महत्वाच्या बातम्या
-
VIDEO | सोपं असतं तर प्रत्येकजण शेतकरी असता | आनंद महिंद्रांचा महिलाशक्तीला सलाम
आज जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. या खास दिवशी आनंद महिंद्रा यांच्या महिंद्रा कंपनीच्या ट्रॅक्टरची एक जाहिरात चांगलीच व्हायरल होते आहे. या जाहिरातीमध्ये एक महिला पुरुषांच्या बरोबरीनेच कोणतंही काम करु शकते, अशी महिलांची कणखर, प्रखर प्रतिमा दाखवण्यात आली आहे. ही जाहिरात सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून या जाहिरातीचं, त्यात दाखवण्यात आलेल्या आशयाचं कौतुक होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | माणुसकी संपली का ? हत्तीला निर्दयीपणे मारहाण
सध्या सोशल मिडीयावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. या व्हिडीओमध्ये दोन माणसं एका हत्तीला अमानुषपणे काठ्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. या हत्तीला एका झाडाला बांधलं आहे. मार सहन करणारा हत्ती मोठमोठ्याने व्हिव्हळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | भलाईचा जमानाच नाही | गाईला वाचवलं आणि गाईने असे आभार मानले
समाज माध्यमांवर निरनिराळ्या प्रकारे व्हिडिओ व्हायरल होतं असतात. मात्र त्यातील अनेक विचार करायला भाग पडतात. दरम्यान, सध्याचा व्हिडिओ पाहून तुम्ही हसल्याशिवाय राहवणार नाही. एका गाईची मान एका झाडामध्ये अडकलेली असते. तिला वाचवण्यासाठी दोघेजण पुढे येतात. दोघांनी उडी मारून एक फांदी वाकवली आणि गाईची त्या संकटातून सुटका केली.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | मित्रासोबत ‘या’ क्रिकेटपटूच्या पत्नीचा भन्नाट डान्स
प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने आपल्या डान्सने समाज माध्यमांवर धुमाकूळ घातला आहे. धनश्री आपल्या इन्स्टाग्रांम अकाऊंटवर अनेक व्हिडिओ पोस्ट करत असते. पण यावेळीचा व्हिडिओ खास आहे. कारण क्रिकेटविश्वातून पहिल्यांदाच तिला डान्समध्ये टक्कर मिळाली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णाधार श्रेयस अय्यरने धनश्रीसोबत भन्नाट डान्स केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | क्रूर मनुष्य प्राणी | जळता टायर हत्तीवर फेकला | हत्तीचा मृत्यू
काही महिन्यांपूर्वी केरळात मानवी वस्तीत घुसलेल्या गर्भवती हत्तीणीला ज्वलंत स्फोटक खायला दिल्याच्या प्रकारानं देशाला हादरवून सोडलं होतं. माणूसकीला काळीमा फासणाऱ्या या कृतीनं गर्भवती हत्तीणीचा तडफडून मृत्यू झाला होता. आता असाच एक हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी ४० वर्षीय हत्ती तामिळनाडूतील एका वस्तीत घुसला आणि त्याला पळवून लावण्यासाठी लोकांनी त्याच्या अंगावर जळतं टायर फेकला.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | भटका कुत्रा आणि सिंहिणीमध्ये जबरदस्त लढाई
सध्या इंटरनेटवर आणखी एक मनोरंजक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. समाज माध्यमांवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये भटक्या कुत्र्याची आणि सिंहिणीची भयंकर लढाई सुरू आहे. कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं असून एका भटक्या कुत्र्याचा आणि सिंहिणीच्या लढाईचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांच्या प्लॅटफॉर्मवर प्रचंड व्हायरल होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | दोन हाणा पण नेता म्हणा | बिहार काँग्रेसमध्ये नेतेपदावरून हाणामारी
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आयडीएला बहुमत मिळालं आहे. दुसऱ्या बाजूला आरजेडी राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे आणि त्यांच्यासोबत आघाडी केलेल्या काँग्रेसला केवळ 19 जागा जिंकता आल्या आहेत. मात्र तरीही काँग्रेसमध्ये अजून अस्थिरता असल्याचं दिसत अजून निवडून आलेल्या आमदारांमध्ये देखील एकी नसल्याचं समोर आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | भाजपच्या आमदाराची भाजपच्या महिला नगरसेविकेला जबर मारहाण
