23 February 2025 7:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Rain Updates | मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात धुवाँधार पाऊस | पुणे, सातारा, रत्नागिरीत रेड ॲलर्ट

Rain Update

मुंबई, १७ जून | राज्याभरात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात धुवाँधार पाऊस कोसळत आहे. तळकोकणाला पावसाने झोडपून काढलं आहे. तर कोल्हापुरात पंचगंगा नदी पात्राबाहेर केली आहे. येत्या 3 दिवसात कोकण, दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पुणे, साताऱ्यासह, रत्नागिरीला रेड ॲलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोकणातील सिंधुदुर्गात गेले चार दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे धरणांच्या साठ्यात वाढ झाली असून जिल्ह्यातील तीन धरणे तुडुंब भरून गेली आहेत. तर नऊ धरणांमध्ये पन्नास टक्क्याहून जास्त पाण्याचा संचय झाला आहे. गेल्या चार दिवसात जिल्ह्यात सरासरी 432 मीमी पाऊस पड़ला. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नदी नाले दुथडी भरून वाहत असताना, तीन लघु पाटबंधारे प्रकल्पात 100 टक्के पाण्याचा संचय झाला आहे.

सिंधुदुर्गात गेले चार दिवस मुसळधार पाऊस पडत आहे.या मुसळधार पावसाने देवगड तालुक्याला चांगलेच झोडपून काढले.मागील 24 तासात देवगडला 87 मिमी पाऊस पडला तर गेल्या तीन दिवसांत देवगड तालुक्यात सरासरी 326 मिमी पाऊस कोसळला आहे.

रत्नागिरीत धुवाँधार:
सकाळच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा रत्नागिरी धुवाधार पावसाला सुरुवात झाली. गेल्या चोवीस तासांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्व तालुक्‍यांमध्ये अतिवृष्टी झालेली पहायला मिळाली. रात्रभर बरसल्यानंतर जिल्ह्यात सकाळी पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र दुपारनंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत.

पुढील तीन दिवसांसाठी हवामान खात्याने कोकणाला अलर्ट दिलाय. मध्यरात्री कोसळणाऱ्या पावसानं नद्याच्या पाणी पातळीत वाढ झालीय. जगबुडी ६ मिटर, वाशिष्ठी ५ मिटर,कोदावली५ मिटरची पातळी आहे.गेल्या चौविस तासात ८३ मिलिमिटर पावसाची नोंद खेड १६५ मिलिमिटर,संगमेश्वर १०२ लांजा ८७ राजापूर ८५ तर चिपळूणाक ८४ मिलिमिटर पाऊस झालाय. ४५४ मिलिमिटरची सरासरी गाठलीय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Maharashtra and Mumbai rains update heavy rain slashes Kolhapur Konkan Panchaganga river overflow news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raining(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x