22 December 2024 11:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

तौते चक्रीवादळ | मुंबईकरांनो वादळ-वारे मुंबईच्या उंबरठ्यावर | पुण्यासह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडणार

Toutke cyclone

मुंबई, १७ मे | अरबी समुद्रात निर्माण झालेले आणि गेल्या दोन दिवसांपासून गुजरातच्या दिशेनं सरकत असलेले तौते चक्रीवादळ मुंबईच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. हवामान विभागाच्या ताज्या माहितीप्रमाणे तौते चक्रीवादळ मुंबईपासून १७० किमी अंतरावर आहे. हे वादळ हळूहळू पुढे सरकत असून, याचा प्रभाव मुंबई  ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, जळगाव यासह इतरही काही जिल्ह्यात दिसून आला आहे. रविवारी सायंकाळपासून मुंबईत पावसाला सुरूवात झाली. तर पुणे, सातारा आणि जळगाव जिल्ह्यात वादळाचा तडाखा बसला.

केरळ, गोवापाठोपाठ सिंधुदुर्ग, रत्नागिरीत रौदरुप धारण केलेल्या तौत्के चक्रीवादळाचा मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. या चक्रीवादळाचा मुंबईला कोणताही धोका नसला तरी हवामान विभागानं मुंबई व परिसराला ऑरेज अलर्ट जारी केला आहे. मुंबईत काल रात्रीपासूनच जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. तसेच मध्यरात्रीपासूनच मुंबईत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

मुंबईसह ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट
मुंबईतील दादर, वरळी, लोअर परेल, माटुंगा, माहिमसह पश्चिम उपनगरात सर्वत्र जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. मुंबईतील वरळी सी फेस, शिवाजी पार्क, मरीन ड्राईव्ह या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर उंचच उंच लाटा उसळताना पाहायला मिळत आहे. मुंबई आणि उपनगरात गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या काही काळात मुंबईतील पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. सध्या तौत्के चक्रीवादळ हे मुंबईपासून सुमारे 150 किमी अंतरावर आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

 

News English Summary: After Kerala, Goa, Sindhudurg, Ratnagiri, the Toutke cyclone has started its journey towards Mumbai. Although there is no threat to Mumbai from this cyclone, the meteorological department has issued an alert to Mumbai and its environments.

News English Title: Toutke cyclone has started its journey towards Mumbai news updates.

हॅशटॅग्स

#Raining(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x