याघडीला समाज माध्यमांवर भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने एका महिला नगरसेवकाला जबर मारहाण केल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. या व्हिडीओनंतर भारतीय जनता पक्षावर तुफान टीका सुरु झाली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ कर्नाटकातील असल्याचं समोर आलं आहे, तेरदळ येथील महिला नगरसेवकाला मारहाण करतानाचा भारतीय जनता पक्षाच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने भारतीय जनता पक्षावर सर्वबाजुने टीका होऊ लागली आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | 'गणपत' सिनेमाचा टीझर | टायगर श्रॉफ | Action Movie
बॉलिवूडचा अॅक्शन हिरो टायगर श्रॉफ (Bollywood Action Hero Tiger Shroff) याचा नवा हिंदी सिनेमा ‘गणपत’ (Ganapath) चे धमाकेदार पोस्टर काही दिवसांपूर्वीच समोर आले होते. पोस्टर रिलीजनंतर सिनेमाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. त्यातच आता या सिनेमाचे टीझर पोस्टर समोर येत आहे. या पोस्टरमध्ये टायगर श्रॉफ पुन्हा एकदा दमदार अंदाज पाहायला मिळत आहे. यात टायगर श्रॉफचा स्वॅग पाहण्यासारखा आहे. विशेष म्हणजे यात टायगरचा एक जबरदस्त डायलॉग देखील ऐकायला मिळत आहे. तो म्हणतो, “आपनु डरता है ना तो आपनु बहुत मारता है (Aapun Darta Hai Na To Apun Bahut Marta Hai).”
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | मोदींनी गुजरातमध्ये विकास केला असा प्रचारात धिंडोरा | तरी मतदाराला पैसे वाटप
गुजरातच्या विकासाचा मॉडेल देश मागील दहा वर्षांपासून ऐकत आहे. मात्र आजही हा विकास विशाल पुतळ्यांच्या पुढे गेलेला नाही. स्वतः पंतप्रधान अनेक वर्ष गुजरातच्या मुख्यमंत्री पदी विराजमान होते. दुसरीकडे ते आज स्वतः देशाचे पंतप्रधान आहेत आणि ते देखील दुसरी टर्म. मात्र आजही गुजरात देशातील सर्वच दृष्टीने अनेक राज्यांच्या मागे आहे हे वास्तव आहे. त्यामुळे विकासाचा अदृश्य मॉडेल आजही हरवलेला आहे, ज्याचा धिंडोरा केवळ निवडणूक आली की कानावर पडतो.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | शिवसेना खा. विनायक राऊत मास्क काढून बैठकीतच शिंकले | बेजवाबदार लोकप्रतिनिधी
राज्यात सध्या कोरोनामुळे होणारा मृत्युदर कमी झाला असला तरी कोरोनाचा एकूण परिणाम सुरूच आहे आणि रोज नवनवी आकडेवारी समोर येतं आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून वारंवार सामान्य लोकांना मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात येतं आहे. कोरोनावर अजून लस आली नसल्याने मास्क आणि इतर उपाय योजनाच सध्या कोरोनावर उपाय असल्याचा सरकार वारंवार सांगत आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | IPL 2020 | कार्तिकचा भन्नाट कॅच पाहिलात का
आयपीएल (IPL 2020) च्या प्ले-ऑफच्या रेसमधून कोलकाता (KKR)ने राजस्थान (Rajasthan Royals) ला बाहेर काढलं आहे. कोलकात्याने राजस्थानवर 60 रनने दणदणीत विजय मिळवला आहे. या मॅचमध्ये कोलकात्याचा विकेट कीपर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik)ने घेतलेला अफलातून कॅच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 35 वर्षांचा असलेल्या दिनेश कार्तिकने एखाद्या तरुणाला लाजवेल असा भन्नाट कॅच पकडला आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | लोकशाहीची खरेदी | भाजपची आमदार खरेदी स्टिंग ऑपरेशनमध्ये कैद
गुजरात विधानसभेच्या ८ जागांसाठी पोट निवडणूक घेण्यात येत आहे. तत्पूर्वी रविवारी प्रचार संपण्यापूर्वी सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या व्हिडीओत माजी आमदार सोमा पटेल यांचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. यात भाजपाने १० कोटींपेक्षा अधिक कोणाला दिले नाहीत असं म्हटलं आहे. काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला.
