15 January 2025 1:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
x

Heavy Rain | मराठवाड्यात अतिवृष्टी | मांजराचे 18, कुंडलिकाचे 5, माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडले

Heavy Rain

औरंगाबाद, २९ सप्टेंबर | मराठवाड्यात (Heavy Rain in Marathwada) सोमवारी मध्यरात्री सुरू झालेल्या व मंगळवारी दिवसभर कोसळलेल्या पावसाने अक्षरश: दाणादाण उडवली. एकाच दिवशी आठही जिल्ह्यांत अतिवृष्टीची नोंद झाली असून बहुतांश जिल्ह्यांतील धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातल्या त्यात बीड, नांदेड व परभणी जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. येथे जनजीवन विस्कळीत झाले होते.

In Marathwada (Heavy Rain in Marathwada) the rain that started at midnight on Monday and fell all day on Tuesday literally blew away. On the same day, heavy rains were recorded in all the eight districts and dams in most of the districts overflowed :

नांदेड शहरातील हिंगोली गेट, साठे चौक, वजिराबाद चौरस्ता, आनंदनगर, वर्कशॉप कॉर्नर, शेतकरी चौक तरोडा नाका, सिडको लातूर फाटा यासह शहरातील अनेक चौकांत मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. नावघाट पुलावरून पाणी गेल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. जुना मोंढा भागातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. गाडेगाव येथील आसना पुलावरून पाणी वाहत आहे. यामुळे वाहतुकीसाठी हा मार्ग बंद करण्यात आला.

धर्माबाद, अर्धापूर, कंधार, बिलोली, लोहा, भोकर, मुदखेड आदी तालुक्यांत मोठा पाऊस झाला. नदीकाठच्या शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. बिलोली-बोधन व्हाया कुंडलवाडी जाणाऱ्या बसेस बिलोली बसस्थानकात थांबवण्यात आल्या. वाका पुलावरूनही पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. नांदेड-देगलूर-हैदराबाद मार्ग वाहतुकीसाठी बंद केला गेला आहे. दुसरीकडे, जालना, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यांतही पावसाने चांगलेच झोडपून काढले. बीडमध्ये सिंदफणा नदीला महापूर आला असून या पुराचा वेढा माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली गावाला बसला आहे.

उस्मानाबाद : १६ शेतकऱ्यांना हेलिकॉप्टरने काढले:
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असून पावसाने सरासरी आेलांडली आहे. सोमवारी रात्रीतून व दुसऱ्या दिवशी पहाटे झालेल्या पावसामुळे सौंदणा, वाकडी व दाऊतपूर येथील शेतकऱ्यांच्या घरांना पाण्याने वेढले. मंगळवारी दाऊतपूर व सौंदणा येथील १६ जणांना एनडीआरएफच्या पथकाने हेलिकॉप्टरच्या साहाय्याने, तर वाकडी येथील १७ जणांचे प्राण जिल्हा आपत्ती व्यवस्थापनने बोटीच्या साहाय्याने वाचवले. तसेच ४३९ जणांना सुरक्षित स्थळी शाळेत हलवले.

नांदेड : पुरात अडकलेल्या चार जणांची सुटका:
नायगाव तालुक्यातील टाकळी (बु.) येथील बंधाऱ्यात मंगळवारी चार जण अडकले होते. अग्निशमन दल शोध व बचाव पथक( बोट, रेस्क्यू रोप , तराफा ई. ) साहित्यासह घटनास्थळी पोहोचले. बंधाऱ्याच्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह फार जास्त प्रमाणात होता. प्रथम वेळी बोट घेऊन पथक त्या चारही व्यक्तीपर्यंत पोहोचले. सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Heavy rain in Marathwada made flood situation in many parts.

हॅशटॅग्स

#RainUpdates(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x