21 November 2024 7:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

ताैक्तेे चक्रीवादळाचा धोका | अमित शहा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा

Tauktae cyclone

मुंबई, १६ मे | गुजरात आणि महाराष्ट्रासहित पाच राज्यांवर अरबी समुद्रात तयार होत असलेल्या ‘ताैक्तेे’ चक्रीवादळाचा धोका आहे. हवामान विभागानुसार हे वादळ गुजरातच्या दिशेने पुढे सरकत १८ मे रोजी गुजरातेतील द्वारका येथे धडकण्याची शक्यता आहे. परिणामी राज्यात आज कोकण, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, मराठवाडा व विदर्भात सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, महाराष्ट्रालाही या वादळाचा धोका असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा सुरू केली आहे. तौक्त चक्रीवादळ अक्राळविक्राळ रुप धारण करत आहे. महाराष्ट्रातील काही भागांना या वादळाचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा सुरू आहे. या बैठकीत शहा राज्यातील तयारीचा आढावा घेत आहेत. तर आज दुपारी 12 वाजता भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची चक्रीवादळाने प्रभावित झालेल्या शहरातील भाजपचे खासदार, आमदार आणि पक्षनेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यात नुकसानीचा आढावा घेऊन मदत कार्याची चर्चा करणार आहे.

आयएमडीच्या अहवालानुसार, शनिवारी मध्यरात्री उशिरा 2.30 वाजता हे वादळ गोव्याच्या पणजी किनाऱ्यापासून 150 किलोमीटर दक्षिण पश्चिममध्ये, मुंबईपासून 490 किलोमीटर दक्षिण, गुजरातच्या वेरावलपासून 880 किलोमीटर -दक्षिण पश्चिमध्ये होते. वादळाच्या वेळी वाऱ्याचा वेग ताशी 150 ते 160 किमी राहील. महाराष्ट्र, गुजरात आणि केरळच्या किनारपट्टीवर तीन दिवस वादळाचा परिणाम राहण्याची शक्यता आहे. या वादळाचा परिणाम तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम राजस्थान आणि लक्षद्वीपवरही होऊ शकतो. या चक्रीवादळाचे नाव म्यानमारने ‘तौक्ते’ ठेवले आहे.

NDRF च्या 53 टीम अलर्टवर
NDRFचे महासंचालक एस.एन. प्रधान यांनी शुक्रवारी सांगितले – केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्र या किनारपट्टी भागात एनडीआरएफची 53 पथके तैनात आहेत.

 

News English Summary: There is a danger of a hurricane. Meanwhile, Union Home Minister Amit Shah today started a discussion with Chief Minister Uddhav Thackeray through video conferencing as Maharashtra is also at risk of the storm.

News English Title: Chief Minister Uddhav Thackeray and Amit Shah hold virtual meeting on Tauktae cyclone news updates.

हॅशटॅग्स

#WeatherForecast(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x