4 वर्षांपूर्वी -
पुण्यातील आंबेगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पास आग
आंबेगाव बुद्रुक येथे पालिकेने नव्याने कचरा प्रक्रिया प्रकल्प (Pune waste management issue)उभारण्यात आला असून यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी रविवारी आंबेगाव बुद्रुक आंबेगाव खुर्द व जांभूळवाडी येथील नागरिकांच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. याचवेळी काही नागरिकांनी कचरा प्रकल्पालाचा आग लावल्यामुळे एकच गोंधळ उडाला. यावेळी कात्रज, सनसिटी आणि कोंढवा बुद्रुक अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | पोटनिवडणूक प्रचार | ज्योतिरादित्य शिंदेंचं पंजाला मतदानासाठी आवाहन
मध्य प्रदेशात सध्या पोटनिवडणुकीच्या प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे. दरम्यान, काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने जोरदार प्रचार सुरू केला असून दोन्ही बाजूने मोठे नेते प्रचाराच्या रिंगणात उतरले आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात गेलेले खासदार ज्योतिरादित्य शिंदे सध्या पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत. शनिवारी (३१ ऑक्टोबर) भाजप खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाषणाच्या भाजपच्या उमेदवार इम्रती देवीचा प्रचार करताना स्थानिक लोकांना पंजाला म्हणजे कॉंग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले आणि एकच गोंधळ उडाला.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | मोदींची केवडिया झू सफारी | त्या पोपटाचा ४ हाथ लांब राहण्याचा निर्णय पण..
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० आणि ३१ ऑक्टोबर असे दोन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर गेले होते. पहिल्या दिवशी मोदींनी केवाडियामधील वेगवेगळया प्रकल्पांचे उद्घाटन केले होते. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’जवळ पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गुजरात सरकारने या भागात वेगवेगळे विकास प्रकल्प सुरु आहेत.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | कार थांबवली आणि | कॉन्स्टेबलचं पिस्तुल काढून झाडली गोळी
दिल्ली पोलीस (Delhi Police) दलातील एका कॉन्स्टेबलचा भयंकर प्रताप समोर आला आहे. पोलीस कॉन्स्टेबलच्या मित्राने पिस्तुलीच्या धाक दाखवून भररस्त्यावर तरुणांना मारहाण केली आणि गोळीबार केला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ (cctv video)समोर आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | ख्रिस गेल ९९ धावांवर बाद झाला | आणि संतापला
IPL 2020 आयपीएलच्या १३व्या हंगामात काल राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ख्रिस गेल (Chris Gayle) ने धडाकेबाज खेळी केली. पण त्याचे शतक एका धावाने हुकले. गेल ९९ धावांवर बाद झाला. या सामन्यात गेलने ८ षटकार मारले आणि टी-२० प्रकारात १ हजार षटकारांचा टप्पा पार केला.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | दुबईच्या मशीदमध्ये 2 बॅरिकेट्स तोडून कार घुसली | भीषण अपघात
भरधाव वेगानं कार घेऊन जाणाऱ्या एका तरुणानं सर्व बॅरिकेट्स तोडून थेट कार मशीदमध्ये घुसवली आहे. या भीषण अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन बॅरिकेट्स तोडून ही कार मशीदच्या गेटवर जाऊन धडकली आणि मोठा गोंधळ उडाला. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडल्याची माहिती मिळाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | २ कोटींची मर्सिडीज कार YouTuber ने रॉकेल टाकून जाळली
सोशल मीडिया हा एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्यामुळे एखाद्याला एका रात्रीत प्रसिद्ध मिळते. सोशल मीडियावर हिट होण्यासाठी लोकं काहीही करायला तयार असतात. आपला एखादा व्हिडीओ (Video) किंवा एखादी पोस्ट व्हायरल करण्यासाठी लोक कुठल्याही थराला जातात. याचच एक उदाहरण म्हणजे यूट्यूबर (Youtuber) मिखाइल लिटविन. या पठ्ठ्याने यूट्यूबवर व्हिडीओ बनवण्यासाठी चक्क करोडो रुपयांची मर्सिडीज (Mercedes) कार जाळली.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL