15 January 2025 5:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याविरोधात शिवीगाळ आणि दमदाटीची तक्रार

Pune, Yavat police station, Director Mahesh Manjrekar

मुंबई, १७ जानेवारी: मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडीला धक्का लागला म्हणून महेश मांजरेकर यांनी एका व्यक्तीला चापर मारल्याचा प्रकार समोर आला आहे. मांजरेकर यांच्या गाडीला आपल्या गाडीचा धक्का लागल्यावर त्यांनी आपल्याला शिविगाळ करुन चापट मारली, अशी तक्रार कैलास सातपुते या व्यक्तीनं केली आहे.

ही तक्रार पुणे जिल्ह्यातील यवत पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यानंतर महेश मांजरेकर यांच्यावर यवत पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

शुक्रवारी रात्री (१५ जानेवारी) साडे दहा वाजता हा प्रकार घडला. महेश मंजरेकर हे सोलापूरच्या दिशेनं चालले होते. मध्येच त्यांनी कारला अचानक ब्रेक लावला. त्यावेळी मागून येणाऱ्या कैलास सातपुते यांची ब्रिझ्झा कार मांजरेकरांच्या कारला धडकली. त्यात त्यांच्या कारचे किरकोळ नुकसान झाले. हे लक्षात येताच मांजेरकर गाडीतून उतरले आणि सातपुते यांना शिवीगाळ केली. दारू पिऊन गाडी चालवतोस का, असं म्हणत त्यांनी सातपुते यांना चापट मारली, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

 

News English Summary: Veteran Marathi actor and director Mahesh Manjrekar has been charged with assault. It has come to light that Mahesh Manjrekar hit a person as the car was hit. Kailash Satpute has complained that when Manjrekar’s car was hit by his car, he insulted and slapped him.

News English Title: Pune Yavat police station registered non cognizible offence against actor director Mahesh Manjrekar news updates.

हॅशटॅग्स

#filmy(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x