5 November 2024 9:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया शेअर 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर 22% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला - NSE: SUZLON Penny Stocks | 7 रुपयाचा पेनी शेअर पैशाचा पाऊस पाडतोय, रोज 20% अप्पर सर्किट, संधी सोडू नका - BOM: 532015 Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: TATAPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 55% पर्यंत परतावा मिळेल - NSE: HAL Bank Account Alert | पगारदारांना 'या' 5 फायनान्शियल चुका पडू शकतात महागात, कधीच पैसा-संपत्ती वाढणार नाही - Marathi News
x

Privacy Policy | Whatsapp, Facebook वर बंदी घाला | व्यापाऱ्यांची केंद्राकडे मागणी

CAIT, Whatsapp, Facebook, New Privacy Policy

मुंबई, ११ जानेवारी: फेसबुकच्या मालकीचं व्हॉट्स‌अ‌ॅप नवीन वर्षात कात टाकतंय. येत्या 8 फ्रेबुवारी 2021 ला व्हॉट्स अ‌ॅप आपली सेवा, अटी तसंच गोपनियतेच्या धोरणात बदल करत आहे. व्हॉट्स अ‌ॅपच्या नव्या अटी आणि धोरणांशी सहमत नसाल तर तुमचं व्हॉट्स बंद होणार आहे. (CAIT request union government to ban Whatsapp And Facebook after New Privacy Policy)

व्हॉट्स‌अ‌ॅपचं नवं अटी आणि गोपनियता धोरण 8 फ्रेब्रुवारी 2021 पासून अंमलात येईल. या तारखेनंतर हे अ‌ॅप वापरु इच्छित असलेल्या युझर्सला नव्या अपडेटनुसार अटी आणि गोपनियता धोरणांना सहमती दर्शवावी लागेल. जर तुम्ही नव्या धोरणांना सहमती दर्शवली नाही तर तुम्हाला व्हॉट्स अ‌ॅप वापरता येणार नाही.

व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन अटींमध्ये नववर्षात युजर्सच्या डेटाचा वापर कशाप्रकारे केला जाईल याची माहिती देण्यात आली आहे. तसेच, युजर्सचा चॅटिंग डेटा कशाप्रकारे स्टोअर आणि मॅनेज केला जातो, याशिवाय फेसबुक बिजनेससाठी तुमची चॅट कशाप्रकारे मॅनेज केली जाईल याबाबतही माहिती देण्यात आली आहे. नव्या पॉलिसीमध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामचं जास्त इंटीग्रेशन आहे. म्हणजे आता युजर्सचा आधीपेक्षा जास्त डेटा फेसबुककडे जाईल. व्हॉट्सअॅपचा डेटा आधीपासूनच फेसबुकला दिला जातो. पण आता फेसबुक आणि इस्टाग्रामवर इंटीग्रेशन जास्त होईल असं कंपनीने स्पष्ट केलंय.

मात्र नव्या प्रायव्हसी पॉलिसीनंतर युजरचा सर्व वैयक्तिक डेटा, पेमेंट ट्रांजेक्शन, कॉन्टॅक्ट्स, लोकेशन्स आणि अन्य महत्त्वाची माहिती, व्हॉट्सअपच्या हाती लागेल आणि त्या माहितीचा कंपनी भविष्यात कोणत्याही कारणासाठी वापर करू शकते. भारतात 20 कोटींपेक्षा जास्त Whatsapp युजर्स आहेत. यातल्या प्रत्येकाचा पर्सनल डेटा अतिशय महत्त्वाचा असून जर त्या डेटाचा गैरवापर झाला तर फक्त देशाच्या अर्थव्यवस्थेलाच नाही तर देशाच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो.

त्यानंतर देशातील व्यापाऱ्यांची अग्रणी संस्था, दी कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) Whatsapp आणि Facebook वर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यामुळे त्यांच्या नव्या पॉलिसीला रोखावे किंवा दोन्ही कंपन्यांवर थेट बंदी घालावी”, अशी मागणी CAIT ने पत्राद्वारे केंद्राकडे केली आहे.

 

News English Summary: After the new privacy policy, all personal data, payment transactions, contacts, locations and other important information of the user will be in the hands of WhatsApp and the company can use that information for any future purpose. There are more than 20 crore Whatsapp users in India. The personal data of each of them is very important and if that data is misused, it can endanger not only the economy of the country but also the security of the country. The Confederation of All India Traders (CAIT), the country’s leading trade body, has since called for a ban on Whatsapp and Facebook. Therefore, their new policy should be stopped or both companies should be banned directly, ”CAIT has demanded in a letter to the Center.

News English Title: CAIT request union government to ban Whatsapp And Facebook after New Privacy Policy news updates.

हॅशटॅग्स

#Whatsapp(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x