15 January 2025 2:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
x

Hurricane Gulab | हवामान खात्याचा इशारा | राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता

Rain Update

मुंबई, २६ सप्टेंबर | रविवारपासून पुन्हा मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पुढील 12 तासात हे चक्रीवादळाचे रूप घेणार आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. याचा परिणाम कोकण आणि मुंबईत दिसणार असून पावसाचा हा जोर 26 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर पर्यंत असणार आहे.

Hurricane Gulab will increase monsoon stay alert in the state.

हवामान खात्यानुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. येत्या 12 तासात हे चक्रीवादळाचे रूप घेऊ शकतात. येत्या 24 तासात हे ओडिशाच्या किनारपट्टीकडे वाटचाल करेल. त्यामुळे त्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात दिसेल. येत्या 4-5 दिवस मेघगर्जनेसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. विशेषत: रविवारपासून पावसाचा जोर वाढेल.

राज्यभरात परिणाम: (Maharashtra rain alert)
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याचा परिणाम महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये दिसणार आहे. हे उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेने जाणार आहे. यामुळे रविवारपासून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल तर काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस होईल. त्याचा परिणाम विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जास्तीत जास्त असेल. त्याचा परिणाम कोकण आणि मुंबईतही दिसून येईल, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे..

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Hurricane Gulab will increase rains across the Maharashtra said weather report.

हॅशटॅग्स

#RainUpdates(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x