5 November 2024 9:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा मान आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीला

यवतमाळ : अनेक दिवसांपासून राजकीय चर्चेचा विषय बनलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून यवतमाळमध्ये सुरुवात. दरम्यान, वरिष्ठ साहित्यिका सहगल यांचे निमंत्रण नाकारण्यात आल्याने मोठा वाद पेटला होता. अनेक घडामोडीनंतर यावर पडदा पाडण्याचा प्रयत्न झाला असून आता या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकाचा मान राजूर (ता. कळंब) येथील वैशाली सुधाकर येडे या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीला मिळाला आहे.

संमेलनाध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरे यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाल्याने यानिमित्ताने अभूतपूर्व असा ‘महिला योग’ जुळून आला आहे असे म्हणावे लागेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरीत शुक्रवारी दुपारी ४ वाजता संमेलनाचे उद्घाटन मोठं वाजत गाजत होणार आहे. दरम्यान, याकार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची नावे असली तरी ते दोघेही या उद्घाटनाला अनुपस्थित राहणार आहेत असे वृत्त आहे.

तसेच चोहोबाजूंनी प्रचंड टीका झाल्यानंतर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी राजीनामा दिला. त्यामुळे वाद निकाली काढून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. संमेलनाच्या आयोजकांनी उद्घाटक म्हणून शेतकरी महिलेला मान देण्याची विनंती महामंडळाला केली. दरम्यान, संमेलनाच्या एक दिवस आदी यवतमाळात महामंडळाने बैठक घेऊन जाहीर केला होता.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x