15 January 2025 2:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
x

गुजरातच्या 4 जिल्ह्यांत मुसळधार पावसाने पूर | तर यूपीत मुसळधार पावसामुळे 15 मृत्युमुखी

Heavy Rain

गांधीनगर, १७ सप्टेंबर | देशात मुसळधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह १० हून जास्त राज्यांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागात पूरस्थिती आहे. गुजरातमध्ये घरे-दुकाने, रेल्वे मार्ग पाण्यात बुडाले आहेत. गुजरातच्या चार शहरांत राजकोट, केसोद, पाेरबंदर आणि वलसाडमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे.

गुजरातच्या 4 जिल्ह्यांत मुसळधार पावसाने पूर, तर यूपीत मुसळधार पावसामुळे 15 मृत्युमुखी – Heavy Rain in Gujarat and Uttar Pradesh states :

लखनौ, प्रयागराज, वाराणसी, कानपूर, अयोध्या, जौनपूर, सुलतानपूर, भदोही, गाझीपूर, चित्रकूट, बहराईच, बांदा, देवरिया, इटावा, फतेहपूरसह अनेक जिल्ह्यात दोन दिवस झाले पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले असून काही ठिकाणी घरातही पाणी शिरले आहे. लखनौत गेल्या नऊ तासात १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाने नोंद केली आहे. हवामान खात्याच्या मते, मध्यरात्री १२ पासून सकाळी ९ वाजेपर्यंत लखनौत १०९.२ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

गुजरातमध्ये गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक २०३ मिमी पाऊस राजकोटमध्ये झाले. उत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे राजधानी लखनऊसह अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती दिसून येत आहे. लखनऊच्या रस्त्यांवर चार फुटापर्यंत पाणी साचले आहे. जोरदार पावसामुळे घडलेल्या विविध घटनांत संपूर्ण उत्तर प्रदेशात १५ जणांचा मृत्यू झाला. हवामान विभागानुसार उत्तर प्रदेशातील २० पेक्षा जास्त जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे उत्तराखंड व हिमाचल प्रदेशात दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या. त्यामुळे महामार्ग बंद झाला आहे.

२४ तासांत नवी सिस्टिम प्रभावी होणार:
स्कायमेटनुसार बंगालच्या उपसागरात आणखी एक मान्सून सिस्टिम तयार होत आहे. शुक्रवारी ईशान्येत बंगालच्या खाडीपर्यंत ती पोहोचेल. चोवीस तासांत ते जास्त सक्रिय होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Heavy Rain in Gujarat and Uttar Pradesh states.

हॅशटॅग्स

#RainUpdates(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x