीसाठी आणि आनंदराव अडसुळांवर दबाव टाकण्यासाठी पती-पत्नीची राजकीय आरोपांची धडपड?
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्राच्या निर्णयाला मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानंतर आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधत अवैध संपत्ती बाळगला असल्याचा आरोप केला आहे. खासदार नवनीत राणा आणि मला शिवसेनेकडून टार्गेट केले जात आहे. मुख्यमंत्र्यांकडून तशी खिचडी शिजवली जात असल्याचा आरोपही राणा यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेगवेगळ्या देशात अवैध संपत्ती असून त्याची माहिती मी मिळवली आहे. लवकरच ही माहिती ईडीकडे देऊन कारवाईची मागणी करणार असल्याचे आमदार राणा यांनी सांगितले.
3 वर्षांपूर्वी -
दोन दिवसांपूर्वी बावनकुळेंचं शिवसेनेला संपवण्यावर भाष्य | आज सेना-भाजप एकत्र येण्यावर पुड्या
मागील काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक शनिवारी माध्यमांसमोर आले. सरनाईकांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून त्यात आपलं मत मांडलं आहे. यामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत जुळवून घेण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिलाय. सरनाईकांनी लिहिलेल्या पत्रामुळे राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय.
3 वर्षांपूर्वी -
भाजपाला मोठं खिंडार | तब्बल १० विद्यमान नगरसेवक आणि २ माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटर बाँम्बमुळे पुन्हा एकदा राज्यात शिवसेना आणि भाजपा युती होणार का याची चर्चा सुरू झालीय. शिवसेनेनं मात्र पक्ष बळकट करण्यासाठी मोर्चे बांधणी सुरूच ठेवलीय. आज भाजपच्या बालेकिल्ल्यातील नगरसेवक फोडून शिवसेनेनं भाजपला उघड आव्हानच दिलंय. गेली काही वर्षे सातत्याने विदर्भ भाजपचा बालेकिल्ला म्हणून पुढे आला आहे. आज याच विदर्भातील हिंगणघाट नगरपालिकेतील उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे यांच्यासह भाजपचे विद्यमान 10 नगरसेवक आणि 2 माजी नगरसेवक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहेत. हिंगणघाट नगरपालिकेवर सध्या भाजपचीच सत्ता आहे. असं असतानाही भाजपचे 10 विद्यमान नगरसेवक शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
नवनीत राणांची खासदारकी वाचवण्यासाठी धडपड | सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन दाखल केली
अमरावतीच्या भाजप समर्थक खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नवनीत राणा यांना धक्का बसला आहे. इतकंच नाही तर खासदार नवनीत राणा यांना न्यायालयाने २ लाखांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आणि आपली खासदारकी वाचवण्यासाठी नवनीत राणा यांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. खासदार नवनीत राणा यांनी सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू पिटिशन दाखल केल्याची माहिती मिळतेय.
3 वर्षांपूर्वी -
भाजपने निर्धार केलाय, महाराष्ट्रातून शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही - चंद्रशेखर बावनकुळे
मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमच्याबरोबर युती करून लढली. केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या करिश्म्याचा फायदा करून घेण्यासाठीच शिवसेना आमच्यासोबत होती. परंतु, शिवसेनेने राष्ट्रवादीसोबतही छुपी युती केली होती, असा गौप्यस्फोट भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
राजकीय पोळी भाजण्यासाठी मेटेंच संतापजनक वक्तव्य | म्हणाले, नक्षलवाद्यांना कळालं ते सरकारला का कळत नाही?
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच आता गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून पुन्हा एक पत्रक काढण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी मराठा समाजाने दलाल नेत्यांपासून सावध राहावे, असा इशारा दिला आहे. भाकपा माओवादी कमिटी सचिव सह्याद्रीने हे पत्रक काढले आहे. नक्षलवाद्यांच्या या पत्रकाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | आता खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावं - रुपाली चाकणकर
सतत चर्चेत असणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांना मोठा धक्का बसला आहे. नवनीत राणा कौर यांचे मुंबई हायकोर्टाने सादर केलेले जात प्रमाणपत्र रद्द केले आहे. हायकोर्टाने नवनीत राणा यांचे जातीचे प्रमाणपत्र खोटे ठरवल्याने त्यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधत अमरावतीची जनता पुन्हा तुम्हाला रिटेकची संधी देणार नाही असं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार