महत्वाच्या बातम्या
-
आज भाजपाला विकासावर प्रश्न विचारला तर अटक, उद्या फासावर लटकवणार? नेटकरी संतापले
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारसभेदरम्यान एक विचित्र प्रकार शनिवारी अमरावती येथील जरुडमधील प्रचारसभेत घडला. वर्धा लोकसभा मतदारसंघातून उभ्या असलेल्या तडस यांच्या प्रचारासाठी आलेले भाजपा आमदार अनिल बोंडे सभेत भाषण देत होते. त्याचवेळी एका तरुणाने मध्येच उभं राहून बोंडे यांना विकासकामांसंदर्भात प्रश्न विचारला. या अनपेक्षित प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. पण बोंडेंसहीत इतर नेत्यांनी आपली भाषण सुरु ठेवत वेळ मारुन नेली. मात्र नंतर या प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त अनेक प्रसार माध्यमांनी दिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: गोंदियात मोदींच्या सभेसाठी प्रति १००-१५० रुपये देऊन गर्दी जमवली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल गोंदियात जाहीर सभा पार पडली. याआधी मेरठ आणि वर्धा येथील सभेत गर्दी न झाल्याने भारतीय जनता पक्ष आणि मोदींची मोठी नाचक्की झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र गोंदियात भारतीय जनता पक्षाने विशेष काळजी घेतल्याचे पाहायला मिळाले, परंतु त्यातही ते पकडले गेले असंच म्हणावं लागेल. कारण लोकं मोदींना ऐकण्यासाठी स्वतःहून आले नाही तर ही गर्दी पैसे देऊन जमा करण्यात आल्याचे प्रसार माध्यमांच्या पाहणीतून रेकॉर्डवर आलं आहे. त्यामध्ये १०० रुपयांपासून ते प्रति गाडी ५०० रुपयांपर्यंत असं पैसे वाटप करून सभेसाठी लोकांनी आणण्यात आल्याचं स्वतः लोकांनीच कॅमेऱ्यावर मान्य केले.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ व शिवसेनेविरुद्ध ठेवीदारांची मोहीम
लोकसभा निवडणुका झाल्या असताना शिवसेनेचे अमरावतीचे खासदार अडचणीत आल्याचे चित्र आहे. कारण ‘द सिटी को ऑप. बँकेच्या ठेवीदारांनी त्यांच्या विरुद्ध समाज समाज माध्यमांवर मोहीम सुरु केली आहे. त्यात संबंधित ठेवीदार हातात बॅनर घेऊन त्यावर एक संदेश देत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
गडकरींनी २०० कोटी रुपये वाटले, तरी पराभूत होणार: प्रकाश आंबेडकर
नागपूरमधून लोकसभा निवडणूक लढवणारे नितीन गडकरी यांच्यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली आहे. नागपूर मतदारसंघात नितीन गडकरींचा कमीत कमी ३ लाख मतांनी पराभव होईल. गडकरींनी दोनशे कोटी रुपये वाटले, तरी ते निवडून येऊ शकत नाहीत, असा थेट दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
अमरावती लोकसभा: नवनीत कौर राणा काँग्रेस आघाडीत सामील
मागील लोकसभा निवडणुकीत अमरावतीच्या युवा स्वाभिमान पक्षाचे नेते रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर राणा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढल्या होत्या. यंदाही रवी राणा यांनी काँग्रेस आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
6 वर्षांपूर्वी -
युवा स्वाभिमान पार्टीकडून नवनीत कौर राणांचा जोरात प्रचार
लोकसभा निवडणुकांच्या तारखा आणि आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर अनेक पक्ष जोरदारपणे कामाला लागले आहेत. त्याअनुषंगाने अमरावतीच्या लोकसभा आखाड्यात सुद्धा जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. अपक्ष आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर राणांचा लोकसभेच्या निमित्ताने जोरदार प्रचार सुरु असल्याचं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण; प्रेस नोटवरून आदित्य ठाकरेंची प्रसार माध्यमांवर आगपाखड
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यवतमाळमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेत आता शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मारहाण करणाऱ्या युवासेनेच्या कार्यकत्यांचे पद रद्द करण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे. गुरूवारी रात्री हा निर्णय घेण्यात आला, याबाबतची माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाने तंबी देताच ते काश्मिरी तरुण सभ्य झाले, काल जय जयकार केलेल्या युवासैनिकांची हकालपट्टी
जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यवतमाळमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेत आता शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मारहाण करणाऱ्या युवासेनेच्या कार्यकत्यांचे पद रद्द करण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे. गुरूवारी रात्री हा निर्णय घेण्यात आला, याबाबतची माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
नरेंद्र मोदी १६ तारखेला यवतमाळच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ फेब्रुवारीला यवतमाळच्या दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान, ते महिला बचत गटाच्या मेळाव्याला उपस्थित राहून त्याठिकाणी ते सभा देखील घेणार असल्याचे वृत्त आहे. तशी अधिकृत माहिती केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
अमरावती लोकसभा: नवनीत रवी राणा यांना जागोजागी मोठा प्रतिसाद, खासदार अडसुळांचा मार्ग खडतर?
आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. सर्वच राष्ट्रीय पक्ष जोरदार कामाला लागले असून प्रत्येक जागा प्रतिष्टेची करण्यात आली आहे. निकालाअंती कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे अपक्ष आणि छोट्या पक्षाचे महत्व प्रचंड वाढणार आहे, यात शंका नाही. त्यातीलच शिवसेनेसाठी महत्वाचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे अमरावती. शिवसेनेचे आनंदराव अडसूळ येथील विद्यमान खासदार आहेत. शिवसेनेतील एक मोठं नाव असलं तरी आगामी निवडणुकीत त्यांचा लोकसभेचा मार्ग खडतर असल्याचं राजकीय विश्लेषक मानत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
ग्राम परिवर्तन; यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वल, कार्यक्षम जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखांची कामगिरी: सविस्तर
ग्रामीण भागात विकास साध्य करायचा म्हटलं की आधी तिथल्या सामान्य लोकांप्रती प्रामाणिक आस्था आणि तिथे भेडसावणाऱ्या मूळ समस्यांचा अभ्यास करणे सुद्धा तितकेच गरजेचे असते. परंतु, लोकाभिमुख विकास साधायचा म्हटल्यावर विषय जिल्ह्यातील प्रशासकीय सेवेवर येऊन थांबतो, असा साहजिकच विचार प्रत्येकाच्या मनात येतो. मात्र, देशभरात मोजकेच प्रामाणिक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आहेत जे प्रशासनातील अधिकारांचा अभ्यासपूर्ण वापर करतात आणि ग्रामीण भागातील लोकाभिमुख विकास तसेच विविध योजना सत्यात उतरवताना दिसतात. त्यातीलच एक नाव म्हणजे यवतमाळ जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख ज्यांच्यामुळे ग्राम परिवर्तनात यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.
6 वर्षांपूर्वी -
चांदवडनजिक भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
येथील रेणुकामाता मंदिराजवळ टायर फुटल्याने कार चालकाचे गाडीवरील निरंत्रण सुटले आणि कार बसवर जाऊन आदळल्याने भीषण अपघात झाला. दरम्यान या दुर्दैवी अपघातात एकाच कुटुंबातील ३ जण ठार झाल्याचे वृत्त आहे आणि ते सर्व वणी येथील राहणारे आहेत.
6 वर्षांपूर्वी -
जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनानं कर्तव्यावरील पोलिसाला चिरडलं
जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनानं थेट कर्तव्यावरील पोलीस शिपायाला चिरडून मारल्याची धक्कादायक घटना नागपूर-चंद्रपूर महामार्गावर घडली आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी २ व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे. रात्री उशिरा म्हणजे ११ च्या सुमारास ही घटना घडली आहे. यामुळे राज्यात तस्करांच्या वाढत्या मुजोरीचं वास्तव समोर आलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
राजकारण्यांनी कोणत्याही सांस्कृतिक संस्थामध्ये हस्तक्षेप करू नये : गडकरी
आधीच ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण नंतर रद्द केल्यामुळे वादात अडकलेल्या यवतमाळ येथील ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज रविवारी सायंकाळी समारोप झाला. दरम्यान, उपस्थित मान्यवरांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समारोपाच्या भाषणात राज्य सरकारचे चांगलेच खडे बोल सुनावले आणि राजकारण्यांना दोन मोलाचे सल्ले दिले.
6 वर्षांपूर्वी -
पुढील जन्मी अदानी-अंबानी होईन असे वाटल्याने पतीची आत्महत्या, या व्यवस्थेने माझ्या पतीचा बळी घेतला
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज यवतमाळ येथे सुरुवात झाली. दरम्यान, संमेलनाच्या उद्घाटक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधाकर येडे यांच्या अर्धांगिनी असलेल्या वैशाली येडे यांच्या शुभहस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, आज त्यांनी उपस्थितांशी आणि समस्त महाराष्ट्राशी भावनिक संवाद साधला आणि व्यवस्थेचे वास्तव प्रत्येकासमोर ठेवले असेच म्हणावे लागेल.
6 वर्षांपूर्वी -
सध्या शेतकरी आणि लेखकाला भाव नाही: वैशाली येडे
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज यवतमाळ येथे सुरुवात झाली. दरम्यान, संमेलनाच्या उद्घाटक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधाकर येडे यांच्या अर्धांगिनी असलेल्या वैशाली येडे यांच्या शुभहस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, आज त्यांनी उपस्थितांशी आणि समस्त महाराष्ट्राशी भावनिक संवाद साधला आणि व्यवस्थेचे वास्तव प्रत्येकासमोर ठेवले असेच म्हणावे लागेल.
6 वर्षांपूर्वी -
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा मान आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीला
अनेक दिवसांपासून राजकीय चर्चेचा विषय बनलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून यवतमाळमध्ये सुरुवात. दरम्यान, वरिष्ठ साहित्यिका सहगल यांचे निमंत्रण नाकारण्यात आल्याने मोठा वाद पेटला होता. अनेक घडामोडीनंतर यावर पडदा पाडण्याचा प्रयत्न झाला असून आता या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकाचा मान राजूर (ता. कळंब) येथील वैशाली सुधाकर येडे या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीला मिळाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: नाशिकरांची २०४१ पर्यंत तहान भागवणार; 'राज' स्वप्नं म्हणजे मुकणे पाणीपुरवठा योजना लवकरच सज्ज
नाशिकमधील मनसेच्या सत्ताकाळातील अजून एक महत्वपूर्ण योजना पूर्णत्वाच्या दिशेने मार्गक्रमण झाली आहे. नाशिक शहरासाठी महत्वाचा आणि २०४१ पर्यंत नाशिक शहराची तहान भागवेल अशी मुकणे पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहे. सत्ताकाळात राज ठाकरे यांनी या योजनेचे जनतेला जाहीर सादरीकरण सुद्धा केलं होतं. आता त्याच महत्वाकांक्षी प्रकल्पाचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
भंडारा: अभयारण्यात वाघ मृतावस्थेत आढळला
भंडाऱ्यातील अभयारण्यात आज सकाळी एक नर वाघ मृतावस्थेत आढळल्याची धक्कादायक घटना निदर्शनास आली आहे. सकाळच्या सुमारास पर्यटक तसेच गाइड यांना सफारीदरम्यान हा वाघ मृत अवस्थेत आढळला. दरम्यान, वाघाची अद्याप ओळख पटली नसून त्याच्या मृत्यूचं मूळ कारण सुद्धा अजून अस्पष्ट आहे.
6 वर्षांपूर्वी -
९ महिन्यात ११, ९३२ बालमृत्यू, जवाबदार मंत्र्यांचा वेळ कुठे...सीएम चषक?
महाराष्ट्रात कुपोषणामुळे होणारे बालकांचा मृत्य अजून जैसे थे अशीच अवस्था आहे. सरकार बदलून सुद्धा बालमृत्यूंचा गंभीर प्रश्न अद्याप सुटलेला नाही. केवळ जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यामध्ये महाराष्ट्रात तब्बल ११,९३२ बालमृत्यूची नोंद झाली आहे. परंतु हे प्रमाण आधीच धक्कादायक असताना त्यात कमी वजनाच्या बालकांचे सुद्धा प्रमाण वाढत असल्याची आकडेवारी समोर येते आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार