15 January 2025 2:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
x

Monsoon Alert | खुशखबर! अंदमानात मान्सून धडकला, महाराष्ट्रात 'या' दिवशी आगमन होणार

Monsoon Alert for Maharashtra

Monsoon Alert | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, अखेर मान्सून अंदमानात धडकला आहे. अंदमान- निकोबार बेटांपैकी नानकोवरी बेटावर मान्सूननं हजेरी लावली आहे. अंदमानात मोसमी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे. दरवर्षी मान्सून अंदमानमध्ये 22 मे रोजी दाखल होतो. मात्र यावर्षी तीन दिवस आधीच मान्सून अंदमानमधील काही भागांमध्ये दाखल झाला आहे.

मान्सून केरळमध्ये चार जून रोजी दाखल होण्याची शक्यता आहे. दरवर्षी केरळमध्ये 1 जूनला पावसाचं आगमन होतं. यंदा मात्र त्याला तीन दिवस उशीर होणार असल्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 3 ते 4 दिवसात दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान, निकोबारच्या आणखी काही भागांत मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.

महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन केव्हा?
दुसरीकडे स्कायमेट या खासगी संस्थेच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन 9 ते 15 जूनपर्यंत होण्याची शक्यता आहे. यंदा भारतामध्ये सरासरी 96 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Monsoon Alert for Maharashtra state check details on 20 May 2023.

हॅशटॅग्स

#Monsoon Alert for Maharashtra(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x