16 April 2025 11:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER
x

Rain Alert | अर्ध्या महाराष्ट्राला मेघगर्जनेसह पाऊस झोडपणार | पुणे, नाशिकसह अनेक जिल्ह्यांना अर्लट

Rain Alert

मुंबई, 21 नोव्हेंबर | आंध्र प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे ढग गडद झाले आहेत. राज्यात आज आणि उद्या मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, हवामान विभागाने पुणे, कोल्हापूर, नाशिकसह राज्यातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देेण्यात (Rain Alert) आला आहे.

Rain Alert. The meteorological department has issued yellow alert for some districts of the state including Pune, Kolhapur and Nashik :

मान्सून माघारी परतला असला तरी देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. आंध्र प्रदेशात पावसानं प्रचंड थैमान घातलं. आता महाराष्ट्रातही आज, उद्या मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पूर्व-मध्य व पश्चिम-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, याचा परिणाम महाराष्ट्रात दिसून येणार आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून, मच्छिमारांनाही दोन दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यांना यलो अलर्ट :
हवामान विभागाने मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त केलेला असून, राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा दिला आहे. यात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Rain Alert meteorological department has issued yellow alert for some districts of Maharashtra.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RainUpdates(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या