5 November 2024 4:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

मुंबईत पुढील ४८ तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता | मागील ११ दिवसांतच पडला महिन्याभराचा पाऊस

Mumbai Rain

मुंबई, १२ जून | मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राकडून आगामी ४८ तासांमध्ये मुंबई व उपनगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची तसेच, काही ठिकाणी अतिमुसळधार पावासाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच, येत्या पाच दिवसात मुंबईसह कोंकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.

दरम्यान, या पावसामुळे जून महिन्याच्या सुरुवातीच्या ११ दिवसांमध्येच ५०५ मिमी या मासिक सरासरी एवढ्या पर्जन्यवृष्टीची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये गेल्या ११ दिवसांत ५६५.२ मिमी पर्जन्यवृष्टी नोंदवली गेली आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्रीपासून ते मंगळवारपर्यंत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान, २०० मिमी पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या भागात रविवारी पर्जन्यवृष्टीसाठीचा हायअलर्ट घोषित केला आहे.

भारतीय हवामान विभागाने १३ व १४ जून या कालावधीदरम्यान मुंबई अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा दिला असल्यामुळे पालिका सज्ज झाली आहे. मुंबईतील समुद्रकिनारे आणि समुद्र किनाऱ्यांलगतचा परिसर आदी ठिकाणी जाणे नागरिकांनी टाळावे, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात आले आहे. तसेच या पार्श्वभूमीवर पालिकेने नियंत्रण कक्षांना दक्षतेचा इशारा दिला आहे.

 

News Title: Meteorological Center Mumbai Says Moderate To Heavy Rainfall Is Likely To Occur In Mumbai city news updates.

हॅशटॅग्स

#Raining(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x