22 February 2025 2:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

Rain Alert | रेन अलर्ट! मुंबई-पुणे, कोकण-विदर्भासह 'या' भागांत अतिमुसळधार पाऊस पडणार, 7 विभागांना ऑरेंज अलर्ट

Rain Alert IMD

Rain Alert | आयएमडीने पुढील काही दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान (Weather) खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी वारे आता गुजरात, महाराष्ट्र, राजस्थानच्या अनेक भागात पोहोचले आहेत. याशिवाय जम्मू-काश्मीर, लडाख, पंजाब आणि हरयाणाच्या उर्वरित भागातही सोमवारी ((Weather Today)) मान्सून दाखल झाला. यामुळे संपूर्ण उत्तर भारतातील हवामान आल्हाददायक झाले आहे. सोमवारी मान्सूनने देशाचा ८० टक्के भाग व्यापला होता. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, पुढील दोन दिवस मान्सूनच्या प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात (Weather Tomorrow) मुसळधार पावसाची शक्यता आहे. (Weather Today at My Location)

महाराष्ट्र, मुंबईसह आणि देशाच्या विविध भागात मोठ्या पावसाची हजेरी

देशाच्या बहुतांश भागात मान्सून दाखल झाला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र, मुंबईसह आणि देशाच्या विविध भागात मोठ्या पावसाची हजेरी लागणार आहे. आज राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये सकाळी 10 च्या सुमारास पुन्हा पाऊस सुरु झाला आहे. रात्रीही अधूनमधून पाऊस पडत होता. त्यामुळे दिल्ली-एनसीआरमधील हवामान थंड झाले आहे. किमान तापमान २४.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे सरासरीपेक्षा तीन अंशांनी कमी आहे. मंगळवारी सकाळी साडेआठवाजेपर्यंतच्या २४ तासांत शहरात ५.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात मुसळधार पाऊस बरसला

गेल्या २४ तासात मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात मुसळधार पाऊस बरसला. तर, आज मंगळवारीही मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

महाराष्ट्रातील या भागात पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट

मुंबईसह, पुणे, संपूर्ण कोकण, ठाणे, मध्य महाराष्ट्र, नाशिक आणि साताऱ्याला पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भाच्या काही भागांतही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर इतर काही भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भात अतिमुसळधार पावसाची शक्यता

मंगळवारी विदर्भातील अमरावती, नागपूर परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर भंडारा आणि गोंदिया भागात तुरळक ठिकाणी अती तीव्र मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या काळात विदर्भात मेघगर्जनेचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकण पट्ट्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मंगळवारी कोकण पट्ट्यामध्ये रत्नागिरी, रायगड ते पालघरपर्यंत पावसाचा जोर वाढून काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवारी पालघर आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्टचा इशारा कायम आहे. तर उर्वरित कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल. सिंधुदुर्गात हा जोर केवळ मध्यम सरींपुरताच मर्यादित राहील अशीही शक्यता आहे.

आज ढगाळ वातावरणासह मोठ्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शहरात मंगळवारी २४.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. आजचे कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने मंगळवारसाठी यलो अलर्ट जारी केला होता आणि ढगाळ वातावरण, मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला होता.

News Title : Rain Alert IMD Report check details on 27 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rain Alert IMD(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x