25 December 2024 10:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

तौते चक्रीवादळ, प्रशासन सतर्क | रायगडमध्ये 25200 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले

Tauktae cyclone

मुंबई, १७ मे | अरबी समुद्रात निर्माण झालेले आणि गेल्या दोन दिवसांपासून गुजरातच्या दिशेनं सरकत असलेले तौते चक्रीवादळ मुंबईच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. हवामान विभागाच्या ताज्या माहितीप्रमाणे तौते चक्रीवादळ मुंबईपासून १७० किमी अंतरावर आहे. हे वादळ हळूहळू पुढे सरकत असून, याचा प्रभाव मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, जळगाव यासह इतरही काही जिल्ह्यात दिसून आला आहे. रविवारी सायंकाळपासून मुंबईत पावसाला सुरूवात झाली. तर पुणे, सातारा आणि जळगाव जिल्ह्यात वादळाचा तडाखा बसला.

केरळ, गोवापाठोपाठ सिंधुदुर्ग, रत्नागिरीत रौदरुप धारण केलेल्या तौत्के चक्रीवादळाचा मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. या चक्रीवादळाचा मुंबईला कोणताही धोका नसला तरी हवामान विभागानं मुंबई व परिसराला ऑरेज अलर्ट जारी केला आहे. मुंबईत काल रात्रीपासूनच जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. तसेच मध्यरात्रीपासूनच मुंबईत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

वादळ कोकण किनारपट्टीवर रात्री ते धडकण्याची शक्यता असून या भागातून सुमारे अडीच हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. दरम्यान, रविवारी दुपारी हे वादळ रौद्ररूप धारण करून गोव्यापासून १२० किमी अंतरावरून पुढे सरकले. मात्र, यामुळे ताशी ६० ते ७० किमी वेगाने वारे आणि पावसाने दाणादाण उडवून दिली. केरळमध्ये आता या वादळाचा जोर ओसरला असून वाऱ्याचा वेगही मंदावला आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सध्या वादळामुळे जोरदार वारे वाहत आहेत.

 

News English Summary: The storm is expected to hit the Konkan coast at night and about 2,500 people have been evacuated from the area. Meanwhile, on Sunday afternoon, the storm turned into a thunderstorm and moved 120 km from Goa.

News English Title: Tauktae cyclone Raigad 25200 civilians moved to safer places news updates.

हॅशटॅग्स

#Raining(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x