15 December 2024 1:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

VIDEO | २ कोटींची मर्सिडीज कार YouTuber ने रॉकेल टाकून जाळली

Youtuber, burns Mercedes, Frustration, video viral

मॉस्को, ३१ ऑक्टोबर: सोशल मीडिया हा एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्यामुळे एखाद्याला एका रात्रीत प्रसिद्ध मिळते. सोशल मीडियावर हिट होण्यासाठी लोकं काहीही करायला तयार असतात. आपला एखादा व्हिडीओ (Video) किंवा एखादी पोस्ट व्हायरल करण्यासाठी लोक कुठल्याही थराला जातात. याचच एक उदाहरण म्हणजे यूट्यूबर (Youtuber) मिखाइल लिटविन. या पठ्ठ्याने यूट्यूबवर व्हिडीओ बनवण्यासाठी चक्क करोडो रुपयांची मर्सिडीज (Mercedes) कार जाळली.

एखाद्या व्यक्तीला राग आला तर तो रागाच्या भरात काय करु शकतो, याचा अंदाज लावणे कठिण. रशियात एका पट्ट्याने आपली दोन कोटींची मर्सिडीज कार रॉकेल टाकून पेटवून दिली. या व्यक्तीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. कारची किंमत २ कोटी ५८ लाख ८६ हजार ८७५ (३५०,०००डॉलर्स) पेक्षा जास्त सांगितली जात आहे.

मिखाइल लिटविन रशियाला राहतो. मिखाइलची ही करामत समजताच त्याच्या लोकप्रियतेमध्ये मात्र प्रचंड वाढ झाली. यूट्यूबवर त्याचे 5-10 नाही तर 50 लाख सब्सक्रायबर्स आहेत. इन्ट्राग्राम(Instagram) वर त्याला 1.16 करोड लोकं फॉलो करतात. त्याच्याकडे जीटी 63एस या मॉडेलची मर्सिडीज होती. या कारला त्याने स्वत:नेच आग लावली. त्याच्या या व्हिडीओला अनेक दिवसागणिक हजारोंच्या घरात व्ह्यूज येत आहेत. लोकं मिखाइलच्या व्हिडीओवर एक एक अतरंगी कॉमेट्सही करत आहेत.

 

News English Summary: The video that is going viral on YouTube shows the Russian YouTuber Mikhail Litvin, also known as Misha, burning down his luxury car worth Rs 2.42 crore (in India). Reason? Well, he was frustrated with the company (Mercedes) after facing several issues with the car. Finally, when his problems weren’t solved, even after trying several times, he thought the best solution would be to burn down his car. The car currently starts at 12,720,000 (ex-showroom) Russian Ruble (Rs 1,19,90,363).

News English Title: Youtuber burns down his Mercedes out of frustration video viral social Media News updates.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x