...तुमचा मुलगा जय शाहचं काय? त्याला एवढे पैसे कुठून मिळाले? | ममता बॅनर्जींचा सवाल

कोलकत्ता, १२ फेब्रुवारी: मोदी सरकारने कोरोना लसीकरणानंतर वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची (CAA) अंमलबजावणी करण्याची घोषणा केलीय. स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत माहिती दिलीय. ते पश्चिम बंगालमधील निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचारसभेत बोलत होते. यानंतर मोदी सरकार पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी हिंदू निर्वासितांच्या मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी ही घोषणा करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.
भारतीय जनता पक्षाची परिवर्तन यात्रा ही राज्याचा मुख्यमंत्री, आमदार अथवा मंत्री बदलण्यासाठी नाही तर घुसखोरी संपुष्टात आणून पश्चिम बंगालमधील स्थितीचा कायापालट करण्यासाठी आहे, असे गृहमंत्री म्हणाले. कूचबिहार जिल्ह्य़ातील एका जाहीर सभेत ते बोलत होते. राज्यात बुआ-भतिजा यांनी भ्रष्टाचाराला आश्रय दिला आहे तो संपुष्टात आणणे हाही परिवर्तन यात्रेचा एक उद्देश आहे, असेही ते म्हणाले. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्येचा मुद्दाही शहा यांनी या वेळी उपस्थित केला.
दरम्यान, कोलकातामध्ये बिगरशासकीय संघटना आणि इतर संघटनांच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना ममता बॅनर्जींनी अमित शाहांवर हल्लाबोल केला. अमित शाहा यांच्याकडून वापरण्यात येत असलेल्या भाषेमधून अहंकाराचा वास येतो. अशी भाषा एका केंद्रीय गृहमंत्र्याला शोभत नाही, असा टोला त्यांनी लगावला. तसेच तुम्ही सातत्याने आमच्यावर आत्या-भाचा नात्यावरून टीका करता. मात्र तुमच्या मुलाचं काय श्रीमान शाहा? त्याला एवढे पैसे कुठून मिळाले? असा सवालही ममता बॅनर्जी यांनी विचारला.
यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या की, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणासारख्या राज्यात गुंडगिरी आहे. बंगालला शांततेत राहू द्या. राज्यामध्ये भाजपाची सत्ता येऊ देता कामा नये. मी सर्वांना बंगालच्या सन्मानाचे रक्षण करण्याचे आवाहन करते. मी भाजपाला घाबरत नाही. मी रस्त्यावर उतरून लढणारी महिला आहे. मी अखेरपर्यंत संघर्ष करेन.
News English Summary: Mamata Banerjee attacked Amit Shah while addressing an event of NGOs and other organisations in Kolkata. The language used by Amit Shah smells of ego. He said that such language does not suit a Union Home Minister. Also, you constantly criticise us for being nepotistic. But what about your son, Mr. Shah? Where did he get all this money? This question was also asked by Mamata Banerjee.
News English Title: Assembly election 2021 what about your son Jay Shah from Where did he get all this money question asked CM Mamata Banerjee news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल