23 December 2024 1:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

प. बंगाल आगामी निवडणुक | फेकूजीवी सोबत जुमलाजीवी - प्रशांत भूषण

Senior Advocate Prashant Bhushan, PM Narendra Modi, Amit Shah, West Bengal Assembly Election

नवी दिल्ली, १२ फेब्रुवारी: कोलकाता हायकोर्टाकडून काल (गुरुवार) भारतीय जनता पक्षाला मोठा दिलासा मिळाला. भारतीय जनता पक्षाकडून काढण्यात आलेल्या रथयात्रेवर स्थगिती आण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टाकडून फेटाळण्यात आली आहे. रथयात्रा रोखण्यास कोर्टाकडून नकार देण्यात आला आहे. ही एक राजकीय याचिका आहे, जनहित याचिका नाही. असं कोर्टाने या याचिकेवरील सुनावणी करताना म्हटलं आहे. या निर्णयामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा झटका बसला असल्याचं बोललं जात आहे. कारण, भारतीय जनता पक्षाच्या या रथयात्रेस त्यांचा विरोध होता.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच्या तृणमूल सरकारने भारतीय जनता पक्षाच्या रथयात्रेस परवानगी नाकारली होती. ६ फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राज्यातील नादिया जिल्ह्यात रथयात्रेस हिरवा झेंडा दाखवला. तर, गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कूचबिहारमध्ये रथयात्रेस रवाना केलं होतं.

पश्चिम बंगालमधील सर्व विधानसभा क्षेत्रांमधून ही रथयात्रा जाणार आहे. भाजपाने १ फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्य सचिव अलापन बंडोपाध्याय यांना पत्र लिहून रथयात्रेबाबत माहिती दिली होती. दरम्यान, पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपच्या राजकारणावरून ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी प्रसिद्ध व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांच्या एका व्यंगचित्राला ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना टोला लगावला आहे. त्यात त्यांनी मोजक्या शब्दांत, “फेकूजीवी सोबत जुमलाजीवी” असं म्हटलं आहे.

 

News English Summary: The procession will pass through all the assembly constituencies in West Bengal. The BJP had written a letter to Chief Secretary Alapan Bandopadhyay on February 1 informing him about the Rathyatra. Meanwhile, senior advocate Prashant Bhushan has tweeted a caricature of famous cartoonist Satish Acharya on BJP’s politics in the run-up to the forthcoming Assembly elections in West Bengal, slamming Prime Minister Narendra Modi and Union Home Minister Amit Shah. In it, he has said in a few words, “Jumlajivi with Fekujivi”.

News English Title: West Bengal Assembly Election 2021 Senior Advocate Prashant Bhushan target Narendra Modi and Amit Shah over West Bengal Assembly Election news updates.

हॅशटॅग्स

#PrashantBhushan(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x